{"product_id":"काफ्का-ऑन-द-शोअर-kafka-on-the-shore","title":"काफ्का ऑन द शोअर (Kafka On The Shore)","description":"\u003cdiv class=\"elementor-element elementor-element-899ea39 elementor-widget elementor-widget-wl-single-product-short-description\" data-id=\"899ea39\" data-element_type=\"widget\" data-e-type=\"widget\" data-widget_type=\"wl-single-product-short-description.default\"\u003e\n\u003cdiv class=\"elementor-widget-container\"\u003e\n\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description\"\u003e\n\u003cp\u003eवडिलांनी केलेल्या भविष्यवाणीची काळी सावली घेऊन काफ्का तामुरा हा पंधरा वर्षांचा मुलगा घरातून पळून गेलेला असतो. वृद्धत्वाकडे झुकलेल्या नाकाताची लहानपणच्या एका विचित्र अपघातामुळे मानसिक वाढ खुंटलेली असते, त्यामुळे उपजीविकेसाठी हरवलेली मांजरं शोधून देण्यासारख्या साध्या कामात तो जीव रमवत असतो. अचानक त्याच्या हातून एक खून होतो आणि त्याच्या एरवी शांत आणि निरुपद्रवी आयुष्यात मोठीच उलथापालथ होते. काफ्का आणि नाकाता या दोघांचा प्रवास एकमेकांना समांतर चाललेला असताना घडणाऱ्या विलक्षण घटना, मांजरांची भाषा बोलणारी माणसं, आकाशातून होणारा माशांचा वर्षाव, भुतासारख्या आभासी व्यक्तिमत्त्वाचा मुली पुरवणारा दलाल, हेगेलच्या तत्त्वज्ञानातील दाखले देणारी कॉलगर्ल, दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान जंगलात गायब झालेले; पण साठ वर्ष उलटल्यावरही वय न वाढलेले सैनिक अशा पात्रांची विलक्षण घटनांत उत्कंठावर्धक गुंफण करत कथानक पुढे सरकत असतं. यात क्रूर हत्या होतात; पण बळी आणि खुनी या दोघांची ओळख हे शेवटपर्यंत कोडंच राहतं. अशा अनेक विस्मयकारक घटकांची गुंफण करून निर्माण केलेली एक उत्कृष्ट कादंबरी. वाचकाला एका अद्भुत, जादुई आणि अपरिचित जगात घेऊन जाणारी.\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":48282473726166,"sku":null,"price":629.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/cd456077e29e12a55eaefa6002c80782.jpg?v=1779450991","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%ab%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a4%be-%e0%a4%91%e0%a4%a8-%e0%a4%a6-%e0%a4%b6%e0%a5%8b%e0%a4%85%e0%a4%b0-kafka-on-the-shore","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}