{"title":"ललित","description":"","products":[{"product_id":"संभ्रम-sambhram","title":"संभ्रम (Sambhram)","description":"\u003cp\u003e\u003cmeta charset=\"utf-8\"\u003e\u003cspan\u003e'संभ्रम' हे बुवाबाजी, अंधश्रद्धा, अनिष्ट चालीरीती या सामाजिक रोगाचे चित्रण करणारे बोलके पुस्तक आहे. यात रजनीश रमामाता, न्यायरत्न विनोद, सदानंद महाराज यांच्या प्रभावाचे प्रत्यक्ष दर्शन घडवले आहे. मीरा दातारचा दर्क्षा, समर्थांच्या पादुकांचा आगमन सोहळा, शिर्डीच्या साईबाबांचा रामनवमी उत्सव, काळुबाईची जत्रा, वारकरी संमेलन यांसारख्या अंधश्रद्धांच्या केंद्रावरील वातावरण डाक्यूमेंटरी पद्धतीने घडवले आहे. जैन समाजात अल्पवयीन मुलींनाही संन्यासदीक्षा दिली जाते. यल्लमास अल्पवयीन मुली सर्रास सोडल्या जातात. या अंधश्रद्धांच्या बळींचाही येथे वेध घेतला आहे. या अंधश्रद्धांचा वैचारिक परामर्ष घेणारी प्रस्तावना सुप्रसिद्ध विचारवंत मे. पुं. रेगे यांनी लिहिली आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45563320598742,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-610V_wvH3iL._SL1000.jpg?v=1744865497"},{"product_id":"अनुनाद-anunad","title":"अनुनाद  (Anunad)","description":"","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45573013110998,"sku":null,"price":650.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-31v3Iwm2bZL_dac40d45-da8c-4b08-b2c7-0179ba022acc.jpg?v=1744865467"},{"product_id":"फिल्म-मेकर्स-filmmakers","title":"फिल्म मेकर्स (Filmmakers)","description":"\u003cp\u003e\u003cmeta charset=\"utf-8\"\u003e\u003cspan\u003eगणेश मतकरीची समीक्षणाची पद्धत अभ्यासपूर्ण आहे. त्याचबरोबर चित्रपटतंत्रातल्या शब्दांचा अतिवापर करून येणारा क्लिष्टपणाही त्याच्या शैलीत नाही. त्याची भूमिका ही वाचकांच्या, एका रसिक चित्रपटप्रेमी मित्राची आहे. हा मित्र वाचकांपर्यंत न पोचलेले चित्रपट पहातो, प्रत्यक्ष चित्रपटांमधून आणि इतर वाचनातून त्या दिग्दर्शकांचा अभ्यास करतो आणि वाचकाला त्या चित्रपटाविषयी आणि दिग्दर्शकाविषयी कुतूहल निर्माण व्हावे- बघण्याची दृष्टीही उमजावी अशी त्या अभ्यासाची मांडणी करतो. त्यामुळे सरावाच्या चित्रपटांबाहेर न पहाणार्‍या वाचकाला नव्या नजरेने या माध्यमाकडे पहायला लावणारं हे लिखाण आहे. म्हणून मला ते महत्त्वाचे वाटते. त्याच्या पहिल्याच पुस्तकात त्यानं हे साध्य केलं आहे. याबद्दल त्याचं विशेष अभिनंदन.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e-सुमित्रा भावे\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45575054065878,"sku":null,"price":300.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-61vIiA_HBML._SL1000.jpg?v=1744865441"},{"product_id":"ते-te","title":"...ते (...Te)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसिद्धहस्त लेखक विजय तेंडुलकर यांच्या ललित लेखनाचा हा संग्रह आहे. राज कपूर, सारंग, माझा ज्योतिषी, माझी बहिण आणि जन्मदाता असे एकाहून एक पाच सकस लेख पुस्तकात वाचयला मिळतात. हे नेमके काय आहे, हे सांगायचे तर ते तेंडूलकरच सांगतात, केंव्हा केंव्हा आपले आयुष्य हाच एक रंगमंच वाटतो. माणसे येतात आणि न परतण्यासाठी जातात. परततात ती भूतकाल होऊन. वर्तमान खोटा वाटावा असा भूतकाल अशी ही काही माणसे काही हे सारे कोठून येते या संग्रहात आहेत. तर अशी ही व्यक्तिचित्रे आहेत. या व्यक्तीही वेगळ्या आहेत. राज कपूर कमलाकर सारंग हे चित्रपट, नाटकातील. दिवाडकर हे ज्योतिषी आहेत. 'जन्मदाता' हे त्यांनी त्यांच्या वडिलांविषयी लिहिलेले लेखन पत्राच्या फॉर्ममध्ये येते.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c!----\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45643990106326,"sku":null,"price":130.