{"product_id":"महाराष्ट्र-दर्शन-maharashtra-darshan","title":"महाराष्ट्र दर्शन (Maharashtra Darshan)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eमहाराष्ट्र, सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या बहुरंगी आणि बहुआयामी राज्य , वैभवशाली इतिहास आणि विविधांगी वारसा लाभलेलं. मराठीसह अनेक बोलीभाषा ,धर्म ,पंथ , संप्रदाय आणि त्यांच्या प्रथा -परंपरा यांना सामावून घेत समृद्ध होत गेलेला हा प्रांत. शूरवीरांची -संतांची -सुधारकांची -लोकनेत्यांची ही भूमी.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e       मात्र या मराठी संस्कृतीचे गोडवे गात 'जय महाराष्ट्र ' म्हणताना आपल्या मनात महाराष्ट्राची प्रतिमा कशी असते ? बहुतेकदा अपुरी , बखरची आणि एकसाची. कारण ही प्रतिमा आपल्या मर्यादित भवतालावर आधारित असते. त्यामुळे महाराष्ट्रातल्या विविध भागांतल्या लोकांचं जगणं, बोलणं -चालणं, राहणं - वागणं , खाणं-पिणं, रीती -भीती वगैरेंबद्दलची आपली माहिती फारच जुजबी असते. परिणामी , महाराष्ट्रीय संस्कृतीच्या इंद्रधनुष्यातील लोभस रंग आपल्याला दिसूच शकत नाहीत.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e       या पार्श्वभूमीवर हा बृहद् ग्रंथ महत्वाचा ठरतो. महाराष्ट्राला लाभलेला समृद्ध वारसा आणि आजचं जगणं याचं समग्र दर्शन घडवणारं हे पुस्तक आहे . महाराष्ट्राच्या जिल्ह्याजिल्ह्यातील अभ्यासक -पत्रकार -लेखकांच्या सहभागातून आकाराला आलेला हा अशा स्वरूपाचा पहिलाच पुस्तक प्रकल्प आहे . महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नांदणाऱ्या बहुरंगी लोकजीवनाचा पट वाचकांसमोर आणणारा.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45480538669270,"sku":null,"price":500.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-71SZ9cRDzxL._SL1000.jpg?v=1744865747","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%a6%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b6%e0%a4%a8-maharashtra-darshan","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}