{"title":"Gautam Buddha Books","description":"","products":[{"product_id":"बुद्ध-आणि-त्यांचा-धम्म-buddha-ani-tyancha-dhamma","title":"बुद्ध आणि त्यांचा धम्म (Buddha Ani Tyancha Dhamma)","description":"\u003cp\u003eडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे रामायण-महाभारत हे ग्रंथ वाचून समाधान झाले नाही तेव्हा ते बुद्धांकडे वळले. बौद्ध धर्म हा एकमेव असा धर्म आहे की, विज्ञानाने जागृत झालेला समाज तो सहर्ष स्वीकारील. मानवासाठी कल्याणकारी असणाऱ्या या धर्मात उच्च-नीच, श्रेष्ठ-कनिष्ठ, स्त्री-पुरुष, स्पृश्य-अस्पृश्य असा कोणताही भेद नाही. समानता हेच तत्त्व या धम्मात व्यापून आहे. बहुजन हिताय, बहुजन सुखाय हे या धम्माचं मध्यवर्ती सूत्र आहे. हे तत्त्वज्ञान त्यांनी 'बुद्ध आणि त्यांचा धम्म' या ग्रंथातून विस्तृतपणे मांडलेले आहे. गौतम बुद्धांच्या जीवन आणि तत्त्वज्ञानावर, समाजातील मौलिक प्रश्नांवर विवेचन करणारा हा एकमेवाद्वितीय ग्रंथ होय. सबंध मानवास समृद्ध जीवन जगण्याचा मार्ग दाखवणारा हा एक प्रमाण ग्रंथ म्हणता येईल.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eडॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला हा अखेरचा ग्रंथ असून त्यांच्या सर्व ग्रंथांत या ग्रंथाला सर्वाधिक महत्त्व आहे. त्यांची भूमिका धर्मचिकित्सकाची होती. तर्काला पटेल ते स्वीकारायचं आणि न पटेल ते नाकारण्याचं धम्मात दिलेलं स्वातंत्र्य घेऊनच 'बुद्ध आणि त्यांचा धम्म' हा ग्रंथ त्यांनी लिहिला.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमूळ इंग्रजीत असणारा हा ग्रंथ मराठी, हिंदी, गुजराती, तेलगू, तमिळ, कन्नड, पंजाबी आदी भाषांत अनुवादित झालेला आहे. या ग्रंथावर 'अ जर्नी ऑफ सम्यक बुद्ध' हा चित्रपटसुद्धा प्रदर्शित झालेला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eगौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर ज्यांची प्रगाढ निष्ठा आहे त्यांच्यासाठी आणि विद्यार्थी, ज्ञानसाधक, अभ्यासक आदींना प्रस्तुत ग्रंथ नक्कीच अत्यंत उपयुक्त ठरेल.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e“विज्ञानाने जागृत झालेला समाज स्वीकारू शकेल असा एकमेव बुद्धांचा धम्म आहे, त्याशिवाय हा समाज नष्टप्राय होऊन जाईल. या आधुनिक जगात बौद्ध धर्म हा असा एकच धर्म आहे जो मानवजातीचे रक्षण करू शकेल.'\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45313759838422,"sku":null,"price":549.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-1000227379.jpg?v=1744866150"},{"product_id":"buddhancha-bodhkatha-biography-buddhism-babasaheb","title":"बुद्धांचा धम्म आणि बोधकथा (Buddhancha Dhamma Ani Bodhkatha)","description":"\u003cp\u003e\u003cmeta charset=\"utf-8\"\u003e\u003cspan\u003e“ ‘थांब श्रमणा, थांब.’\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eत्याचे हे शब्द कानी पडताच तथागत म्हणाले, ‘मी तर थांबलो आहे अंगुलिमाल; पण आता तूदेखील थांब. हे दुष्कर्म करण्याचं आता तरी थांबव.’\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअंगुलिमाल आश्चर्यानं तथागतांकडे बघू लागला. त्याला काहीच समजेनासं झालं. तथागतांना पाहून तो भारावून गेला.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eतेव्हा तथागत त्याला म्हणाले, ‘बरं! असं कर, मला त्या झाडाचं एक पान तोडून दे.’\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअंगुलिमालनं पटकन एक पान तोडून तथागतांना दिलं.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e‘आता हे पान परत त्या झाडावर लाव,’ तथागतांनी अंगुलिमालला सांगितलं.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e‘काय?’ अंगुलिमाल आश्चर्यानं म्हणाला.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eतथागत शांतपणे म्हणाले, ‘होय. आता हे पान परत त्या झाडावर लाव.’