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-Te.jpg?v=1744865065"},{"product_id":"गेले-लिहायचे-राहून-gele-lihayche-rahun","title":"गेले लिहायचे राहून (Gele Lihayche Rahun)","description":"\u003cp\u003e\u003cmeta charset=\"utf-8\"\u003e\u003cspan\u003eकोर्टाच्या आत एक वेगळंच जग नांदत असतं. पक्षकारांचे, साक्षीदारांचे, आरोपींचे, त्यांच्या नातेवाईकांचे किती तरी नमुने आणि त्यांच्या मानसिक आंदोलनांचे कित्येक आविष्कार तिथे बघायला मिळतात. आपल्या समाजातल्या, तसंच मानवी स्वभावातल्याही काळ्या-पांढऱ्या छटांचं, त्यातल्या खाचाखोचांचं दर्शन होतं. अकरा वर्षांची वकिली आणि सव्वीस वर्षं न्यायदानाचा दीर्घ अनुभव असणाऱ्या निवृत्त न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांच्याकडे असं मोठं संचित जमा होणं साहजिकच. या पुस्तकातून त्यांनी हे संचित वाचकांसमोर ठेवलं आहे. या आहेत न्याय व्यवस्थेतल्या संवेदनशील ‘माणसा'ने लिहिलेल्या प्रांजळ नोंदी !\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c!----\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45673276342486,"sku":null,"price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-71lXj_KaRDL._SL1500.jpg?v=1744864895"},{"product_id":"naticharami-meghana-pethe","title":"नातिचरामि (Naticharami)","description":"\u003cp\u003eअनेकदा गुंतागुंतीची परिस्थिती समोर ठाकते माणसाच्या आयुष्यात. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eही गुंतागुंत मांडणं हे लेखक म्हणून मी माझं प्रथम कर्तव्य मानलं आहे. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया परिस्थितीत माणसं कशी वागतात हे मी पाहते आहे. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eयातलं चूक बरोबर ठरवणं हे मीच नव्हे, तर कुणीच ते पाहताना \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतरी करू नये, असं मला वाटतं. कारण आधीच एखादी भूमिका घेतली, \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतर ही अभूतपूर्व परिस्थिती, आहे त्या नितळ स्वरूपात आपल्याला दिसणार नाही. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअगदी नेमक्या याच परिस्थितीत आपण जर त्या माणसाचं जन्मापासूनचं \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसंचित घेऊन उभे ठाकलो, तर आपण काय करू ? \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहा प्रश्न खूप कळीचा आहे. कदाचित आपण तेच करू जे त्यानं केलं. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eज्या माणसांना आपण असं असं कधीच वागणार नाही,\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअशी खात्री वाटते त्यांचा मला हेवा वाटतो. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआयुष्यातल्या अतर्क्य शक्यतांबद्दलची त्यांची कल्पना \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतोकडी पडतेय असं तर नसेल ?\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45694623613142,"sku":null,"price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-51dN7fkjbYL_95787486-6e0b-4be0-90d8-61979dd1bb37.jpg?v=1744864826"},{"product_id":"yerzara-vijay-padalkar","title":"येरझारा (Yerzara)","description":"","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45766734741718,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-yerzara.jpg?v=1744864375"},{"product_id":"देखिला-अक्षरांचा-मेळावा-dekhila-aksharancha-melava","title":"देखिला अक्षरांचा मेळावा (Dekhila Aksharancha Melava)","description":"\u003cp\u003e\u003cmeta charset=\"utf-8\"\u003e\u003cspan\u003eजगभरातील श्रेष्ठ साहित्याची मराठी वाचकाला ओळख करून द्यायची व तसे करतांना त्याची साहित्य विषयक जाण वाढवायची हे या उद्दिष्टाने लिहिलेले पाडळकरांचे हे पहिले पुस्तक...