{"title":"Classic Fiction","description":"","products":[{"product_id":"vyakti-ani-valli-marathi-p-l-deshpande","title":"व्यक्ती आणि वल्ली (Vyakti ani Valli)","description":"\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e१९४३ साली ’अभिरुची’ च्या एका अंकात पुरुषोत्तम देशपांडे नामेकरून कोण्या नवख्या लेखकाचे ‘अण्णा वडगावकर’ हे व्यक्तिचित्र प्रसिद्ध झाले तेव्हा त्या मासिकाचे मर्यादित पण जाणकार वाचक-मंडळ चमकून उठले. विनोदाच्या देशात ‘हा कोण संप्रति नवा पुरुषावतार? ’ अशी सोत्कंठ पृच्छा होऊ लागली. हा प्रदेश तेव्हा अत्रे, शामराव ओक, चिं. वि. जोशी यांच्यासारख्या मानकर्‍यांनी गजबजलेला होता. अन्य विनोदकारही होते आणि ते जनताजनार्दनाला हसविण्याची यथाशक्ती खटपट करीत होते. मराठी विनोदाची पेठ अशी तेजीत असूनही, देशपांड्यांचे न्यारे कसब डोळ्यात भरले.\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eते कसब तेथेच न थबकता, अनेक अंगांनी फुलून आले. त्याला नवे नवे धुमारे फुटले, एकेकसुद्धा भान हरवील असा; ‘किमु यत्र समुच्चयम्‌’? साहित्याचे विविध ढंग, संगीत रंगभूमी, चित्रपट असा या प्रतिभेचा चौरस आणि मुक्त संचार. चोखंदळ रसिकांनाही थक्क करणारा आणि ‘जन-साधारण’ भारुन जातील असा. आज तर, असे साक्षर मराठी घर नसेल की ‘पु. ल.’ म्हटले की कौतुकादराची लाट उसळत नाही! अशी आपुलकी ललाटी असणारा कलावंत एखादाचं!\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eदेशपाड्यांनी खूपखूप पाहिले. कंठाळी एकसुरी चाल टाकून जीवनाच्या तर्‍हातर्‍हा धुंडाळल्या आणि तिखट नजरेने माणसामाणसांतील विसंगती हेरली. ती अशा रंगतीने सांगितली की महाराष्ट्र खळखळून हसला. ती रंगत जातिवंत विनोदाची. त्याला करुणेची किनार असते. विसंगती हा मनुष्य स्वभावाचा धर्मच आहे ही उदार समज त्यात आहे. त्याने या विनोदाला गहिरेपण मिळते आणि नाट्यही. माणसे सहसा तशी सपाट नसतात चांगल्या-वाईटाचा शिक्का सहज उठवावा अशी. कोपरे-कंगोरे निघतात! आत कोठेतरी ‘वल्ली’ दडलेली असते. दोषांच्या राशीत गुणाची एखादी अकल्पित रेषा गवसते. देशपांड्यांनी या व्यक्ति आणि वल्ली टिपल्या त्या माणुसकीखातर. या वल्लींनाही व्यक्तित्व आहे. त्यांतील बर्‍या-वाईटाचे अंतर्नाटय देशपांडयांनी सराइतपणे पकडले आहे. कानामात्रेच्या फरकाने तसले नाट्य तुमच्या आमच्यांत आहे आणि लेखकातही!\u003c\/span\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45225734242518,"sku":null,"price":300.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-11553117.jpg?v=1744866424"},{"product_id":"पार्टनर-partner-by-v-p-kale","title":"पार्टनर (Partner)","description":"\u003cp class=\"has-medium-font-size\" data-mce-fragment=\"1\"\u003e\u003ca href=\"https:\/\/mr.wikipedia.org\/wiki\/%E0%A4%B5.%E0%A4%AA%E0%A5%81._%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%87\" data-type=\"URL\" data-id=\"https:\/\/mr.wikipedia.org\/wiki\/%E0%A4%B5.%E0%A4%AA%E0%A5%81._%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%87\" rel=\"noreferrer noopener\" data-mce-fragment=\"1\" data-mce-href=\"https:\/\/mr.wikipedia.org\/wiki\/%E0%A4%B5.%E0%A4%AA%E0%A5%81._%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%87\" target=\"_blank\"\u003eव.पु.काळे\u003c\/a\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e \u003c\/span\u003eलिखित Partner Book म्हणजे अनुभवांची खान आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक पार्टनर असतो हि गोष्ट त्या प्रत्येक पार्टनरची आहे. जो पार्टनर नेहेमी आपल्या सोबत असतो, आपल्याला घडवतो, शिकवतो, जगायला लावतो, ज्या जगण्याला जो अर्थ देतो तो पार्टनर.