{"title":"Manovikas Prakashan","description":"","products":[{"product_id":"intelligent-investor-marathi-benjamin-graham","title":"द इंटेलिजंट इन्व्हेस्टर (The Intelligent Investor)","description":"\u003ch1 class=\"heading-title\"\u003eThe Intelligent Investor- value investigations sambandhicha antim shabda (Marathi)\u003c\/h1\u003e\n\u003cp\u003e\u003cmeta charset=\"utf-8\"\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eद इंटेलिजंट इन्व्हेस्टर\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"MsoNormal\"\u003e\u003cspan\u003eविसाव्या शतकामधला सर्वोत्तम गुंतवणूक सल्लागार असलेल्या बेंजामिन ग्रॅहॅमनं जगभरातल्या लोकांना शिकवलं आणि प्रोत्साहित केलं. 1949 सालापासून हे पुस्तक ‘शेअरबाजारामधल्या गुंतवणुकीसाठीचं बायबल’ म्हणून ओळखलं जातं. यात ग्रॅहॅमनं गुंतवणूकदारांचं कमालीचं नुकसान होऊ नये यासाठी ‘व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग’ची संकल्पना कशी वापरायची याचं विवेचन केलं आहे. ग्रॅहॅमच्या धोरणांमधल्या चातुर्याचा अनुभव शेअरबाजारामधल्या गेल्या अनेक वर्षांमधल्या घडामोडींदरम्यान आलेलाच आहे. ग्रॅहॅमच्या मूळ लिखाणाला धक्का न लावता अर्थक्षेत्रामधला मान्यवर पत्रकार म्हणून ओळखल्या जाणार्या जेसन झ्वाईग यांची अद्ययावत टिप्पणी या पुस्तकात समाविष्ट करण्यात आलेली आहे. यामुळे आजच्या शेअरबाजाराशी सुसंगत असलेल्या मुद्द्यांनाही हे पुस्तक स्पर्श करतं. तसंच ग्रॅहॅमनं दिलेली मूळ उदाहरणं आणि आजच्या आर्थिक विषयांबद्दलचे मथळे यांच्यामधलं साम्यही अधोरेखित होतं. तसंच ग्रॅहॅमच्या तत्त्वांचा नेमका कसा वापर करायचा याची आणखी सखोल जाण वाचकांना लाभते. आपली आर्थिक उद्दिष्टं कशी गाठायची याविषयीचं हे सगळ्यात महत्त्वाचं आणि अजोड पुस्तक आहे.\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45844894253270,"sku":null,"price":470.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/TheIntelligentInvestor-800x800_a70a0485-5f2e-4a2c-b992-b47bd4681903.jpg?v=1755536225"},{"product_id":"शोध-स्वामी-विवेकानंदांचा-shodh-swami-vivekanandancha","title":"शोध स्वामी विवेकानंदांचा (Shodh Swami Vivekanandancha)","description":"\u003cp\u003e\u003cmeta charset=\"utf-8\"\u003e\u003cspan\u003eकाही माणसं युगायुगातून एकदाच जन्माला येतात. स्वामी विवेकानंद हे असेच एक युगपुरुष. कोणत्याही चौकटीत न बसणारे ते एक महान व्यक्ती होते. त्यांचं मोठेपण सिद्ध करणारं हे डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर यांचं हे पुस्तक. विवेकानंद : एक महामानव, परिवर्तनाच्या चळवळीतील अग्रदूत, विवेकानंद : धर्म आणि विज्ञान, विवेकानंद कोण होते? या प्रकरणांमधून विवेकानंदांच्या प्रवर्तक विचारांचं विवेचन लेखकानं केलं आहे. धर्म, समाज, तरुण पिढी आदींसंबंधीची त्यांची भूमिका त्यातून समजते. स्वामी विवेकानंदांच्या काही पत्रांचा समावे पुस्तकात केला आहे. १८८८ ते १९०२ या काळादरम्यानची धडपड, तळमळ समजून येते. एकूणच विवेकानंदांकडे पाहण्याची वेगळी दृष्टी या पुस्तकातून आपल्याला मिळते.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":47169001291990,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/shodh-swami-vivekanandancha-463-800x800.jpg?v=1755536847"},{"product_id":"turungrang-by-adv-ravindranath-patil-तुरुंगरंग","title":"तुरुंगरंग (Turungrang)","description":"\u003cp\u003e\u003cmeta charset=\"utf-8\"\u003e\u003cspan\u003eमला ‘अंडरट्रायल` अर्थात कच्चा कैदी म्हणून येरवडा जेलमध्ये काही \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eकाळासाठी स्थानबद्ध केलं गेलं होतं. तत्पूर्वी आयपीएस अधिकारी \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eम्हणून आणि कायद्याचा विद्यार्थी म्हणून मी जेलला भेट दिली होती.