{"title":"Fairy Tales, Folk Tales \u0026 Myths for Children","description":"","products":[{"product_id":"aajobanchya-potaditalya-goshti-sudha-murty","title":"आजी- आजोबांच्या पोतडीतल्या गोष्टी (Aaji Ajobanchya Potaditalya Goshti)","description":"\u003cp\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eरोज एक गोष्ट ऐकली की सगळ्या कटकटी दूर पळतात.\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e२०२० सालात या नॉव्हेल कोरोना व्हायरसने आपल्या भारतात पदार्पण करून सर्वांचं जिणं कठीण करून ठेवलं आहे. लहान मुलांना तर घराच्या चार भिंतीत कोंडूनच राहावं लागत आहे. देशभरात लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे आणि अशा दिवसेंदिवस बिकट होत जाणाऱ्या परिस्थितीमध्ये शिग्गावसारख्या लहानशा गावात राहाणाऱ्या आजी- आजोबांकडे आजोबांची बहीण कमलूआजी, तिची नात आणि आजी-आजोबांची सगळी नातवंडं राहायला आली आहेत.\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eमास्क शिवण्यात मदत करणं, घरातील वेगवेगळ्या कामांची जबाबदारी उचलणं, गावात थोड्या दिवसांसाठी आश्रयाला येऊन गावच्या मंदिरात राहाणाऱ्या गरीब मजुरांना देण्यासाठी जेवण तयार करणं आणि हे सगळं चालू असताना एकीकडे आजी-आजोबांकडून ऐकलेल्या छान छान गोष्टींमध्ये रमून जाणं, यामुळे हा लॉकडाउनचा काळसुद्धा या मुलांसाठी संस्मरणीय बनून गेलेला आहे. या छोट्या छोट्या गोष्टींमधून मुलांना देवदेवता, राजेरजवाडे, राजकन्या आणि राजकुमार, सर्प, आकाशाला जाऊन भिडलेलं जादूचं झाड, चोर, राजधान्या, राजवाडे आणि इतरही अनेक अद्भुतरम्य गोष्टी भेटतात. आजी-आजोबांच्या तोंडून या सर्व गोष्टी ऐकणं हा त्या मुलांसाठी एक आनंदाचा ठेवा बनून जातो आणि त्यातूनच मुलं करुणेचे धडे शिकतात, व्यवहारचातुर्य शिकतात आणि कष्ट करण्याससुद्धा तयार होतात.\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eभारतातील एक लोकप्रिय लेखिका सुधा मूर्ती यांच्या लेखणीतून यापूर्वी उतरलेल्या ‘आजीच्या पोतडीतील गोष्टी’च्या मालिकेतील पुढचं पुस्तक म्हणजे ‘आजी-आजोबांच्या पोतडीतील गोष्टी.’ या अजरामर गोष्टी लेखिकेने लॉकडाउनच्या काळात लिहिलेल्या आहेत. या बिकट काळातसुद्धा मनोधैर्य कायम ठेवून लोकांच्या मदतीला सतत कसं धावून जावं, हेच आपल्या छोट्या वाचकांना त्यांनी या कथांच्या द्वारे दाखवून दिलं आहे. लेखिकेच्या खास निव्र्याज, आकर्षक व सहजसुंदर शैलीत उतरलेलं हे पुस्तक एकदा वाचण्यासाठी हातात घेतल्यानंतर खाली ठेवता येणार नाही, इतकं ते रंजक आणि उद्बोधक आहे. म्हणूनच प्रत्येक बालवाचकाने आपल्या संग्रही ठेवावं, असं ते आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45349867225302,"sku":null,"price":269.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-61pmtVwKoyS._SL1000.jpg?v=1744866098"},{"product_id":"haravalelya-goshtiche-rahasya-sudha-murty","title":"हरवलेल्या गोष्टीचे रहस्य  (Haravlelya Goshtiche Rahasya)","description":"\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eAfter staying in the lockdown for over a year, Nooni is now visiting her Ajja-Ajji in Somanahalli. Memories of excavating the famous stepwell and experiencing village life for the first time in The Magic of the Lost Temple are still afresh in Nooni's mind. Excited to finally step out of the confines of her home, little does Nooni know she will make yet another discovery, only this time it's a missing puzzle in her family's history. Written in India's favourite storyteller's inimitable