\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"has-medium-font-size\" data-mce-fragment=\"1\"\u003eपुस्तकाचं नाव बघून तुमच्या मनात जो पार्टनर चा अर्थ आलाय तो हा नाहीये. हा वेगळा आहे. इतरांपेक्षा वेगळा पण जास्त जवळचा. हा पार्टनर स्त्री- पुरुषमध्ये गुंतत नाही हा त्या पलीकडे पोहोचतो.पुस्तकात एक कथा गुंपलीये. म्हणावी तर साधी सोपी. हि कथा काथाकथनकारांच्या रूपानं आपल्या समोर येते.\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"has-medium-font-size\" data-mce-fragment=\"1\"\u003eमुंबईच्या चाळी मध्ये राहणारा श्री. त्याच्या स्वतःच्या समस्या, अडचणी, त्या कथेच्या निमित्ताने येणार घटना प्रसंग, त्याचं कुटुंब आणि मग ह्या सगळ्या जीवनप्रवासात गवसलेला वाटाड्या.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eलेखकाने कथा उत्तम लिहिली असून प्रत्येक व्यक्ती रेखा आणि त्यांच्यातील नात्यांची गुंफण अलगद मांडली आहे. कुणाचं तरी मुलगा होणं टाळता येत नाही परंतु कुणाचा तरी बाप होणं टाळता येत अशी अनेक कमालीच्या ओळी यामध्ये आहेत. हे पुस्तक पर्सनल टू युनिव्हर्सल आहे त्यामुळे हेय पुस्तक तुम्ही नक्की वाचाच.\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45228878659798,"sku":null,"price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-61llSff5QBL._SL1360.jpg?v=1744866423"},{"product_id":"vapurza-by-v-p-kale","title":"वपुर्झा (Vapurza)","description":"\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eव. पु.काळे ह्यांचे हे पुस्तक. कथा-कादंबरी वगैरे कोणत्याही प्रचलित साहित्यप्रकारात बदलता येणारे नसले तरी वपुस्पर्श झालेला हा वैविध्यपूर्ण लेखनगुच्छ असा आहे की वाचकांनी भरभरून दाद दिल्याने गेल्या बावीस वर्षांत त्यांचे सतरा वेळा पुन:पुन्हा मुद्रण करावे लागले आहे. एकाचा दुसर्‍याशी संबंध नसलेल्या तरीही त्यांच्यात एक धागा असलेल्या अनेक ढंगी परिच्छेदांची सुरेख गुंफण ह्या पुस्तकात गुंफण्यात आली आहे. त्यामुळेच आपल्या इच्छेनुसार हाताला लागेल ते पान उघडावे आणि त्या पानावरील लिखाणात मग ती एखादी छोटीशी गोष्ट असो वा मोजक्या शब्दात सांगितलेला तो एक विचार असो रंगून जावे असे हे पुस्तक आहे. हा एक मुक्त आनंद आहे म्हणूनच त्याला शीर्षक-क्रमांक-संदर्भ वगैरेचे बंधन नाही.\u003c\/span\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45228926009558,"sku":null,"price":240.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-61R-W9R4OhL._SL1360.jpg?v=1744866422"},{"product_id":"bokya-satbande-bhag-4-to-5-marathi","title":"बोक्या सातबंडे - भाग ४ व ५ (Bokya Satbande Bhag 4 to 5)","description":"\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e'भाबडा चिमणराव आणि बालनाटयातल्या दुष्ट चेटकिणीपासून हसवाफसवीतल्या एकसे एक सरस सहा भूमिकांपर्यंत धूम धमाल हसवणारे, चौकटराजा मधल्या नंदू आणि श्रीयुत गंगाधरे टिपरेतल्या आबांपासून लगे रहो मुन्नाभाईमधल्या गांधींपर्यंत घराघरांत पोहोचलेले दिलीप प्रभावळकर यांचा मिस्कील मानसपुत्र म्हणजे हा बोक्या सातबंडे! तो आहे निर्मळ मनाचा नि धाडसी वृत्तीचा. व्रात्य पण वांड नाही व खोडकर पण खोडसाळ नाही. गरजूला मदत करणं व ढोंगी माणसांच्या वर्मावर घाला घालणं हा त्याचा धर्म! प्रत्येक संकटातून, अग्निदिव्यातून तो सहीसलामत पार पडतो. दिलीप प्रभावळकरांची लेखनशैली मुळात मिस्किल नि खटयाळ. बोक्या सातबंडयासारखा समानधर्मी भेटला की, मग तर विचारायलाच नको. प्रभावळकरांच्या खटयाळपणाला उधाणच येतं. किशोरांना ते खुद्कन् हसवतात, रिझवतात. बोक्याच्या हाती आनंदाचं भिरभिरं देऊन त्याला ते मस्त घुमवतात! गुगली, नवी गुगली, हसगत, कागदी बाण व झूम नंतरचं प्रभावळकरांचं बोक्या सातबंडे हे एक झकास पुस्तक! प्रसन्न विनोदाचा शिडकावा करणारं. '\u003c\/span\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45399533682902,"sku":null,"price":235.