{"product_id":"फिल्म-मेकर्स-filmmakers","title":"फिल्म मेकर्स (Filmmakers)","description":"\u003cp\u003e\u003cmeta charset=\"utf-8\"\u003e\u003cspan\u003eगणेश मतकरीची समीक्षणाची पद्धत अभ्यासपूर्ण आहे. त्याचबरोबर चित्रपटतंत्रातल्या शब्दांचा अतिवापर करून येणारा क्लिष्टपणाही त्याच्या शैलीत नाही. त्याची भूमिका ही वाचकांच्या, एका रसिक चित्रपटप्रेमी मित्राची आहे. हा मित्र वाचकांपर्यंत न पोचलेले चित्रपट पहातो, प्रत्यक्ष चित्रपटांमधून आणि इतर वाचनातून त्या दिग्दर्शकांचा अभ्यास करतो आणि वाचकाला त्या चित्रपटाविषयी आणि दिग्दर्शकाविषयी कुतूहल निर्माण व्हावे- बघण्याची दृष्टीही उमजावी अशी त्या अभ्यासाची मांडणी करतो. त्यामुळे सरावाच्या चित्रपटांबाहेर न पहाणार्‍या वाचकाला नव्या नजरेने या माध्यमाकडे पहायला लावणारं हे लिखाण आहे. म्हणून मला ते महत्त्वाचे वाटते. त्याच्या पहिल्याच पुस्तकात त्यानं हे साध्य केलं आहे. याबद्दल त्याचं विशेष अभिनंदन.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e-सुमित्रा भावे\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45575054065878,"sku":null,"price":300.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-61vIiA_HBML._SL1000.jpg?v=1744865441","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/%e0%a4%ab%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%ae-%e0%a4%ae%e0%a5%87%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b8-filmmakers","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}