\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45766737101014,"sku":null,"price":120.0,"currency_code":"INR","in_stock":true}]},{"product_id":"angat-pangat-d-m-mirasdar","title":"अंगत पंगत (Angat Pangat)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e‘अंगतपंगत’ हे द. मा. मिरासदार यांचं विनोदी ललित लेखांचं पुस्तक आहे. वेगवेगळ्या विषयांवर लिहिलेले हे लेख हसवतात आणि अंतर्मुखही करतात. कोटी (शाब्दिक), लेखनासंबंधीचं मार्गदर्शन, व्यवसायासाठी किंवा नोकरीसाठी लागणारी माणसाची पात्रता, लायकी, भुताखेतांच्या गोष्टी, भविष्याचा नाद, नाव (माणसाचं), सत्याविषयीचं भाष्य, पोकळ देशभक्ती, व्यक्तिमत्त्व विकास शिबिर, मास्तरांची बाजू, गुरुजींच्या विविध तऱ्हा, संपादक पद, स्वप्नं, फाशी, मंदिर, स्मशान, वेड अर्थात ध्यास, देवपूजा, खानावळ, व्यायामाची तालीम, कुत्रं–मांजर, डॉक्टर, सामान्य माणसं, देशी हॉटेल, गाढव-माकड, लढाई, न्हावी इत्यादी\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45767844004054,"sku":null,"price":229.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-aa.jpg?v=1746782346"},{"product_id":"unposted-letter-marathi","title":"न पाठवलेलं पत्र (UNPOSTED LETTER )","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eThe rise and fall of every human being has its effect on the overall human consciousness. Every lesson learnt, every mistake committed, every error corrected, every discovery, every invention, every insight, every idea, every revelation, every talent unfolded, every limit redefined, every thought released, every vibration experienced… by every individual paints yet another stroke in the evolution of human consciousness. When 'a' man lives his life with heightened awareness, his life helps humanity to gain a few years of maturity without having to live those few years. In effect, he fast-forwards humanity by a few years. Every being who is living his life with heightened awareness is actually doing God's work… he has been delegated a responsibility by Existence to play a part in evolving human consciousness…\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c!----\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45840135749846,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-518621rd2OL._SL1000_88614592-3395-4f79-b000-b47338e6d499.jpg?v=1744863772"},{"product_id":"अंधारयात्रा-andharyatra","title":"अंधारयात्रा (Andharyatra)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eहजारो वर्षांच्या तात्त्विक चिंतनानंतरही मानवाला काल स्वरूप समजलेले नाही. मात्र कालाने त्याच्या अनुभूतीवर घातलेल्या मर्यादा प्रथमपासून स्पष्ट आहेत. मानवाला कालमार्गावरून हलता येत नाही; येणारा एक एक क्षण त्याच क्रमाने अनुभवावा लागतो; भूतकाळ हा त्याला केवळ स्मॄतिरूपाने उपलब्ध असतो- काळात मागे जाता येत नाही; भविष्यकाळ तर संपूर्ण अज्ञात असतो. पुढेही जाता येत नाही. बुद्धीला जाणवतं की, विश्वाच्या अनंत विस्तारात अनेक आश्चर्ये आहेत, साहसे आहेत... पण ती आपल्यासाठी नाहीत... का आहेत? या संग्रहातल्या कथा कालकल्पनेशी निगडीत आहेत. ’अंधारयात्रा’ मध्ये मानव आपल्या अल्पायुष्याची कोंडी फोडून विश्वसंचारातले पहिले पाऊल टाकतो; ’चक्रधर’ मध्ये अकल्पनीय कालप्रवास आणि कालाचे ऊर्जेत रूपांतराची धाडसी कल्पना आहे; बंदिवासमध्येही कालप्रवास आहे; पण अप्रगल्भ मनावरचा घातक परिणामही आहे... आणि ’शेवटी एक पापणी लवली; शास्त्रकथा अमेदीनीय आयुष्याखेरीज पुरी कशी होईल? त्या कथेतही काल आहे... पण कालाची सापेक्षता आणि स्वनिष्ठता यावर कथा आधारित आहे आणि काळाचे स्वरूपच असे आहे की, आपण रोजच्या जीवनाची गती सोडली की अनपेक्षित अनुभव येतात- या कथाही त्याला अपवाद नाहीत.