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eपरंतु त्यावेळी न दिसलेले तुरुंगाचे अंतरंग मला कच्चा कैदी म्हणून \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eवावरताना दिसले. त्याचबरोबर तुरुंगातल्या इतर बंद्यांच्या एका\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eवेगळ्या भावविश्वाचं दर्शन घडलं. त्यातून कैदी जेलच्या कोंडवाड्यामध्ये \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eजगतात कसे, वागतात कसे नि रमतात कसे याचं वास्तव चित्रण शब्दबद्ध \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eकरण्याचा प्रयत्न मी या ‘तुरुंगरंग`मध्ये केला आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअर्थात माणूस गुन्हेगार का होतो आणि समाज म्हणून आपण त्याला\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eगुन्हेगारीपासून कसं परावृत्त करू शकतो हेही मला इथं सांगायचं आहे. \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eइतकंच नाही, तर तुरुंगात कैद्यांचं आयुष्य जसं पणाला लागतं तसंच \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eफौजदारी न्यायप्रक्रियाही कशी कैद होते याची स्पष्ट जाणीव करून \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eदेण्याचाही माझा प्रयत्न आहे. वाचक म्हणून आपण माझ्या या पहिल्याच\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eपुस्तकाचं स्वागत कराल अशी आशा.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eजेल आणि कैदी सुधारणा हा विषय तसा दुर्लक्षित राहिला आहे. जेल \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसुधारणांसाठी कैद्यांची दुसरी बाजू ऐकणे आणि त्यांच्या मानसिक \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eस्थितीचा उलगडा करणे, हे अत्यावश्यक आहे. मला खात्री आहे की,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e‘तुरुंगरंग` हे पुस्तक समाजात जागृती निर्माण करेल. किंबहुना प्रशासन \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eजेलकडे केवळ दंड देण्याची जागा म्हणून न पाहता कैद्यांची वर्तणूक \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसुधारण्यासाठीचे एक साधन म्हणून बघेल आणि त्या अनुषंगाने नीती \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआखेल. \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eज्ञानेश्वर पाटील \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआयएएस (मध्य प्रदेश कॅडर)\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eरवींद्रनाथ पाटील यांच्यातील उत्कृष्ट मार्गदर्शक, अधिकारी आणि प्रशासकही \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआम्ही यापूर्वी बघितला आहे. आता या पुस्तकाच्या निमित्तानं त्यांच्यातल्या \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eउत्कृष्ट लेखकाचं दर्शन घडतंय. त्यांचं हे अत्यंत वेगळ्या विषयावरचं पुस्तक \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eप्रत्येकानं वाचावं असंच आहे. \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eडॉ. शिवानंद बिडवे \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eतहसीलदार, महाराष्ट्र राज्य\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eTurungrang | Adv. Ravindranath Patil \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eतुरुंगरंग । ॲड. रवींद्रनाथ पाटील\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":47169008140502,"sku":null,"price":460.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/TurungrangCover-800x800.jpg?v=1755537421"},{"product_id":"varun-te-bahirjee-वरुण-ते-बहिर्जी","title":"वरुण ते बहिर्जी (Varun te Bahirjee)","description":"\u003cdiv class=\"product-tabs\"\u003e\n\u003cdiv class=\"tabs-content\"\u003e\n\u003cdiv class=\"tab-pane tab-content active\" id=\"tab-description\"\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eहा शोध आहे बहिर्जी नाईक यांचा.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eछत्रपती शिवाजी महाराजांच्या हेरप्रमुखाचा\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआणि त्याच बरोबर शिवरायांच्या हेरसंस्थेचा. \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eशिवरायांची ही हेरव्यवस्था कशी होती?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eतिचे स्वरूप कसे होते, तिची व्याप्ती किती होती? \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमुख्य म्हणजे त्यामागील विचार कोणता होता?