style, The Magic of the Lost Story captures the value of asking questions and keeping the answers alive. Packed with delightful artworks and wondrous terrains, this story takes you on an unforgettable journey as it follows the magnificent Tungabhadra River. \"चौदा वर्षांची अनुष्का मागचे वर्षभर लॉकडाऊन मध्ये राहिलेली आहे. आता ती सोमनहळ्ळीमध्ये राहणाऱ्या आपल्या आजी-आजोबांच्या भेटीला निघालेली आहे. गेल्या खेपेला सोमनहळ्ळीला तिनं पुरातन पायऱ्यांची विहीर शोधून काढली होती. या तिच्या ‘हरवलेल्या मंदिराचे रहस्य’ च्या आठवणी अजून ताज्या आहेत. अखेर एकदा घराच्या चार भिंतींमधून बाहेर पडायला मिळाल्यामुळे अनुष्का खूष आहे. पण लवकरच ती आणखी एक रहस्य शोधून काढणार आहे, हे तिला कुठे माहीत आहे? फक्त याखेपेला ती तिच्या स्वतःच्याच घराण्याच्या इतिहासातील एक हरवलेला दुवा शोधून काढणार आहे. या पुस्तकातून लेखिकेनं प्रश्न विचारण्याचं आणि यांची समर्पक उत्तरं मिळवण्याचं महत्त्व स्पष्ट करून सांगितलेलं आहे. अतिशय सुंदर अशा चित्रांनी आणि थक्क करणाऱ्या दृश्यांनी नटलेल्या या पुस्तकातून भारतातील सुप्रसिद्ध कथालेखिका सुधा मूर्ती आपल्याला विशाल अशा तुंगभद्रा नदीच्या काठाकाठानं एका अविस्मरणीय प्रवासाला घेऊन जातात.\"\u003c\/span\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45349903859926,"sku":null,"price":230.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-71eeVG_PmSL._SL1500.jpg?v=1744866097"},{"product_id":"sarpacha-sood-marathi-sudha-murty","title":"सर्पाचा सूड (Sarpacha Sud)","description":"\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eHOW MANY NAMES DOES ARJUNA HAVE? WHY WAS YAMA CURSED? WHAT LESSON DID A LITTLE MONGOOSE TEACH YUDHISTHIRA? THE KURUKSHETRA WAR, FOUGHT BETWEEN THE KAURAVAS AND THE PANDAVAS AND WHICH FORCED EVEN THE GODS TO TAKE SIDES, MAY BE WELL KNOWN, BUT THERE ARE INNUMERABLE STORIES SET BEFORE, AFTER AND DURING THE WAR THAT LEND THE MAHABHARATA ITS MANY VARIED SHADES AND ARE LARGELY UNHEARD OF. AWARD-WINNING AUTHOR SUDHA MURTY REINTRODUCES THE FASCINATING WORLD OF INDIA'S GREATEST EPIC THROUGH THE EXTRAORDINARY TALES IN THIS COLLECTION, EACH OF WHICH IS SURE TO FILL YOU WITH A SENSE OF WONDER AND BEWILDERMENT. \"\"अर्जुनाची एकूण नावे किती? यमाला शाप का मिळाला? लहानशा मुंगसाने युधिष्ठिराला कोणता धडा शिकविला? महाभारतामध्ये कुरुक्षेत्री जे घनघोर युद्ध झालं, त्यात अखेर देवदेवतांनासुद्धा कोणत्या ना कोणत्या पक्षाची बाजू घेणं भाग पडलं. युद्धाविषयी तर पुष्कळ माहिती सर्वत्र उपलब्ध आहे; परंतु या युद्धाच्या आधी, युद्धाच्या दरम्यान किंवा युद्धाच्या नंतर असंख्य कथा घडल्या आहेत. या कथांमुळेच महाभारताला रंग भरतो. या कथासंग्रहांमधून अनेक पुरस्कार प्राप्त केलेल्या लेखिका सुधा मूर्ती भारताच्या या महाकाव्याचं विस्मयकारी जग वाचकांपुढे खुलं करतात. या संग्रहाद्वारे त्यांनी सांगितलेल्या गोष्टी सर्वश्रुत नसल्यामुळेच त्यांचं हे वेगळेपण वाचकाला मंत्रमुग्ध करतं.\u003c\/span\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45358785691862,"sku":null,"price":210.