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45943117054166,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}]},{"product_id":"punyachi-apurvai-marathi","title":"पुण्याची अपूर्वाई (Punyachi Apurvai)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eओतुर या लहानशा बिनबिजलीच्या गावाहून मी झगमगत्या पुणे शहरात आलो. डोळे दिपले. पाय घसरले तरी सावरलो. नंतर खूप विद्वान भेटले, कलावंत भेटले. त्यांनी खूप शिकवलं. पण खरा रमलो ते पूर्व भागातल्या कारागिरांच्या जगात. त्या साध्यासुध्या मळक्या कपड्यांतल्या, धुळीने भरलेल्या लोकांनी ओढलेच मला त्यांच्यात. त्यांच्या कामातली मग्नता खूप आवडली. आणि एकमेकांशी असलेली संलग्नताही. नंतर कुतूहलाने भरलेले डोळे पुण्याच्या आणखीही काही भागांवरून फिरले. या सगळ्या जागा होत्या; तशी त्यातली माणसेही होती. आजच्या अफाट वाढलेल्या पुण्यात मी माझं पुणं असं जपून ठेवलं आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c!----\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45953462501590,"sku":null,"price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-41rRQEEFmxS.jpg?v=1744863293"},{"product_id":"सत्तेला-अंगावर-घेता-येतं-मुलाखती-आणि-भाषणे-sattela-angawar-gheta-yeta-mulakhati-ani-bhashane","title":"सत्तेला अंगावर घेता येतं मुलाखती आणि भाषणे (Sattela Angawar Gheta Yeta Mulakhati Ani Bhashane)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eवस्तुतः हे पुस्तक ठरवून लिहिले गेलेले नाही. वेगवेगळ्या निमित्ताने जे बोलले गेले व त्या-त्या वेळी प्रसिद्ध होत गेले, त्यातून जुळून आलेले हे पुस्तक आहे. पण या सर्व लेखनाला जोडणारे समान व बळकट धागे अनेक आहेत. शिवाय, या लेखनाच्या मध्यवर्ती वाहतो आहे एक जोरदार प्रवाह. तो प्रवाह आहे २०१३ नंतरच्या दहा वर्षांत या देशातील राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक जीवनात केंद्रीय सत्तेने केलेला अनिष्ट व आक्षेपार्ह हस्तक्षेप. त्या हस्तक्षेपाचा दीर्घकालीन परिणाम प्रामुख्याने राष्ट्रीय एकात्मता, लोकशाही मूल्ये आणि धर्मनिरपेक्षता यांच्यावर झालेला आहे. म्हणून गेल्या दशकातील भारतात केंद्रीय सत्तेने केलेले अतिक्रमण समजून घेण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c!----\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45963664326870,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-61SEghGhIbL._SL1482.jpg?v=1744863223"},{"product_id":"punyabhumi-bharat-marathi-sudha-murti","title":"पुण्यभूमी भारत ( Punyabhumi Bharat )","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e\"लोक मला अनेकदा विचारतात, ‘एवढ्या सगळ्या चित्रविचित्र गोष्टी नेमक्या तुमच्याच बाबतीत कशा काय घडतात?’ त्यावर त्या सर्वांना माझं एकच सांगणं असतं - जीवनाच्या या प्रवासात आपल्याला सर्वांनाच नानाविध माणसं भेटतात, कितीतरी अनुभवांना सामोरं जावं लागतं... त्यातले काही अनुभव आपल्याला स्पर्शून जातात, काही अंतर्बाह्य बदलूनसुध्दा टाकतात. तुमच्यापाशी जर संवेदनाक्षम मन असेल आणि तुम्ही या अनुभवांची नियमितपणे नोंद करून ठेवत असाल, तर तुमच्याही लक्षात येईल... तुमचं आयुष्य हासुध्दा एक विविध कथांचा खजिना आहे...\" खेड्यापाड्यात जाऊन तेथील गोरगरिबांसाठी, झोपडपट्टीवासियांसाठी आणि सामान्य माणसांसाठी कार्य करत असताना सुधा मूर्ती, एक समाजसेविका, लेखिका आणि प्राध्यापिका - त्या सर्वांशी बोलतात, त्या लोकांचं म्हणणं त्या नोंदवून ठेवतात. या माणसांचा जीवनसंघर्ष, त्यांच्या आयुष्यात आलेले खडतर प्रसंग, त्यावर त्यांनी केलेली मात, कधीतरी त्या संकटांपुढे त्यांनी मानलेली हार... हे सगळं लेखिकेने आपल्या प्रवाही भाषेत या पुस्तकात मांडलं आहे. सर्वसामान्य माणसांच्या ठायी लेखिकेला दिसून आलेल्या असामान्य दातृत्वाच्या, नि:स्वार्थी वृत्तीच्या कथा यात आहेत. सुनामीसारख्या निसर्गाच्या प्रकोपाशी झुंज देणारी माणसं असोत, अन्यायाला प्रतिकार करण्यासाठी उभ्या रहिलेल्या सबला असोत, स्पर्धेच्या युगात वर-वर जाण्याची धडपड करणारे तरूण असोत - या सर्वांच्या गोष्टीतून मानवी स्वभाव आणि प्रवृत्तीच्या विविध पैलूंचं नेमकं चित्रण आपल्याला दिसतं. भारतीय समाजाचा आत्माच या पुस्तकाच्या रुपानं प्रतिबिंबित झाला आहे.