\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e‘हे कसं शक्य आहे भन्ते. हे असं करणं शक्य तरी आहे का? झाडाचं तुटलेलं पान पुन्हा झाडाला कसं काय जोडलं जाऊ शकतं?’ अंगुलिमाल म्हणाला.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e‘तू हे पान पुन्हा जोडू शकत नाहीस तर मग ते तोडलंसच का? याचाच अर्थ असा आहे अंगुलिमाल की, जर तू कुणाला जीवन देऊ शकत नसशील तर मग तुला इतरांचं जीवन हिरावून घेण्याचाही काही अधिकार नाही. तेव्हा सन्मार्गावर ये अंगुलिमाल,’ त्याला समजावत तथागत म्हणाले.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eतथागतांचे हे शब्द ऐकून अंगुलिमालच्या अंतरात्म्यातील अहिंसक जागा झाला आणि अंगुलिमाल त्यांच्या चरणी लीन झाला.”\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e- प्रस्तुत पुस्तकातून\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eबौद्ध धर्मातील प्रज्ञा, शील, करुणा, नैतिकता, सदाचार आणि सद्गुण आदी तत्त्वांची शिकवण देणारे हे पुस्तक सर्वांना आदर्श जीवन जगण्यासाठी मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c!----\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45624472109270,"sku":null,"price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-81so4Q29iTL._SL1500_6a460700-4945-4def-8a14-7f2e015709b1.jpg?v=1744865177"},{"product_id":"बुद्ध-चरित्र-buddha-charitra","title":"बुद्ध चरित्र (Buddha Charitra)","description":"\u003cp\u003e\u003cmeta charset=\"utf-8\"\u003e\u003cspan\u003eगेल्या अडीच हजार वर्षांपासून मानवी संस्कृतीला बौद्धधर्म सुपरिचित आहे. जगभरातील जवळजवळ अर्ध्या भूभागावर पसरलेल्या या धर्माची नव्याने ओळख करून देण्याचे महत्त्वाचे काम आचार्य धर्मानंद कोसंबी यांनी केले.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eबौद्धधर्म जागतिक संस्कृतीला मिळालेली अलौकिक देणगी आहे. बुद्धलीला सारसंग्रहातील बुद्ध चरित्र हा भाग या ग्रंथातील कथांमध्ये धर्मानंद कोसंबी यांनी उत्तम प्रकारे सादर केलेला आहे. बौद्धधर्माचे मूळचे शुद्ध स्वरूप नव्या युगाच्या प्रेरणांशी सुसंगतपणे जुळवून घेण्याचे काम बुद्ध चरित्र हा ग्रंथ करतो.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआचार्य धर्मानंद कोसंबी (ऑक्टोबर ९, १८७६- जून २४, १९४७) हे एक अद्वितीय विद्वान, बौद्धधर्म, पाली भाषेचे अभ्यासक व लेखक होते. वयाच्या २३ व्या वर्षी गोव्यातील आपले घर व कुटुंब सोडून तथागत बुद्धांच्या उपदेशाच्या शोधात अनेक संकटांचा सामना करीत त्यांनी नेपाळ, सिलोन, ब्रम्हदेश वगैरे देशांत फिरून बौद्ध साहित्य आणि बौद्ध धर्मसाधना यांचे अनुशीलन केले. कोसंबी यांनी श्रीलंकेत जाऊन तेथील विद्योदय विद्यापीठात बौद्धधर्माचा व तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला. तसेच म्यानमारमध्ये (ब्रह्मदेश) जाऊन त्यांनी ब्रह्मी भाषेतील बौद्ध साहित्याचा तौलनिक अभ्यास केला.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआचार्य धर्मानंद कोसंबीरचित प्रस्तुत बुद्ध चरित्र अत्यंत रसाळ असून गौतम बुद्धाचा इतिहास जाणून घेण्यास आतुर असलेल्या उपासकांची तहान शमविणारे आहे. जरा, व्याधी आणि मरण यांचं अवलोकन करून अशांत झालेला सिद्धार्थ आणि त्यानंतर गृहत्याग करून निर्वाणपदाकडे वाटचाल करणाऱ्या गौतम बुद्धांचं सुभग दर्शन आपल्याला या चरित्रातून घडते.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c!----\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45626902380758,"sku":null,"price":200.