{"product_id":"चकवाचांदण-chakawachandan","title":"चकवाचांदण एक वनोपनिषद (Chakavachandan Ek Vanopanishad)","description":"\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमारुती चितमपल्ली यांच्या ‘चकवाचांदण’ या आत्मकथनाचे एकूण स्वरूप एका वनाधिकाऱ्याचे अरण्य-अनुभव असे आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003ca href=\"https:\/\/mr.wikipedia.org\/wiki\/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AD\" title=\"विदर्भ\"\u003eविदर्भातील\u003c\/a\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003ca href=\"https:\/\/mr.wikipedia.org\/wiki\/%E0%A4%A4%E0%A4%A3%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B0\" title=\"तणमोर\"\u003eतणमोराच्या\u003c\/a\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003eसंशोधनाच्या निमित्ताने ते रानोमाळ भटकत असता तणमोराची शिकार करणारा\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003ca href=\"https:\/\/mr.wikipedia.org\/wiki\/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C\" class=\"mw-redirect\" title=\"पारधी समाज\"\u003eपारधी\u003c\/a\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003eभेटला. डॉक्टर\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003ca href=\"https:\/\/mr.wikipedia.org\/wiki\/%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%AE_%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%80\" title=\"सलीम अली\"\u003eसलीम अली\u003c\/a\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003eयांच्या पक्ष्यांच्या पुस्तकातील\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003ca href=\"https:\/\/mr.wikipedia.org\/wiki\/%E0%A4%98%E0%A5%81%E0%A4%AC%E0%A4%A1\" title=\"घुबड\"\u003eघुबडाचे\u003c\/a\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003eचित्र पाहून त्याने त्या पक्ष्याचे नाव सांगितले,‘चकवाचांदण’. घुबडासारख्या अभद्र समजल्या जाणाऱ्या पक्ष्याचे नाव इतके सुंदर, काव्यमय असू शकते याचे शब्दवेड्या चितमपल्लींना आश्चर्य, तसाच आनंद वाटला. साहजिकच त्यांच्या मनात ‘चकवाचांदण’ या नावाविषयी जिज्ञासा निर्माण झाली. त्यांनी त्या पारध्याला विचारलेलं, 'चकवाचांदण’ म्हणजे काय?’ तो “साब, ते पखेरू कलमुहा हाय. रानात सांजेला तो बोंबलू लागला की वाटेत आम्हांला चकवा मारतो. आमची रानभूल होते. अशा वेळी आम्ही जिथल्या तिथं बसून राहतो. आभाळात\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003ca href=\"https:\/\/mr.wikipedia.org\/wiki\/%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0_%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9\" title=\"शुक्र ग्रह\"\u003eशुक्राची\u003c\/a\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003eचांदणी दिसू लागते तेव्हा चकवा निघून जातो. आम्हाला वाट सापडते. म्हणून त्याला चकवाचांदण म्हणतो.’ चितमपल्लींना नावाचा हा खुलासा आवडला. ‘चकवाचांदण’ हे नाव त्यांना संधिप्रकाश आणि गूढता यांचे प्रतीक वाटले. चितमपल्लींनी वनविभागातील नोकरी ठरवून स्वीकारलेली नव्हती. चुकून ते या नोकरीच्या आडवाटेच्या वनात आले आणि चालत चालत असता त्यांना आयुष्याची सुंदर वाट सापडली. अरण्यातल्या चकव्यानंतर दिसलेल्या उगवत्या शुक्राच्या चांदणीचे सौंदर्य अगदी आगळेवेगळे दिसते, म्हणून मारुती चितमपल्लींनी आपल्या आत्मकथनाचे नाव ‘चकवाचांदण’ ठेवले.\u003c\/p\u003e\n\u003c!----\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45799847821526,"sku":null,"price":1000.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-OIP_2.jpg?v=1744864070","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/%e0%a4%9a%e0%a4%95%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a4%a3-chakawachandan","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}