`Punyabhumi Bharat' is Marathi translation of English Book `The Old Man And His God' by Sudha Murty\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":46045846700246,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-pu.jpg?v=1746703699"},{"product_id":"kutuhalapoti-anil-awachat","title":"कुतूहलापोटी (Kutuhalapoti)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eआपल्या सभोवतालच्या प्रत्येक सजीवात किती आश्चर्यं दडलेली आहेत!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eपक्ष्यांच्या मऊसूत हलक्या पिसांमध्ये मैलोनमैल उडण्याची ताकद कुठून येते? मधमाशा मकरंदावर अशी कोणती प्रक्रिया करतात, ज्यातून हजारो वर्षं टिकू शकणारा मध तयार होतो? कुण्या एका कीटकाची अंडी वीस-वीस वर्षं सुप्तावस्थेत कशी काय राहू शकतात? माणसाला अजूनही न जमलेलं सेल्युलोजचं विघटन बुरशी कसं करते? आश्चर्यंच आश्चर्यं! आपल्या शरीराचंही तेच. मेंदूपासून हृदयापर्यंतच्या लाखो गुंतागुंतीच्या यंत्रणा सुरळीत कशा चालतात, हे एक कोडंच.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eया आणि अशा प्रश्नांची कोडी अनिल अवचटांना पडली आणि लागले की ते त्यांच्या मागे. तज्ज्ञ गाठले, पुस्तकं पालथी घातली आणि ही कोडी सहजसोप्या भाषेत उलगडून आपल्यासमोर ठेवली.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसजीवांच्या जीवनक्रियांविषयी कुतूहलापोटी घेतलेला हा शोध वाचाल, तर थक्क व्हाल गुरू!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":46119610220758,"sku":null,"price":200.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-kh.jpg?v=1748415740"},{"product_id":"jivlag-जिवलग-vijay-padalkar","title":"जिवलग (Jivalag)","description":"\u003cp\u003e\u003cmeta charset=\"utf-8\"\u003e\u003cspan\u003eआपले जीवन हे आपल्या एकट्याचेच थोडेच असते? असंख्य व्यक्तींची साथ घेत, त्यांना साथ देत आपण पुढे जात असतो. जगण्याच्या वाटेवरील हे सोबती आपल्या अस्तित्त्वाला सौंदर्य देतात, बळ देतात, अर्थ देतात. ‘गोजी’सारख्या चिमुकल्या, निरागस मुलीपासून ते गुलजारांसारख्या विख्यात\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eकलावंतापर्यंत, जन्मदात्या आईपासून ते जिला जन्म दिला त्या ‘मुग्धा’पर्यंत, दीर्घकाळ सोबत चाललेल्या धर्मापुरीकरासारख्या मित्रापासून ते आयुष्याचा एक छोटासा कालखंड प्रकाशून टाकणाऱ्या प्रकाश संतांपर्यंत...पाडळकरांना भेटलेल्या असंख्य सोबत्यांपैकी काहींची ही रसरशीत शब्दचित्रे.. जीवनाच्या विविध रुपांविषयी उत्कट आस्था बाळगणाऱ्या ललित लेखकाने त्याच्या खास ‘पाडळकरी’ शैलीत रेखाटलेली आपल्या जिवलगांची ही रसरशीत शब्दचित्रे..\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमराठी ललित गद्याचे एक मनमोहक रूप...\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":46459846426838,"sku":null,"price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-514YpSp22jL._SL1000.jpg?v=1744861928"},{"product_id":"tarkisht-prajakta-atul","title":"तर्किष्ट (Tarkisht)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eDoubt is the origin of Wisdom’ असे René Descartes ने म्हटले आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअर्थात ‘शहाणपणाची सुरुवात शंका घेण्यातून होते.’ आणि शंकेचे निराकरण करायचे तर,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eवैज्ञानिक दृष्टिकोनाचे बळ हवे. डॉ. शंतनू अभ्यंकर ह्यांनी आपल्या एका लेखात हे अतिशय समर्पकपणे मांडले आहे. ते म्हणतात,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eभवतालच्या परिस्थितीत भौतिक कारणे शोधा. जिथे जिथे ती अपुरी ठरतील, त्या त्या जागा रिकाम्या ठेवा.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eदैवी व दानवी बुजगावण्यांनी त्या भरून काढू नका. प्रयत्न आणि संशोधन सुरू राहू द्या. काही कारणे नव्याने समजतील. नवी तावून सुलाखून घ्या. जुनी कारणे त्यागून नव्याने जागा भरा. यथावकाश काही जागा भरल्या जातील, काही नाहीच भरता येणार.