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-61uv6_3LQdL._SL1002__1.jpg?v=1744865979"},{"product_id":"परिशोध-parishodh","title":"परिशोध (Parishodh)","description":"\u003cp\u003e\u003cmeta charset=\"utf-8\"\u003e\u003cspan\u003eमरणाचा अर्थ समजेपर्यंत जीवन समजत नाही. केवळ जन्मणं त्यासाठी पुरेसं नाही. मरून जन्माला आलं पाहिजे. त्यानंतरच जीवनाचा खरा अर्थ समजतो. तीन वेळा मरायचा प्रयत्न केला, तरी विशिष्ट प्रकारचाच अनुभव आला. शुद्ध गेल्यासारखं - डोक्यात पाणी भरल्यासारखं - श्वास कोंडून जीव गुदमरत असतानाही पाण्याबाहेर यायला जमू नये, तसं. चढायला धडपडत असताना कुणी तरी पुन्हा गर्तेत लोटून द्यावं, तसं. भोवताली काळपट हिरवेपणा भरून राहावा ... खोल बुडत जावं ... खरंय् हे. मरण समजल्याशिवाय जीवनाची किंमत समजत नाही.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमला असा अनुभव कधीच आला नाही. आत्महत्या करावी. इतकं उत्कट दु:खही कधी आयुष्यात जाणवलं नाही. मग मला जीवनाची किंमत ठाऊक आहे काय? ठाऊक आहे, असं म्हणता येईल काय? माझं चिंतन कशा प्रकारे चालतं? साहित्य वाचणं - ते ‘क्लासिक’ आहे, याची काळजी घेत! पुस्तकं विकत घेणं, संध्याकाळच्या थंड सुखद हवेत फिरून येणं ... उत्तम कॉफीचे घुटके घेत साहित्यातील पात्रांवर आणि प्रसंगांवर चिंतन करणं, प्रत्यक्ष आयुष्यात शक्यतो कुणालाही न दुखवता जगत राहणं! जीवन म्हणजे एवढंच? अंहं ...\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45435549548758,"sku":null,"price":220.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-61VoAOVwg1L._SL1400.jpg?v=1744865864"},{"product_id":"yugandhar-paperback-marathi","title":"युगंधर (Yugandhar-Paperback)","description":"\u003cdiv class=\"celwidget aplus-module launchpad-company-logo aplus-standard\" data-csa-c-id=\"uyg9y3-vl1eyi-w5klwc-fru8ol\" data-cel-widget=\"aplus-launchpad-company-logo\"\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"celwidget aplus-module module-9 aplus-standard\" data-csa-c-id=\"vol027-x31i83-hv4n7a-d8xtxq\" data-cel-widget=\"aplus-module-9\"\u003e\n\u003cdiv class=\"aplus-module-wrapper apm-fixed-width apm-spacing\"\u003e\n\u003cdiv class=\"apm-flex\"\u003e\n\u003cdiv class=\"apm-flex-item-third-width\"\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"apm-flex-item-third-width\"\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"apm-flex-item-third-width\"\u003e\n\u003cp class=\"apm-text-center\"\u003e\u003cspan\u003eहजारो वर्षांपासून श्रीकृष्ण भारतीय मन व्यापून दशांगुळे उरला आहे. भारतीय समाज व संस्कृती यांवर त्याचा अमीट असा ठसा उमटलेला आहे. ‘श्रीमद्भागवत’, ‘महाभारत’, ‘हरिवंश’ व काही पुराणांत श्रीकृष्णचरित्राचे अधिकृत संदर्भ सापडतात. परंतु गेल्या हजारो वर्षांत त्यावर सापेक्ष विचारांची आणि अतक्र्य चमत्कारांची पुटंच पुटं चढलेली आहेत. त्यामुळे त्याचं ‘श्री’युक्त सुंदर, तांबूसनीलवर्णी, सावळं रूपडं घनदाट झालं आहे, वास्तवापासून शेकडो योजनं दूर दूर गेलं आहे. श्रीकृष्ण हा ‘भारतीय’ म्हणून असलेल्या जीवनप्रणालीचा पहिला उद्गार आहे! त्याच्या चक्रवर्ती जीवनचरित्रात भारताला नित्यनूतन व उन्मेषशाली बनविण्याचा ऐवज ठासून भरला आहे. श्रीकृष्णाच्या जीवनसरोवरातील दाटलेलं शेवाळ तर्कशुद्ध सावधपणे अलगद दूर सारल्यास त्याचं ‘युगंधरी’ दर्शन शक्य आहे, हे ‘मृत्युंजय’कारांनी जाणलं. आणि त्यांच्या प्रदीर्घ चिंतनातून, सावध संदर्भशोधनातून, डोळस पर्यटनातून व जाणत्यांशी केलेल्या संभाषणातून साकारली ही साहित्यकृती – ‘युगंधर’!!