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-41DWMM9ERxL.jpg?v=1744866089"},{"product_id":"kalpavrukshachi-kanya-sudha-murty","title":"कल्पवृक्षाची कन्या (Kalpavrukshachi Kanya)","description":"\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eTHE WOMEN IN INDIAN MYTHOLOGY MIGHT BE FEWER IN NUMBER, BUT THEIR STORIES OF STRENGTH AND MYSTERY IN THE PAGES OF ANCIENT TEXTS AND EPICS ARE MANY. THEY SLAYED DEMONS AND PROTECTED THEIR DEVOTEES FIERCELY. FROM PARVATI TO ASHOKASUNDARI AND FROM BHAMATI TO MANDODARI, THIS COLLECTION FEATURES ENCHANTING AND FEARLESS WOMEN WHO FREQUENTLY LED WARS ON BEHALF OF THE GODS, WERE THE BACKBONE OF THEIR FAMILIES AND MAKERS OF THEIR OWN DESTINIES. INDIA`S MUCH-LOVED AND BESTSELLING AUTHOR SUDHA MURTY TAKES YOU ON AN EMPOWERING JOURNEY -THROUGH THE YARNS FORGOTTEN IN TIME-ABOUNDING WITH REMARKABLE WOMEN WHO WILL REMIND YOU OF THE STRONG FEMALE INFLUENCES IN YOUR LIFE. पौराणिक ग्रंथांमध्ये स्त्रिया कमी आढळत असल्या, तरी त्यांच्या अंगची शक्ती, ऊर्जा आणि गूढता यांचं पानोपानी वर्णन आढळतं. त्यांनी राक्षसांचं निर्दालन करून भक्तांचं रक्षण केल्याच्या कथाही आहेत. या कथासंग्रहात पार्वती,अशोकसुंदरी आणि भामतीपासून मंदोदरीपर्यंत अनेक निर्भय स्त्रिया भेटीस येतात. कुटुंबाचा आधारस्तंभ असणाऱ्या या स्त्रिया स्वत:च्या नशिबाच्या शिल्पकारही होत्या.\u003c\/span\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45362506334422,"sku":null,"price":220.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-61qArNBGyOL._SL1000.jpg?v=1744866088"},{"product_id":"मारुतीच्या-गोष्टी-marutichya-goshti","title":"मारुतीच्या गोष्टी (Marutichya Goshti)","description":"","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45960260288726,"sku":null,"price":80.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-IMG_7386_8b1d2cf9-4f31-4ff7-aa18-3b1b6ddcecfd_1.jpg?v=1744863255"},{"product_id":"thailibhar-goshti-sudha-murty","title":"थैलीभर गोष्टी (Thailibhar Goshti)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eराजे राजवाडे, महाराण्या, राजपुत्र, राजकन्या, कंजूष माणसं, जवळ फुटकी कवडीही नसलेली दरिद्री माणसं, शहाणी माणसं, विद्वान माणसं, चतुर माणसं, मूर्ख आणि अडाणी माणसं, चमत्कारिक स्त्रिया व पुरुष, चित्रविचित्र घटना या सुरस कथांमधून जिवंत होऊन आपल्या भेटीला येतात. एका कथेतील बुद्धिमान राजकन्येला आपल्यापेक्षा हुशार पती हवा असतो, म्हणून ती सर्व विवाहोत्सुक तरुणांना प्रत्येकी नऊ प्रश्न विचारण्याची संधी देते, पण अखेर तिलाही निरुत्तर करणारा कोणीतरी भेटतोच... एक अनाथ मुलगा आपल्या दुष्ट काकांना चांगली अद्दल घडवतो... आणि संकटात सापडलेल्या एका वृद्ध जोडप्याला उपयोगी पडतो तो एक ढोल! यातील काही कथा लेखिका सुधा मूर्ती यांनी आपल्या बालपणी आजीआजोबांकडून ऐकल्या... तर काही कथा देशोदेशी केलेल्या भ्रमंतीच्या दरम्यान त्यांना ऐकायला मिळाल्या... काही कथा त्यांच्या स्वत:च्या कल्पनाशक्तीतून कागदावर उतरल्या... या सर्वच्या सर्व सुरस, कालातीत अशा लोककथा गेली कित्येक वर्षं लेखिकेच्या मनात घर करून राहिलेल्या आहेत. वेळोवेळी आपल्या सहवासात आलेल्या लहान मुलामुलींना, आपल्या विद्याथ्र्यांना त्यांनी त्या सांगितल्या आहेत. आज या कथासंग्रहाच्या रूपाने या सर्व कथा लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सर्वच वाचकांना वाचनासाठी उपलब्ध होत आहेत.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":46042993000662,"sku":null,"price":229.