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eत्या रिकाम्या जागांसाठी संशोधन जारी ठेवा. “\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":46782918787286,"sku":"","price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-8-2.png?v=1745580981"},{"product_id":"vyasparva-durga-bhagwat","title":"व्यासपर्व (Vyasparva)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eकुणीच आपले काही टाकायला तयार नाही.हट्टी मूल हट्टाचे गाठोडे पोटाशी आवळते,त्याप्रमाणे कोमल भावांशी सर्वथा विरोध असलेला आपापला रोकडा देहस्वभाव सांडायला जर इथे कुणीच तयार नाही,तर मग या साऱ्या पात्रांना तारायला एक्च उपाय व्यासापुढे होता.तो म्हणजे नीती,तत्वबोध,विविध तऱ्हेचे ज्ञान कथेत वेळोवेळी घालून जी मूल्ये समाजात प्रतिष्ठा पावलेली आहेत,त्यांच्या आधारे कथेची प्रतिष्ठा राखणे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":46807905599702,"sku":"","price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-parv.jpg?v=1746432561"},{"product_id":"purchundi-p-l-deshpande-mouj-prakashan-buy-marathi-books","title":"पुरचुंडी (Purchundi)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eपुलंच्या निवडक विचारप्रधान लेखांचा संग्रह.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":46807926178006,"sku":"","price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-purchunde.jpg?v=1746434466"},{"product_id":"manasa-by-avachat-anil","title":"माणसं (Manasa)","description":"\u003cp\u003e    \u003c\/p\u003e\n\u003cdiv class=\"product__description rte quick-add-hidden\"\u003eManas by Anil Awachat | माणसं -\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003cspan\u003eअनिल अवचट \u003c\/span\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cp class=\"product__text inline-richtext\"\u003eAnil Awachat | Mouj Prakashan Grih\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":46807950491862,"sku":"","price":375.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-Manas_2.jpg?v=1746435803"},{"product_id":"kanchankan-shivaji-sawant","title":"कांचनकण (Kanchankan)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसाहित्याला `कांचनाचं` म्हणजे सोन्याचं मोल देणाऱ्या शिवाजी सावंत (`मृत्युंजय`कार) यांच्या विविध ललित लेखांचा हा भावसंच. खास त्यांच्या लेखनशैलीतील. अभिजात मराठी भाषेची जागोजाग भेट घडविणारा. या संचात छ. शिवराय व वीर थोरले बाजीराव पेशवे यांच्या विक्रमी, तशाच, भावसमृद्ध जीवनाच्या तळवटाला केलेला हळुवार स्पर्श भेटेल. आ. अत्रे, अण्णा (ग.दि.मा.) व अमरकीर्त, थोर संगीतकार वसंत देसाई यांचे त्यांना लाभलेले अनमोल आशीर्वाद दिसतील. तसेच, एरव्ही दुर्लक्षित गोदी कामगाराला सच्चा जीवनार्थ प्राप्त करून देणारे झुंजार व लढाऊ नेते भाई मनोहर कोतवाल यांच्या विविध जीवनछटा दिसतील. विशेषत: ज्ञानेश्वरांवर भावएकरूपता साधून बांधलेला, `विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले!` व `एकतरी ओवी अनुभवावी!` असे दोन लेख आहेत. ते तर शांत चित्ती चवीनं चाखण्यासारखे आहेत. साहित्य सोनियाची समृद्ध खाण असलेल्या मायमराठीत हे `कांचनकण` अलवार हातांनी उचलून ठेवावेत, असे वाचकांनाच वाटेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":47034783006934,"sku":null,"price":130.