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"celwidget aplus-module 3p-module-b aplus-standard\" data-csa-c-id=\"kakxpv-os03up-bmlcvo-erq7bh\" data-cel-widget=\"aplus-3p-module-b\"\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"celwidget aplus-module module-11 aplus-standard\" data-csa-c-id=\"cnsuw4-uel1wp-kori0a-j8upja\" data-cel-widget=\"aplus-module-11\"\u003e\n\u003cdiv class=\"aplus-module-wrapper apm-spacing apm-floatnone apm-fixed-width\"\u003e\n\u003cdiv class=\"apm-sidemodule aplus-module-content\"\u003e\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45730165883094,"sku":null,"price":595.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-511yY990acL._SL1000.jpg?v=1740321318"},{"product_id":"chaughijani-louisa-m-alcott-marathi","title":"चौघीजणी (Chaughijani)","description":"\u003cp\u003e\u003cmeta charset=\"utf-8\"\u003e\u003cspan\u003eलुइसा मे अल्कॉट या ख्यातनाम अमेरिकन लेखिकेची 'लिटल् वुईमेन’ ही कादंबरी १८६८ साली प्रथम प्रकाशित झाली. प्रसिद्धीबरोबरच तिला अभूतपूर्व लोकप्रियता लाभली. अनेक भाषांमधून ती अनुवादित झाली आहे. हॉलिवुडने तिच्यावर दोन वेळा चित्रपटही काढले आहेत.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e'लिटल् वुईमेन’ ही अमेरिकेतल्या 'मार्च’ कुटुंबाची - विशेषत: त्यातल्या मेग, ज्यो, बेथ आणि ऍमी या चार बहिणींची कहाणी आहे. या व्यक्तिरेखा लेखिकेने आपण व आपल्या बहिणी यांच्यावरूनच बहुतांशी रंगवल्या आहेत. शेजारचे वृद्ध लॉरेन्स आजोबा आणि त्यांचा देखणा प्रेमळ नातू लॉरी यांनी या कथेत आणखी अनोखे रंग भरले आहेत. हे एक अतिशय हृद्य आणि विलोभनीय असे कुटुंबचित्र आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eएकमेकींपासून स्वभावाने अगदी वेगळ्या असलेल्या मार्च बहिणींचे परस्परांवरील उत्कट प्रेम, त्यांच्या आशा-आकांक्षा, कोवळी सुखदु:खे, भविष्याची स्वप्ने यांचे हे कधी विनोदी, तर कधी हृदयस्पर्शी असे चित्रण आपल्या साध्या सच्चेपणामुळे वाचकाला थेट अखेरपर्यंत गुंतवून ठेवते...\"\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c!----\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45735055032534,"sku":null,"price":500.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-51-FbKLM3tL.jpg?v=1744864569"},{"product_id":"rang-manache-marathi","title":"रंग मनाचे (Rang Manache)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eअकरा कथांचा संग्रह. कथा जरी अकराच असल्या तरी व. पु. काळे ह्यांच्या चुरचुरीत लेखनाची खुमारीच ही आहे की आजूबाजूचे सारे विश्व ह्या ना त्या प्रकारे त्यात टिपले गेलेले असते. वपु नेमकेपणा टिपणारे छायाचित्रकारही होते. तोच गुण त्यांच्या लेखणीतही उतरला आहे म्हणूनच 'गॅरण्टी’, 'बघतात तुला, पण...’, 'आणि तसं झालं तर...’ सारख्या ह्या संग्रहातील कथा 'असंही असू शकतं’, 'हे असंच आहे’ असे वाटायला लावणार्‍या आहेत. हे सारे वपुंच्या शैलीत वाचणे हा एक वेगळा आनंद आहे. वपु केवळ मिस्कील लेखक नाहीत तर विचार करायला लावणारे मिस्कील लेखक होते ह्याची प्रचिती यावी असा हा मनाच्या रंगाची उधळण करणारा कथासंग्रह.