{"product_id":"काहूर-एका-वादळाचे-kahoor-eka-vadalache","title":"काहूर एका वादळाचे (Kahoor Eka Vadalache)","description":"\u003cp\u003eही कादंबरी वर्तमान राजकारणाच्या वास्तवाला सोलून काढते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eस्वातंत्र्योत्तर राजकारण स्वप्नाळू होते, पण विषाक्त नव्हते. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eविद्यमान राजकारण हे जातीजातींत, धर्माधर्मांत तंटे-बखेडे \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eनिर्माण करणारे आणि अराजकतेच्या दिशेने वेगाने जाणारे आहे. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eत्यामुळे देश अन् समाजाच्या एकसंधतेला तडे जाण्याची शक्यता \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eनाकारता येणार नाही. असे राजकारण भयावह होण्याची \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eशक्यता बळावते. अभिव्यक्ती अन् मतस्वातंत्र्य नाकारले जाणे, \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eही हुकूमशाहीच्या पावलांची नांदी असू शकते. राजकुमार बडोले \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eयांनी विद्यमान राजकीय पट सिद्धहस्त लेखकाच्या प्रज्ञेने मांडला \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआहे. प्रज्ञावंत हा जुलमी व्यवस्थेचा कधीही बटीक नसतो. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमानवाच्या मुक्तीचे हुंकार त्याच्या अभिव्यक्तीत असतात. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमानवी प्रतिष्ठेची जोपासना ही त्याची अभिलाषा असते. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमनुष्याचे स्वयंभूत्व ही त्याची प्रार्थना असते. ही कादंबरी \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमानवमुक्तीचा गजर करते. राजकुमार बडोले यांनी \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रत्यक्षपणे अनुभवलेले सत्ताकारण आणि सामान्य माणसाला \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजाणवणारी भारतीय व महाराष्ट्रीय राजकारणाविषयीची \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसंवेदनशून्यता ठसठशीतपणे या कादंबरीतून व्यक्त होते. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eडॉ. ऋषीकेश कांबळे\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":47086773305558,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-khur.jpg?v=1753599588","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a5%82%e0%a4%b0-%e0%a4%8f%e0%a4%95%e0%a4%be-%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a4%b3%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87-kahoor-eka-vadalache","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}