{"product_id":"aapala-vajan-aapalya-haati","title":"आपलं वजन आपल्या हाती (Aapala Vajan Aapalya Haati)","description":"\u003cp align=\"JUSTIFY\"\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003eआपलं वजन आपल्या हाती\u003c\/strong\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp align=\"JUSTIFY\"\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003eडॉ\u003c\/strong\u003e\u003c\/span\u003e\u003cstrong\u003e. \u003c\/strong\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003eमालती कारवारकर\u003c\/strong\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp align=\"JUSTIFY\"\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp align=\"JUSTIFY\"\u003e\u003cspan\u003eएखादी वजनदार वस्तू हलवायची असेल\u003c\/span\u003e, \u003cspan\u003eतर त्यासाठी एकापेक्षा अधिक माणसांची मदत घ्यावी लागते\u003c\/span\u003e. \u003cspan\u003eहे सामान्य ज्ञान शरीराच्या वजनाच्या बाबतीतही लागू पडतं\u003c\/span\u003e. \u003cspan\u003eपण असा विचार न करता या प्रश्नाकडे पाहताना केवळ दोनच बाबींचा विचार केला जातो\u003c\/span\u003e. \u003cspan\u003eएक म्हणजे कॅलरीज मोजून खाणं आणि मर्यादेपलीकडे व्यायाम करणं\u003c\/span\u003e. \u003cspan\u003eयामुळे ठेवल्या ठिकाणाहून तसूभरही न हलता एकाच जागी अडकून पडलेल्या वजनदार वस्तूप्रमाणे शरीराच्या वजनाचा प्रश्न वर्षानुवर्षं तसाच रेंगाळत राहिला आहे\u003c\/span\u003e. \u003cspan\u003eआता तर हा प्रश्न वैद्यकतज्ज्ञांच्या उपायांनाही दाद देईनासा झाला आहे\u003c\/span\u003e.\u003c\/p\u003e\n\u003cp align=\"JUSTIFY\"\u003e\u003cspan\u003eहे असं होण्याचं कारण म्हणजे ‘माणूस’ हा प्रकृतिधर्म घेऊनच जन्माला येतो\u003c\/span\u003e, \u003cspan\u003eयाचा माणसाला स्वतःलाच विसर पडला आहे\u003c\/span\u003e. \u003cspan\u003eवजनाच्या प्रश्नाच्या मुळाशी जायचं ठरवलं\u003c\/span\u003e, \u003cspan\u003eतर आजवर दुर्लक्षित राहिलेल्या अनेक कंगोर्यांचं महत्त्व लक्षात येईल\u003c\/span\u003e. \u003cspan\u003eहे लक्षात आलं\u003c\/span\u003e, \u003cspan\u003eतरच या वजन हलवण्याच्या मार्गातले खाचखळगे दृष्टिपथात येतील\u003c\/span\u003e. \u003cspan\u003eअसा दृष्टिकोन वापरला\u003c\/span\u003e, \u003cspan\u003eतरच माणसाच्या प्रयत्नांना यश येईल आणि हेही उमजेल\u003c\/span\u003e, \u003cspan\u003eकी आपलं वजन राखणं आपल्याच हातात आहे\u003c\/span\u003e.\u003c\/p\u003e\n\u003cp align=\"JUSTIFY\"\u003e\u003cspan\u003eअशा या आजवर न दिसलेल्या खाचखळग्यांचा सांगोपांग विचार प्रस्तुत पुस्तकात केला आहे\u003c\/span\u003e. \u003cspan\u003eत्यामुळे नेहमीचा सरधोपट मार्ग सोडून योग्य तो दृष्टिकोन वापरल्यास माणसाला प्रथम आरोग्य आणि नंतर योग्य वजन मिळवण्यात आणि ते राखण्यात यश येईल\u003c\/span\u003e.\u003c\/p\u003e\n\u003cp align=\"JUSTIFY\"\u003e\u003cspan\u003eवजनाच्या बाबतीत आहारशास्त्राचा मंत्र हेच सांगतो\u003c\/span\u003e, \u003cspan\u003eकी ‘आरोग्य आणि योग्य वजन हातात हात घालूनच येतात\u003c\/span\u003e.’\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45784977506518,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-wait.jpg?v=1745914517","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/aapala-vajan-aapalya-haati","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}