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c!----\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45767865106646,"sku":null,"price":249.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-61FzeH5CS4L._SL1360.jpg?v=1744864344"},{"product_id":"hasavnuk-marathi-p-l-deshapande","title":"हसवणूक (Hasavnuk)","description":"\u003cp\u003e\u003cmeta charset=\"utf-8\"\u003e\u003cspan\u003eहसत राहण्याचा मंत्र देणारं हे पुस्तक. आपल्या लाडक्या पु. ल. देशपांडे यांनी शाब्दिक विनोदाची पखरण करीत दिवस आनंदात घालवण्याचं जणू तंत्रच आपल्याला शिकवलं आहे. माझं खाद्यजीवन, बिगरी ते मॅट्रिक, माझे पोष्टिक जीवन, पाळीव प्राणी अशा कथांमधून पु. ल. चा निखळ, खळखळता विनोद पानोपानी आपल्या भेटीला येतो. पण त्याही आधी आपल्याला भेटते ती त्यांची सही आणि त्यांनी वाचकांशी केलेलं हितगुज. ते लिहितात, 'जन्म आणि मृत्यू या दोन टोकांच्या मध्ये पकडून नियतीने चालवलेली आपल्या साऱ्यांची फसवणूक एकदा लक्षात आली की त्यातून सुटायला आपली आणि आपुलकीने भोवताली जमणाऱ्या माणसांची 'हसवणूक' करण्यापलीकडे आणखी काय करायचं?'\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c!----\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45771856052438,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-41i_wqQtBWL.jpg?v=1744864308"},{"product_id":"batatyachi-chal-p-l-deshpande-mouj-prakashan-buy-marathi-books","title":"बटाटयाची चाळ (Batatyachi Chal)","description":"\u003cp\u003e\u003cmeta charset=\"utf-8\"\u003e\u003cspan\u003eप्रत्येक समाजाचे सांस्कृतिक वैभव दाखविणाऱ्या काही गोष्टी असतात. पु. ल. देशपांडे हे आपले सांस्कृतिक वैभव आणि त्यांची बटाट्याची चाळही! चाळीचे हे पुस्तक आले आणि त्या नंतर त्याच्यावर आधारित नाट्यप्रयोग. हा प्रयोग पाहण्यासाठी मुंबईत तीन-तीन तास रांगेत उभे राहून तिकिटे काढत, अशा आठवणी सांगितल्या जातात. पुलंच्या या चाळीत वाचकांनी आणि प्रेक्षकांनीही स्वतःला शोधले. सांस्कृतिक चळवळ, सांस्कृतिक शिष्टमंडळ, निष्काम साहित्यसेवा, गच्चीसह-झालीच पाहिजे अशा एकूण १२ प्रकरणांमधून ही चाळ उभी राहते. सूक्ष्म निरीक्षणशक्तीने रंगविलेली चाळीतील व्यक्तीचित्रे मनमुराद हसवितात.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c!----\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45771896291542,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-411jh3_apuL_bbd92b39-a3c5-4c9d-8412-6c3134c84254.jpg?v=1744864306"},{"product_id":"urlasurla-p-l-deshpande-marathi","title":"उरलं सुरलं (Urla Surla)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eUrala sural is written by Pu.La. Deshpande  and published by Mouj Prakashan Gruh.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c!----\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":46074034094294,"sku":null,"price":450.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-61HDW8Zp4oL._SL1000.jpg?v=1737138597"},{"product_id":"ek-shunya-me","title":"एक शून्य मी (Ek Shunya Me)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eपु. ल. देशपांडे यांच्या वैचारिक लेखांचा हा संग्रह. 