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-kk_948eee9b-9c20-4a7b-8167-550c84ae5e4f.jpg?v=1751959385"},{"product_id":"moravala-marathi-shivaji-sawant","title":"मोरावळा (Moravla)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eहा आहे ‘शब्द- मोरावळा’. लेखक मनोगतात म्हणतो : शरीरस्वास्थ्याच्या शास्त्राप्रमाणं साधा आवळा अति गुणकर असतो, हे सिद्ध झालंय. हा तर आहे साखरेच्या मधुर पाकात अंगभर मुरलेला मोरावळा. गुणकर, तसाच तुरटपणा टाकून चविष्ट झालेला. त्यातही हा शब्दमोरावळा, साहित्यिकमोरावळा आहे. मानवी मनाचा सारा अहंपणा, मत्सर, द्वेष अशा षड्रिपूंचा बेचव तुरटपणा टाकून ललितरम्य भाषेत सादर केलेला. श्री. शिवाजी सावंत यांच्या सशक्त भाषाशैलीत हा ‘शब्दमोरावळा’ साकारला आहे, त्यांच्या खास कोल्हापुरी बाजात नि ढंगात. इथं सावंतांच्या जीवनयात्रेत भेटलेली राजकारण, शिक्षण, प्रकाशन व साहित्य अशा विविध क्षेत्रांतील बलदंडांची आखीव रेखांकने आहेत. त्यांत एक-दोन खास ठाामीण अफलातूनही भेटतात. मोरावळ्याचा पहिलाच तुकडा जिभेवर ठेवताच खरा रसज्ञ मिटकी मारत नकळतच म्हणतो, ‘व्वा!’ तसंच काही हा ‘शब्दमोरावळा’ चाखताना रसिक वाचकाला वाटलं, तर आश्चर्य वाटायला नको!!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":47034786250966,"sku":null,"price":110.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-morav.jpg?v=1751960010"},{"product_id":"shelka-saj-shivaji-sawant","title":"शेलका साज (Shelka Saaj)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eहा आहे 'मृत्युंजय’कार शिवाजी सावंत यांच्या विविधरंगी ललितलेखनाचा संच : 'शेलका साज’!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eइथं सावंतांच्या खास रसश्रीमंत शैलीत वेध घेतलेले महाराष्ट्रवैभव कविश्रेष्ठ कुसुमाग्रज जसे भेटतील, तसाच लेखकाला चकवा देऊ बघणारा वाचक अशी झूल पांघरलेला लफंगाही भेटेल. छ. शिवराय, शंभूराजे, महाराणी येसूबाई, सरलष्कर संताजी घोरपडे यांच्या जीवनझुंजीतील आजवर मराठी वाचक मनाला अज्ञात राहिलेल्या मनामनांच्या अणीदार कंगोर्यांना केलेला रसबाळा, तरल ललितस्पर्श भेटेल. तसाच कसा होता - असेल शिवकालीन रणसंमुख सामान्य मावळा यावर टाकलेला डोळस व वास्तव प्रकाशझोत असेल. इथं आर्य चाणक्याच्या वेगळ्याच दृष्टीनं केलेला विचार दिसेल, तसंच, दीनदलितांना 'आधारवड’ झालेल्या राजर्षी शाहूंचं क्षणदर्शन घडेल.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसावंतांनी कथा मोजक्याच बेतल्या. मालिश, भिजाणे यांतून त्यांचं या आकृतिबंधाचं बळ दिसेल. 'मुकी’ ही कथा तर अल्बर्ट कामूची आठवण करून देईल- यासाठीच या संचाचं शीर्षक : शेलका साज !\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":47034790936790,"sku":null,"price":185.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-shl.jpg?v=1751960710"},{"product_id":"stree-aani-purush-v-s-khandekar","title":"स्त्री आणि पुरुष (Stree Aani Purush)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eआजच्या सामाजिक समस्या विविध कारणांनी निर्माण झालेल्या आहेत. एकीकडे जीवन यांत्रिक आणि म्हणूनच सर्वस्वी अर्थप्रधान होऊ पाहत आहे. दुसरीकडे समतेचे निशाण सर्व सामाजिक क्षेत्रांत जोरजोराने फडफडू लागले आहे. अशा वेळी जे जीवनविषयक कूटप्रश्न उत्पन्न होतात, त्यांची उत्तरे गोड, गुळगुळीत शेवट असणार्या गोष्टीनी, स्वप्नरंजनावर आधारलेल्या तत्त्वज्ञानाने किंवा आत्मवंचना करून घेणार्या सांस्कृतिक विचारांनी देता येणार नाहीत.....विषमतेवर आधारलेल्या सध्याच्या समाजरचनेतल्या अगदी ढोबळ अशा नीतिनियमांना सुद्धा पांयाखाली तुडवून जो पैसा संपादन केला जातो, त्याच्याकडे माणुसकीची चाड असणार्या समाजाने तिरस्कारानेच पाहिले पाहिजे......आपला झगडा यंत्राशी नसून विषमतेला अंधपणे साहाय्य करणार्या यांत्रिक संस्कृतीशी आहे...\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":47052701434070,"sku":null,"price":125.