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-81L-YsQsKdL._SL1500_efd58cca-fa36-4c7e-ba5f-4e4d5c8c9a24.jpg?v=1744865163"},{"product_id":"गौतम-बुद्धांचे-चरित्र-gautam-buddhanche-charitra","title":"गौतम बुद्धांचे चरित्र (Gautam Buddhanche Charitra)","description":"\u003cp\u003e\u003cmeta charset=\"utf-8\"\u003e\u003cspan\u003eया चरित्रग्रंथात गौतम बुद्धांबद्दलचा भाबडा आदर कुठेही दिसून येत नाही. त्याऐवजी एक प्रकारचे ज्ञानोत्तर भारावलेपण मात्र या ग्रंथात व्यक्त झाले आहे. या भारावलेपणामुळेच हा ग्रंथ कमालीच्या ओघवत्या भाषेत प्रकट झालेला आहे. प्रस्तुत चरित्रग्रंथ जास्तीत जास्त मराठी वाचकांनी अवश्य वाचायला हवा. बुद्धाच्या एकंदर बोधाचे सार मिळून इतकेच आहे की, मनुष्यांनी योग्य, सत्य व कल्याणप्रद असे ज्ञान प्राप्त करून तद्नुसार वर्तन करण्याचा दृढ संकल्प करावा आणि कष्ट करून मनोनिग्रह करण्यास झटावे आणि एकंदर प्राणिमात्रावर दया करावी व त्यास स्वशक्यनुसार साहाय्य करण्यास सर्वदा तत्पर असावे. असे केल्याने मनुष्यास परमसौख्य लाभण्यासारखे असून त्याच्या जीविताचे सार्थक्य ह्यातच आहे. याप्रमाणे ज्याने आपल्या अलौकिक बुद्धिबलाने व अप्रतिम नीतितेजाने सर्व जगास ऋणी केले आहे, त्या जगद्गुरूचा जन्म आमच्या या भारतभूमीत झाल्याबद्दल आम्हास मोठा अभिमान वाटणे साहजिक आहे आणि अशा अलौकिक साधुपुरुषाचा चरित्रमहिमा समजून घेण्याविषयी आमच्या मनात उत्कट इच्छा उत्पन्न झाली पाहिजे. ह्या हृदयवृत्तीस वश होऊन आम्ही हे जगद्गुरू गौतम बुद्धाचे चरित्र यथाशक्ती महाराष्ट्र जनांस साद्यंत कथन केले आहे. ते चित्तपूर्वक वाचून ह्या महापुरुषाविषयी ते आपली यथार्थ बुद्धी करितील अशी उमेद आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e‘‘दादा केळूसकरांनी दिलेल्या पुस्तकामुळे मी बुद्धाकडे वळलो. त्या लहान वयातसुद्धा रिकाम्या डोक्याने मी बुद्धाकडे गेलो नाही. मला पार्श्वभूमी होती आणि बुद्धाच्या जीवनावरील पुस्तक वाचताना मी तुलना व भेद करीत असे. बुद्ध आणि त्यांचा धम्म यांच्यात रस घेण्याची ही माझी सुरुवात होती.’’\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e-डॉ.बाबासाहेब आंबेडकर\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eकृ.अ. केळूसकर हे गेल्या शतकातील मोठे विचारवंत, विख्यात चरित्रकार. गौतम बुद्ध, संत तुकाराम आणि छत्रपती शिवाजी या युगपुरुषांचे ते पहिले महत्त्वाचे चरित्रलेखक.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eगुरुवर्य केळूसकरांमुळेच डॉ. आंबेडकरांसारखे नेते समाजास मिळाले. जनात जनार्दन पाहणारे ते ऋषितुल्य प्रज्ञावंत होेते. मामा परमानंद, न्या. रानडे या विचारवंतांनी त्यांच्या लेखणीची व विचारांची त्या काळात प्रशंसा केली.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eधर्मशास्त्र, इतिहास, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, तत्त्वज्ञान, शिक्षणशास्त्र या चौफेर विषयांतील ते पंडित होते. महात्मा फुले यांची सत्यशोधक चळवळ आणि मराठा ऐक्येच्छू सभेसाठी त्यांनी आयुष्यभर काम केले. ते गीता आणि बौद्ध धर्माचे भाष्यकार होते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eपुरोगामी महाराष्ट्राने केळूसकरांच्या एकूण लेखनाची म्हणावी तशी दखल घेतली नाही.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमहाराजा सयाजीराव गायकवाड यांनी जशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुण हेरून मदत केली तशीच मदत केळूसकरांनाही केली. गायकवाड ओरिएंटल सिरीजमध्ये ‘गौतम बुद्धांचे चरित्र’ हा ग्रंथ प्रकाशित केला. त्यामुळेच पहिल्यांदा गौतम बुद्धांची ओळख ठळकपणे मराठी वाचकांस झाली.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e‘‘गौतम बुद्धांचे चरित्र हा मराठी भाषेतील उत्कृष्ट ग्रंथ आहे.’’\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e- डॉ. धनंजय कीर\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c!