{"product_id":"द-हिडन-लाईफ-ऑफ-ट्रीज-the-hidden-life-of-trees","title":"द हिडन लाईफ ऑफ ट्रीज (The Hidden Life Of Trees)","description":"\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eद हिडन लाईफ ऑफ ट्रीज\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eअर्थात झाडांच्या अबोल विश्वाचं बोलकं दर्शन\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eअद्यावत संशोधनाचा आधार घेत एका वनरक्षकांच्या रमणीय गोष्टी वाचकाला जंगलाच्या अद्भुत दुनियेत घेऊन जातात. वनस्पतींचा संवाद कसा चालतो, ते एकमेकांची काळजी कशी घेतात,याचा उलगडा वाचकांना सहज होतो. पथदर्शक संशोधनाचा आधार घेत वनस्पतीचे जीवन हे मानवी कुटुंब रचनेपेक्षा काही वेगळे नाही, हे लेखक \"लाइफ ऑफ ट्रीज\" या पुस्तकातून दाखवतात.\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eजंगलातील झाडे आपल्या लेकरांसोबत राहून त्यांचा सांभाळ करतात, त्यांना पोषणद्रव्य पुरवितात, त्यांच्याशी संवाद साधतात आजारपणात सुश्रुषा करतात आणि धोक्याची पूर्व सूचनाही देतात!\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eसहजीवनात वाढणाऱ्या समूहातील झाडे सुरक्षित असतात आणि त्यांना दीर्घायु लाभते. याउलट रस्त्यावर एकटेपणात वाढणाऱ्या झाडाचे जीवन मात्र खडतर असते आणि जंगलात राहणाऱ्या झाडापेक्षा त्याचे आयुष्य ही कमी असते...\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eतुम्हाला हे वाचताना खरचं वाटणार नाही....वेगवेगळ्या झाडांच्या वेगवेगळ्या तऱ्हा! कोठे मैत्री तर कोठे शत्रुत्व! जसे सहजीवन तसे परजीवन!\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eझाडांच्या माहीत नसलेल्या या कथा अर्थात वैज्ञानिक माहिती आपल्याला आणि आपल्या पाल्यांना वाचताना नक्कीच विस्मय होईल आणि खूप महत्त्वाची माहिती वाचली याचा आनंदही!\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eहे पुस्तक वाचताना संत तुकाराम महाराज आणि डॉ जगदीशचंद्र बोस यांची नक्की आठवण होईल....कारण यांचा झाडांशी स्नेह होता.होय जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर ही झाडांना बोलायचे....आपल्याला सर्वांना हे मान्य आहे की, झाडांना संवेदना असतात...पण प्रस्तुत पुस्तकात लेखकाने जी निरीक्षणे नोंदवली आहेत ती वाचताना तो अद्भुत ग्रंथ निलावंती वाचतोय की काय असे वाटायला लागेल...सांगण्याचा हेतू हाच की वैज्ञानिक निरीक्षण करून लिहिलेल्या या गोष्टी वाचकाला विस्मयकारक वाटतात....\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eतुम्हाला एकटं राहायला नको वाटतं अगदी तसचं तुमच्या झाडांनाही!एकट्या झाडाचे आयुर्मान ही कमी असतं!होय झाडं ही सामाजिक जीवन जगतात.ते एकमेकांची काळजी घेतात..इतकेच नव्हे तर तोडलेल्या झाडाच्या बुंध्याला इतर झाडं अन्न पुरवठा होईल यासाठी मदत करतात....एक दोन दिवस नव्हे तर वर्षानुवर्षे...इतकंच नव्हे तर झाडे ही परस्परांना माहिती पुरवतात.त्यांचे विस्तीर्ण असे \u003c\/span\u003e\u003ca href=\"http:\/\/www\/\" class=\"Link\" rel=\"noopener\" data-mce-fragment=\"1\" data-mce-href=\"http:\/\/www\/\" target=\"_blank\"\u003ewww\u003c\/a\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e सारखे जाळे असते.ज्यात अमर्याद अशी माहिती असते. त्यांचे ही एक \u003c\/span\u003e\u003ca href=\"http:\/\/www\/\" class=\"Link\" rel=\"noopener\" data-mce-fragment=\"1\" data-mce-href=\"http:\/\/www\/\" target=\"_blank\"\u003ewww\u003c\/a\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e आहे...त्याला आपल्याला wood wide web म्हणावे लागेल इतकेच!\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eपुस्तक:द हिडन लाईफ ऑफ ट्रीज\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eझाडांच्या अबोल विश्वाचं बोलकं दर्शन\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eचंदन शेती करणाऱ्या शेतकऱ्याला विचारा चंदनाच्या शेतीत कडुलिंब का लावतात? तर तो हेच सांगेल की हे सहजीवन त्यांना मानवते.अर्थात त्यामुळे त्यांची वाढ चांगली होते.मित्रांमध्ये ते खुश राहतात....\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eआपल्याला नवल वाटेल की झाडांनाही स्मरणशक्ती असते. त्यांना ऐकू येत आणि त्यांची एक भाषा ही असते. ते मित्रमंडळींचा गोतावळा जमा करतात,त्यांना रंग दिसतात.... तुम्ही म्हणाल बस झालं ना राव...निघतो आता.पण थांबा हे वाचून घ्या आधी...\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eएखाद्या झाडावर काही संकट आले असेल तर ते झाड इतरांसाठी ही माहिती देतो. सगळी झाडं या मुळे येणाऱ्या संकटावर मात करण्यासाठी सज्ज होतात.आवश्यक ते जैवरासायनिक बदल स्वतःमध्ये घडवून आणतात...\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e१९८० मध्ये डेहराडून जवळ चंद्रबनी मध्ये वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाची इमारत \"साल\" (समूहात वाढणारे झाडं)जंगलाला साफ करून उभी केली गेली. या संस्थेच्या आवारात एकटी राहिलेली \"सालची\" झाडं एक एक करून मरू लागली. आपल्या सजातीयांशी संपर्क तुटल्यामुळे त्यांचा अंत झाला, पण हे त्यांना कसं कळलं? त्यांची संभाषण यंत्रणा कशी आहे\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eया पुस्तकाविषयी फार जास्त लिहिणं आवश्यक वाटत नाही....कारण याच्या प्रत्येक पानावर अतिशय अद्भुत अशी माहिती आहे.\u003c\/span\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45238124904662,"sku":null,"price":320.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-71tCJ-awzeL._SL1280.jpg?v=1744866412","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/%e0%a4%a6-%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%a1%e0%a4%a8-%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%88%e0%a4%ab-%e0%a4%91%e0%a4%ab-%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%9c-the-hidden-life-of-trees","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}