{"product_id":"प्रतिशोध-भगतसिंहाच्या-फाशीचा-pratishodh-bhagatsinhacya-phashicha","title":"प्रतिशोध भगतसिंहाच्या फाशीचा (Pratishodh Bhagatsinhacya Phashicha)","description":"\u003cdiv class=\"elementor-element elementor-element-899ea39 elementor-widget elementor-widget-wl-single-product-short-description\" data-id=\"899ea39\" data-element_type=\"widget\" data-e-type=\"widget\" data-widget_type=\"wl-single-product-short-description.default\"\u003e\n\u003cdiv class=\"elementor-widget-container\"\u003e\n\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description\"\u003e\n\u003cp\u003e१९२९मध्ये दिल्लीतल्या कायदेमंडळावर धाडसी बॉम्बस्फोट केल्यानंतर भगतसिंहाने स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केलं. तुरुंगात कैदेत असताना ब्रिटिश साम्राज्याविरोधात वैचारिक लढा उभारण्यासाठी त्याने तयारी सुरू केली. तथापि, एका धक्कादायक विश्वासघाताने त्याचं विश्व उद्ध्वस्त झालं. त्याचा विश्वासू सहकारी फणींद्रनाथ घोष ब्रिटिशांना जाऊन मिळाला. त्याने हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची गुप्त माहिती ब्रिटिशांना पुरवली. माफीचा साक्षीदार बनून फणींद्रनाथ घोष याने आपल्या सहकाऱ्यांवर दोषारोप करणारी साक्ष दिली. त्यामुळे क्रांतिकारकांचं अटकसत्र सुरू झालं. त्यानंतर भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव ह्यांना फाशी देण्यात आली. ‘सम्राटाचा साक्षीदार’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घोष याने एकहाती सशस्त्र क्रांतीला खीळ घातली. हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन (एचएसआरए) नेतृत्वहीन झाल्यानंतर ब्रिटिशांची दडपशाही शिगेला पोहोचली, तेव्हा एचएसआरएचे उर्वरित सदस्य प्रतिशोधाच्या धगधगत्या भावनेने एकत्र आले. आयुष्यभराच्या परिश्रमांना ज्याने धुळीस मिळवलं त्याला संपवणं हेच त्यांचं लक्ष्य होतं. पण अत्यंत मर्यादित साधनसामग्री असल्यामुळे त्यांच्या सर्व आशा एका व्यक्तीवर एकवटल्या होत्या. ती व्यक्ती म्हणजे बिहारमधला बैकुंठ सुकुल. एक साधा नि विनयशील शिक्षक असणारा बैकुंठ भगतसिंहाचा निष्ठावंत अनुयायी होता. शहीद क्रांतिकारक आणि एचएसआरएच्या त्यागाचा प्रतिशोध घेण्याची शपथ त्याने घेतली. ह्या अशक्य वाटणाऱ्या मोहिमेमध्ये त्याला यश मिळालं का ? महाबलाढ्य ब्रिटिश साम्राज्याशी टक्कर घेतल्यानंतर काय घडलं ? आणि भगतसिंहाच्या फाशीचा सूड घेण्यासाठी त्याने प्रयत्नांची पराकाष्ठा कशी केली ? भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामाच्या प्रवासात विस्मृतीमध्ये गेलेल्या असंख्य वीरांच्या शौर्यगाथा दडलेल्या आहेत. ही त्यापैकीच एक त्यागाने भरलेली शौर्यगाथा आहे. या एका देशभक्ताने देशद्रोह्याविरुद्ध नि एका सामान्य माणसाने ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध लढा दिला आहे.\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":48282634879190,"sku":null,"price":360.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/ee3c279b9489eae340aada41905c3b62.jpg?v=1779457603","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%b6%e0%a5%8b%e0%a4%a7-%e0%a4%ad%e0%a4%97%e0%a4%a4%e0%a4%b8%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%ab%e0%a4%be%e0%a4%b6%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a4%be-pratishodh-bhagatsinhacya-phashicha","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}