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअनेक प्रश्न. त्यांची उत्तरे शोधताना आपल्याला\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eजावे लागते भारतीय राजनीतिच्या प्राचीन इतिहासात,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eहेरगिरीच्या प्राचीन परंपरांकडे, ऋग्वेद, रामायण, \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमहाभारत, कौटिल्य, कामंदक, संत तिरुवळ्ळुवर, \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eकृष्णदेवराय आणि अगदी \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eकुराण आणि पैगंबरांकडेही.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e‘वरुण ते बहिर्जी’\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआख्यायिका, दंतकथा, फेककथा यापलीकडे जाऊन \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eघेतलेला हा हेरगिरीच्या विचारप्रवाहाचा वेध.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eVarun te Bahirjee | Ravi Amale \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eवरुण ते बहिर्जी । रवि आमले\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":47169019871446,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/Varun_te_Bahirji_RevisedcoverArtwork_Version13-800x800.jpg?v=1755538099"},{"product_id":"chhatrapati-sambhaji-maharaj-ismail-pathan","title":"छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj)","description":"\u003cp\u003e\u003cmeta charset=\"utf-8\"\u003e\u003cspan\u003eडॉ. पठाण यांच्या संभाजी चरित्राचे वैशिष्ट्य काय? \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eया प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा जेव्हा आम्ही प्रयत्न केला\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eतेव्हा आमच्या लक्षात आले की, \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eएका धर्मनिरपेक्षवादी मुस्लीम लेखकाने\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eलिहिलेले हे महाराष्ट्रातील पहिले संभाजी चरित्र आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआज समाजातील काही विशिष्ट गट\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसंभाजी महाराजांनी दिलेल्या लढ्यास हिंदू विरुद्ध मुस्लीम \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअसा रंग देऊन तो धार्मिक लढा होता,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअसे भासवून या राजास ‘धर्मवीर' म्हणून घोषित करीतअसताना\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eया ग्रंथाने या घोषणेला छेद दिला आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eऔरंगजेबाने सुरु केलेले हे युद्ध\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eखऱ्या अर्थाने साम्राज्यवादी होते व त्याला विरोध करून\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eत्याच्याशी लढणाऱ्या मराठ्यांचे युद्ध हे त्याच अर्थाने स्वातंत्र्यवादी होते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eइथे हिंदू विरुद्ध मुस्लीम असा धर्माचा काही प्रश्नच निर्माण होत नाही,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eहे ऐतिहासिक सत्य डॉ. पठाण यांच्या या ग्रंथातून दृग्गोचर होते आहे आणि\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eहेच सत्यकथन या ग्रंथाचे यश आहे असे आम्हांस वाटते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e- डॉ. जयसिंगराव पवार\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eज्येष्ठ इतिहासकार\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eChhatrapati Sambhaji Maharaj | Dr. Ismail Pathan\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eछत्रपती संभाजी महाराज । डॉ. इस्माईल पठाण\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":47169033044182,"sku":null,"price":345.