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-thaile.jpg?v=1751968964"},{"product_id":"garudjanmachi-katha-marathi-sudha-murty","title":"गरुडजन्माची कथा (Garudjanmachi Katha)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e ब्रह्मदेवाला कोणे एके काळी पाच मस्तकं होती हे तुम्हास माहीत आहे का? भगवान शंकराने आपल्या जटांमध्ये चंद्रकोर का धारण केली आहे, याबद्दल तुम्हाला काही ठाऊक आहे का? देव इतरांची फसवणूक करतात का? आपणा सर्वांना एक गोष्ट निश्चित माहीत आहे – ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचं चराचरात अस्तित्व असून, हे जग आणि आपली मानवजात अस्तित्वात आहे, ती केवळ त्यांच्यामुळेच. संपूर्ण भारतात सगळीकडे या तीनही देवतांची उपासना केली जाते; परंतु या देवतांबद्दलच्या अनेक सुरस आणि चमत्कृतीजन्य कथा अजूनही फारशा कुणाला माहीत नसतात. अनेक पुरस्कारविजेत्या लेखिका सुधा मूर्ती या वाचकांना हाताला धरून या अनोख्या, अज्ञात प्रदेशात घेऊन जातात. प्राचीन युगातील या तीन अत्यंत शक्तिशाली देवतांविषयीच्या अद्भुतरम्य कथा त्या वाचकांसमोर उलगडतात. कथा संग्रहातील प्रत्येक कथा तुम्हा सर्वांना एका वेगळ्याच मंतरलेल्या विश्वात घेऊन जाईल. त्या कथा ज्या कालखंडात घडतात, तेव्हाच्या व्यक्ती मनोवेगाने दूरदूरच्या प्रदेशात भ्रमंती करू शकतात, यातले प्राणी उडू शकतात आणि यात पुनर्जन्म तर नेहमीच होत असतात.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":46043008532694,"sku":null,"price":210.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-51bTT8shmCL.jpg?v=1744862967"},{"product_id":"aajobanchya-potaditlya-goshti-sudha-murty","title":"आजोबांच्या पोतडीतल्या गोष्टी ( Aajobanchya Potaditlya Goshti )","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eभारतातल्या आघाडीच्या बालसाहित्यकार सुधा मूर्ती यांच्या लेखणीतून उतरलेल्या कथामालिकेतील एक नवीन रोमांचकारी साहसकथा !  \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":46404224385238,"sku":null,"price":219.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-4090.jpg?v=1744862102"},{"product_id":"sachitra-ramayan-and-sachitra-mahabharat-combo-2-books","title":"SACHITRA RAMAYAN AND SACHITRA MAHABHARAT COMBO SET of 2","description":"\u003cp\u003e\u003cmeta charset=\"utf-8\"\u003e\u003cspan\u003eव्यासांनी महाभारत का लिहिलं... ते कुणी लिहून घेतलं... देवव्रताचा भीष्म कसा झाला...कौरव-पांडवांचा, कर्णाचा जन्म कसा झाला...वुंÂतीने कर्णाचा त्याग का केला...कर्ण पराक्रमी असूनही त्याच्या वाट्याला अवहेलना का आली... लाक्षागृहात पांडवांना जाळून मारण्याची योजना कुणी केली आणि ती कुणी फिस्कटवली...द्रौपदी स्वयंवराच्या वेळी अज्ञातवासात असलेले पांडव तिथे कसे प्रकट झाले...शकुनी आणि दुर्योधनाने युधिष्ठिराला द्यूत खेळण्याचं आमंत्रण का दिलं... द्रौपदीला भर सभेत फरपटत आणून तिचं वस्त्रहरण करू पाहणाNया दु:शासनाची कशी फजिती झाली...कौरवांनी घातलेली बारा वर्षांच्या वनवासाची आणि एक वर्षाच्या अज्ञातवासाची अट पांडवांनी कशी पूर्ण केली...कौरव-पांडव युद्ध का झालं...त्याचा परिणाम काय झाला...या सगळ्या प्रश्नांची उत्तरं बालदोस्तांनो तुम्हाला मिळतीRल महाभारतात...आणि हे महाभारत सचित्र आहे दोस्तांनो, त्यामुळे कौरव-पांडव, वुंÂती, भीष्म इ. तुम्हाला चित्रांतून भेटणार आहेत. आमची ही सचित्र भेट तुम्हाला नक्कीच आवडेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":46896063545558,"sku":"","price":590.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-3289.jpg?v=1747813544"}],"url":"https:\/\/www.pustakcity.in\/collections\/fairy-tales-folk-tales-myths-for-children.oembed","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}