'मराठी दृष्टिकोनातून मराठी माणूस' या लेखाने पुस्तकाची सुरवात होते. गांधीयुग व गांधीयुगान्त, संस्कार, छान पिकत जाणारे म्हातारपण, अत्रे : ते हशे आणि त्या टाळ्या, नाटकवेडा महाराष्ट्र, नामस्मरणाचा रोग, एक शून्य मी, एक होती प्रभातनगरी, गांधीजी आणि त्यांचे घड्याळ आदी लेखांतून पु. ल. अनेक विषय हाताळतात. त्यातून स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळ प्रकट होतात. संवेदनशील आणि सुसंस्कृत महाराष्ट्रीय समाजाचे दर्शन ते घडवितात. जयप्रकाश नारायणांसारख्या संस्थेचं. कधी स्वतः बुद्धिनिष्ठ पु. ल. ठळक होतात. वेगळा विचार रुजविणारा हा संग्रह.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c!----\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":46074145931478,"sku":null,"price":298.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-51_ByxhkAZL._SL1000.jpg?v=1737138595"},{"product_id":"the-best-of-satyajit-ray-boxset-volume-1-volume-2","title":"The Best of Satyajit Ray (Boxset, Volume 1 \u0026 Volume 2)","description":"\u003cp\u003e\u003cb\u003eSatyajit Ray\u003c\/b\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e(1921-1991), polymath, polyglot, novelist, short-story writer, illustrator, designer, music composer, was one of the most eminent film directors of world cinema. His\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003ci\u003ePather Panchali\u003c\/i\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e(Song of the Little Road, 1955) established his position as a major film director, winning numerous awards. Recipient of the Lifetime Academy Award in 1992 ‘In recognition of his rare mastery of the art of motion pictures and for his profound humanitarian outlook, which has had an indelible influence on filmmakers and audiences throughout the world’, Ray took Indian cinema to a grand platform hitherto unachieved by any Indian film director. “Not to have seen the cinema of Ray means,’ said Akira Kurosawa, ‘existing in the world without seeing the sun or the moon.’\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eWhile Ray’s films are fairly well-known, his writings-fiction and non-fiction-written in Bengali and English continue to attract attention. His illustrations, design works, comic strips, science fictions, detective stories are gems of Indian literature. Ray’s non-fictions are gems, which bring to lights his thoughts on film-making, film appreciation, composition of music, art, design and screenplay, among others. ‘The Penguin Ray Library’ is an endeavour to open a window to the master’s writings to a wide spectrum of readers.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eFrom the ever-popular adventures of Ray’s enduring creation, the professional sleuth Feluda to the chronicles of Professor Shonku; short stories; writings on filmmaking; and thoughts on world as well as Indian cinema, among others, this anthology, a two-volume boxset,\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003ci\u003eThe Best of Satyajit Ray\u003c\/i\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003eis not only a treat for the Ray enthusiasts but also a collector’s edition.\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":46468978835670,"sku":null,"price":1105.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/9780143459477.jpg?v=1744861900"}],"url":"https:\/\/www.pustakcity.in\/collections\/classic-fiction.oembed","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}