----\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45633128956118,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-81Dgm6rXK4L._SL1500_2e006ea3-d4b8-439a-a5a3-cfa1f5734e49.jpg?v=1744865142"},{"product_id":"siddhartha","title":"Siddhartha","description":"\u003cp\u003e\u003cmeta charset=\"utf-8\"\u003e\u003cspan\u003eSet in India during the time of the Buddha, \u003c\/span\u003e\u003cspan class=\"a-text-italic\"\u003eSiddhartha\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan\u003e;is the most influential and famous novel of Nobel Prize-winning author Hermann Hesse.\u003cbr\u003eDesiring spiritual fulfillment, Siddhartha, a young Brahmin, leaves his home to become an ascetic-and on his journey meets the wise Gotama, the famous Buddha. But Siddhartha believes no teacher, however great, can discover meaning for an individual-and so continues alone on his quest to find himself.\u003cbr\u003eIn his journey Siddhartha experiences life as a pious brahmin, a Samana, a rich merchant, a lover, and a father-shifting between decadence and asceticism as he navigates the material world. Still unhappy, still unfulfilled, Siddhartha is on the verge of giving it all up when he encounters the ferryman. The events that follow change his life forever.\u003cbr\u003eThought-provoking, inspiring, and utterly profound-this spiritual novel has influenced generations of readers, writers, and thinkers.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c!----\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45633145307350,"sku":null,"price":299.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-61zprwDgdvL._SL1000_3fd96eff-e110-4209-b567-6b020b675ea9.jpg?v=1744865141"},{"product_id":"तथागत-tathagat","title":"तथागत (Tathagat)","description":"\u003cp\u003e\u003cmeta charset=\"utf-8\"\u003e\u003cspan\u003e'तथागत' कादंबरीबाबत – ★ कादंबरी आत्मनिवेदन शैलीत लिहिली आहे. तथागतांच्या जीवनातील मुख्य व्यक्तिरेखा वाचकांना तथागतांचे चरित्र सांगतात, अशी रचना आहे. ★ तथागत गौतम बुद्धांची पत्नी यशोधरा, पिता शुद्धोधन, शिष्य सारिपुत्त, शिष्या खेमा अशा एकूण ६ व्यक्तिरेखा कथा सांगतात. ★ कादंबरी ५०२ पानांची आहे. उत्तम बांधणी, UV कोटिंगचे मुखपृष्ठ आणि व्यक्तिचित्रांमुळे वाचकांना अधिक प्रभावित करावे, असा प्रयत्न आहे. ★ तथागतांच्या जीवनाचे अनेक अज्ञात पैलू यातून उलगडतात. जन्म ते निर्वाण हा संपूर्ण प्रवास कादंबरीत आला आहे. ★ सत्याचा शोध आणि सामाजिक क्रांती हादेखील कादंबरीचा प्रमुख विषय आहे. वाचकांनी या कादंबरीचे स्वागत करावे आणि ही कादंबरी वाचून अवश्य अभिप्राय कळवावा. About the novel 'Thathagata' – ★ The novel is written in autobiographical style. The main characters in the life of the Tathagata tell the reader the biography of the Tathagata. ★ Tathagata Gautama Buddha's wife Yashodhara, father Suddhodhana, disciple Sariputta, disciple Khema tells the story. ★ The novel has 502 pages. Premium paper, UV coated cover and sketches are included. ★ Many unknown aspects of Tathagata's life are revealed in it. The entire journey from birth to nirvana is described in the novel. ★ Search for truth and social revolution is also a major theme of the novel.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c!----\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45633220509910,"sku":null,"price":360.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-81sUkYXoVTL._SL1500_fefda279-6007-4ea8-b6b1-ec124f8fdf1c.jpg?v=1744865139"}],"url":"https:\/\/www.pustakcity.in\/collections\/gautam-buddha-books.oembed","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}