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-stree_d070b789-3659-405d-86c0-85151feba14f.jpg?v=1752399984"},{"product_id":"kalchi-swapne-v-s-khandekar","title":"कालची स्वप्ने (Kalchi Swapne)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eबोलूनचालून ही कालची स्वप्ने! सुंदर सुंदर कल्पनांची आणि कोमल कोमल भावनांची जी नाजूक पाखरे आपण मोठ्या चातुर्याने शोधून धरून आणली आहेत, असे त्या वेळी मला वाटत होते, ती आज आपल्यापाशी नाहीत; स्वैर उडत उडत ती फार दूर गेली आहेत, आपले शब्दांचे पिंजरे आता रिकामे झाले आहेत, याची जाणीव मला आज तीव्रतेने होत आहे. त्यांना धरून ठेवण्याच्या धडपडीत पिंजऱ्यात किंवा पिंजऱ्याच्या आसपास जी काही पिसे पडलेली असतील, त्यांच्यावरच यापुढे मला समाधान मानले पाहिजे. ही पिसे तरी माझ्यापाशी राहणार आहेत, की तीही वाऱ्यावर उडून जाणार आहेत, हे टीकाकारांचा टीकाकार जो काळ त्याच्याशिवाय दुसरे कोण सांगू शकेल?\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":47052708511958,"sku":null,"price":125.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-Kalachi-Swapne-FC.jpg?v=1752401047"},{"product_id":"vachtana-pahtana-jagtana-nanda-khare","title":"वाचताना पाहताना जगताना (Vachatana Pahatana Jagatana)","description":"\u003cp\u003eनंदा खरेंचे उपजीविकेचे साधन \/ पेशा सिव्हिल इंजिनियरचा असला तरी त्यांचे राजकारण, समाजकारण, सांस्कृतिककारण आणि साहित्यव्यवहार यांतले हस्तक्षेप आणि सहभाग मला विशेष महत्त्वाचे वाटतात. साधारणतः आपल्या विशिष्ट अभ्यासविषयाच्या पलीकडे जाऊन आपला अभ्यासविषय समग्र जगण्याच्या पार्श्वभूमीवर पाहता येणे ही मला त्यांच्याबाबतीतली सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट वाटते. त्याचा परिणाम त्यांच्या आत्ता प्रकाशित होत असलेल्या या लेखनातून खूप तपशिलाने पाहता येईल. एकारलेल्या शहाणपणापेक्षा जगण्याच्या विविध अंगांना स्पर्श करत त्यातले परस्परसंबंध तपासणारे त्यांचे ‘कुतूहलमिश्रित भान’ मला महत्त्वाचे वाटत आले आहे. खरे तर त्यांचे असे बहुअंगांना स्पर्शणारे व्यक्तिमत्त्व असल्यामुळेच ‘अंताजीची बखर’ पासून ललित लेखनातला त्यांचा अन्य प्रवास हा खूप समृद्ध झाला आहे. त्यांच्या या लेखनात काही जागा माझ्या स्वतःच्या भूमिकेला छेद देताहेत असेही वाटले. पण त्यांच्या भूमिकेच्या गांभीर्याविषयी, शोषित आणि तळागाळातील माणसांप्रती असलेल्या आस्थेविषयी मला खात्री आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e– सतीश काळसेकर\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":47075126608086,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-nanda-kahre2.jpg?v=1753162614"},{"product_id":"रंगमंच-मनाचे-भाग-१rangmanch-manache-bhag-1","title":"रंगमंच मनाचे भाग १(Rangmanch Manache Bhag 1)","description":"\u003cp data-start=\"57\" data-end=\"165\"\u003e\u003cstrong data-start=\"60\" data-end=\"162\"\u003eमनाच्या गूढ विश्वाचा वेध घेणारे, विचारांना चालना देणारे आणि आत्मपरीक्षणाला प्रवृत्त करणारे पुस्तक!\u003c\/strong\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp data-start=\"167\" data-end=\"433\"\u003e\u003cem data-start=\"167\" data-end=\"189\"\u003eरंगमंच मनाचे – भाग १\u003c\/em\u003e हे मानवी मन, भावना, विचारप्रक्रिया आणि वर्तन यांचा सखोल अभ्यास करणारे प्रभावी पुस्तक आहे. दैनंदिन जीवनातील अनुभव, नातेसंबंध, मानसिक संघर्ष, आनंद, दुःख आणि व्यक्तिमत्त्व विकास यांचा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून उलगडा या पुस्तकात करण्यात आला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp data-start=\"435\" data-end=\"651\"\u003eसोप्या भाषेत मांडलेल्या उदाहरणांमुळे वाचकांना स्वतःचे मन अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येते. आत्मजागरूकता, भावनिक संतुलन, सकारात्मक विचारसरणी आणि मानसिक आरोग्य यांचे महत्त्व या पुस्तकातून प्रभावीपणे अधोरेखित होते.\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":48350896259286,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/0d63fb8042800f70a6a6e45bb141be2f.jpg?v=1781169792"}],"url":"https:\/\/www.pustakcity.in\/collections\/%e0%a4%b2%e0%a4%b2%e0%a4%bf%e0%a4%a4.oembed","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}