{"product_id":"वाचिक-अभिनय-wachik-abhinaya","title":"वाचिक अभिनय (Vachik Abhinay)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eअष्टांग अभिनयातील महत्त्वाचं अंग म्हणजे वाचिक अभिनय.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eहे केवळ रियाजाने साधता येणार नाही. सुयोग्य - स्पष्ट उच्चारण, श्वसनाचे व्यायाम, तंत्राचा वापर या गोष्टी शिकून घेऊन वाचिक साधना घडली जाईल.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eवाचिक अभिनयाची गरज नाटक, सिनेमा, मालिका, सूत्रसंचालक, निवेदक, रेडियो ज्यॉकी या क्षेत्रात तर आहेच पण बॉस, डॉक्टर, शिक्षक, मार्केटिंग, विद्यार्थी आणि गृहिणी या सार्‍यांनाच आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआपल्या बोलण्याला कसा आकार द्यायचा, हे सोप्या शब्दांत पण आवश्यक तो तांत्रिक नेमकेपणा साधून समजावण्यासाठी या पुस्तकात डॉ. श्रीराम लागू यांनी 'युक्तीच्या चार गोष्टी' सांगितल्या आहेत.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eरंगाभिनयाचे मध्यवर्ती अंग म्हणजे वाचिक अभिनय. तो कसा करावा, हे सांगणारे हे महत्त्वाचे पुस्तक. पूर्वार्धात श्वास नियंत्रण, स्वरयंत्राचे म्हणजे पर्यायाने आवाजाचे नियंत्रण करण्याबद्दलचे विवेचन आहे, जोडीला काही व्यायाम सांगितले आहेत. उत्तरार्धामध्ये कलेची साधना करण्याची गरज पटवून दिली आहे आणि मराठी नाट्यसृष्टीतल्या निवडक उतार्‍यांची चर्चाही केली आहे. वाचिक अभिनयामुळे नटसम्राट ठरलेल्या एका व्यासंगी अभिनेत्याने स्वानुभवाच्या आधारे केलेले मौलिक मार्गदर्शन असे या पुस्तकाचे स्वरूप आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c!----\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45643859362006,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-41HHRw301gL.jpg?v=1744865067","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%85%e0%a4%ad%e0%a4%bf%e0%a4%a8%e0%a4%af-wachik-abhinaya","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}