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/Chh.SambhajiMaharaj-800x800.jpg?v=1755538501"},{"product_id":"shivrayanchi-dharmaniti","title":"शिवरायांची धर्मनीती (Shivarayanchi Dharmneeti)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eधर्माभिमानीही होते, तरीही ते धार्मिक स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते होते. त्यांनी नेहमीच सहिष्णुतेचे धोरण अवलंबले आणि आपल्या राज्यात सर्व जातिधर्मांच्या लोकांना आश्रय दिला. इतकंच नाही, तर कोणत्याही स्वरूपात धर्मभेद, जातीभेद न करता महाराजांनी शूर, पराक्रमी आणि एकनिष्ठ लोक आपल्याभोवती गोळा केले. त्यांनी कायमच हिंदू आणि मुस्लीम धर्माबद्दल उदार आणि पुरोगामी दृष्टिकोन बाळगला. स्वराज्यातील सर्व धर्मांच्या बांधवांना सन्मान देत सामाजिक सलोखा निर्माण करत सर्वार्थाने हिंदवी स्वराज्य बळकट केले. जगभरात सर्वांनीच गौरविलेल्या शिवरायांच्या या सहिष्णू धार्मिक धोरणाची प्राचार्य डॉ. इस्माईल पठाण यांनी आपल्या या ग्रंथात साधार, तपशीलवार चर्चा केली असून समाजस्वास्थ्याच्या दृष्टिकोनातून ती मार्गदर्शक ठरणारी अशी आहे. वाचक त्याचं दमदार स्वागत करतील अशी आशा.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":47171350233302,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-dharmaneeti.jpg?v=1755616233"},{"product_id":"सवयीचे-गुलाम-savayiche-gulam","title":"सवयीचे गुलाम (Savayiche Gulam)","description":"\u003cp class=\"MsoNormal\"\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003eशरीराला आणि मनाला सवयी का व कशा लागतात त्यामागील शरीरक्रिया आणि मनोव्यापार कोणते नियमित आहार आणि निद्रा\u003c\/span\u003e\u003cspan\u003e, \u003cspan lang=\"HI\"\u003eव्यायाम आणि सकाळचा प्रसन्न उत्साह या सवयींतून प्रकृती..\u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003eगैरशिस्त\u003c\/span\u003e\u003cspan\u003e, \u003cspan lang=\"HI\"\u003eअव्यवस्थितपणा\u003c\/span\u003e, \u003cspan lang=\"HI\"\u003eव्यसनं आणि भयभीतता या सवयमधून विकृती... आणि\u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003eवक्तशीरपणा\u003c\/span\u003e\u003cspan\u003e, \u003cspan lang=\"HI\"\u003eवागण्या-बोलण्यातील आदब आणि सभ्यपणा या सवयींतून संस्कृती व्यक्त होते.\u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003eआपल्याला वाटचाल करायची आहे विकृतीकडून... संस्कृतीकडे !\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"MsoNormal\"\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003eवाईट सवयीमधून सुटका हा फक्त एका क्षणाचा प्रश्न असतो. नकळत घडणाऱ्या चुकीच्या कृतीला टाळायचं असल्यास एखादा क्षणही\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003eपुरेसा असतो. तो क्षण असतो तल्लख आत्मभान बाळगण्याचा.\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003eतो क्षण असतो मोहातून स्वत:ला सोडविण्याचा.\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003eतो क्षण असतो एखाद्या दीर्घ श्वासाकरता\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003eत्या दीर्घ श्वासानं मनात सुविचाराला जागा मिळते.\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003eत्या दीर्घ श्वासानं क्षणकाल डोळे मिटून आपण मनात तटस्थ भाव जागृत करतो. त्या दीर्घ श्वासानं मनातील मोह\u003c\/span\u003e\u003cspan\u003e, \u003cspan lang=\"HI\"\u003eभीती\u003c\/span\u003e, \u003cspan lang=\"HI\"\u003eकाळजी आणि धास्ती मिटते. त्या दीर्घ श्वासानं मनाला हुरूप येतो. मनातील आत्मविश्वास खडबडून जागा होतो\u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eSavaiche Gulam : Dr.Rajendra Barve\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसवयीचे गुलाम  : डॉ. राजेंद्र बर्वे   \u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":47194040959190,"sku":null,"price":145.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/Habit_savaichegulam_CQ-800x800.jpg?v=1756029947"},{"product_id":"indias-most-fearless-set-marathi","title":"इंडियाज मोस्ट फिअरलेस (India's Most Fearless Set)","description":"\u003ch2\u003ePulwama, Balakot आणि Galwan येथील रणांगणावर लढलेले शूरवीर\u003c\/h2\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eIndia's Most Fearless Set 1 2 3 by Shiv Aroor \u0026amp; Rahul Singh, Sandhya Ranade, Sayali Paranjpe, Dr. Asha Bhagwat\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eइंडियाज मोस्ट फिअरलेस, इंडियाज मोस्ट फिअरलेस 2, इंडियाज मोस्ट फिअरलेस 3\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eभारतीय लष्करी दलांमधील शौर्याच्या सत्यकथा एल.ओ.सी.च्या पलीकडे जाऊन सप्टेंबर 2016मध्ये\u003cbr\u003eपाकिस्तानी अतिरेक्यांच्या ठाण्यांवरच्या यशस्वी हल्ल्याचे नेतृत्व करणारे मेजर, 11 दिवसांत 10 अतिरेक्यांना ठार मारणारा सैनिक, कुठल्याही क्षणी युद्ध सुरू होणार्या भूमीवरून शेकडो लोकांची\u003cbr\u003eसुटका करण्यासाठी, भयावह वातावरणातल्या बंदरावर जहाज घेऊन जाणारे नौदलातले अधिकारी आणि रक्तबंबाळ स्थितीतही जळतं जेट विमान चालवणारा हवाई दलाचा पायलट! ह्या सगळ्यांच्या शौर्याचा कस लावणार्या घटनांचं हे कथन!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":47194276167894,"sku":null,"price":984.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/India_s_Most_Fearless_Set_1_2_3_by_Shiv_Aroor_Rahul_Singh_Sandhya_Ranade_Sayali_Paranjpe_Dr._Asha_Bhagwat_600x_fa47e82c-7b12-4778-aff1-eaf53dbce282.png?v=1756045220"},{"product_id":"aatle-dole-आतले-डोळे-marathi","title":"आतले डोळे (Aatle Dole)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसमजा, अचानक असं घडलं, की तुमचा डावा हात तुमचा राहिला नाही…\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eतो स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असल्यासारखा वागू लागला!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eतुम्ही उजव्या हाताने शर्टाची बटणं लावताय आणि डावा हात\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eतुमचं न ऐकता ती काढू लागला तर…?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसमजा, तुम्हाला कोणताही दृष्टिदोष नाहीये. तुम्हाला दूरचं-जवळचं,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eलहान-मोठं सर्व दिसतंय. गुलाबाचं फूल दाखवताच तुम्हाला ते\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eगुलाब म्हणून तर सोडा; पण एक प्रकारचं फूल म्हणूनदेखील\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eओळखता येत नसेल तर…?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eएक दिवस अचानक तुम्हाला अर्धं जगच दिसेनासं झालं तर…?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसमजा, तुम्हाला कोणीही दिसत नसताना,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eशोधूनदेखील कोणी सापडत नसताना, इतरांना ऐकू न येणारे\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eकुणाच्या बोलण्याचे-खिदळण्याचे आवाज ऐकू येत असतील तर…?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअसे आणि अशा तऱ्हेचे अनाकलनीय अनुभव कोणाला येत असतील तर…?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eतर, ते ना काळी जादू आहेत, ना जादूटोणा, ना भुताटकी!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eही आपल्या मेंदूच्या कार्यपद्धतीत बिघाड झाल्याची लक्षणं आहेत.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअशाच चमत्कारिक वाटणाऱ्या लक्षणांची-अनुभवांची चर्चा\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eएका संवेदनशील मनोविकारतज्ज्ञाच्या नजरेतून करण्याचा प्रयत्न\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eम्हणजे हे पुस्तक!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eAatle Dole | Dr. Rupesh Patkar\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआतले डोळे । डॉ. रुपेश पाटकर\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":47211267653846,"sku":null,"price":280.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/WhatsAppImage2024-11-27at3.10.05PM-800x800.jpg?v=1756386109"}],"url":"https:\/\/www.pustakcity.in\/collections\/manovikas-prakashan.oembed","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}