{"product_id":"aatle-dole-आतले-डोळे-marathi","title":"आतले डोळे (Aatle Dole)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसमजा, अचानक असं घडलं, की तुमचा डावा हात तुमचा राहिला नाही…\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eतो स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असल्यासारखा वागू लागला!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eतुम्ही उजव्या हाताने शर्टाची बटणं लावताय आणि डावा हात\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eतुमचं न ऐकता ती काढू लागला तर…?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसमजा, तुम्हाला कोणताही दृष्टिदोष नाहीये. तुम्हाला दूरचं-जवळचं,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eलहान-मोठं सर्व दिसतंय. गुलाबाचं फूल दाखवताच तुम्हाला ते\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eगुलाब म्हणून तर सोडा; पण एक प्रकारचं फूल म्हणूनदेखील\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eओळखता येत नसेल तर…?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eएक दिवस अचानक तुम्हाला अर्धं जगच दिसेनासं झालं तर…?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसमजा, तुम्हाला कोणीही दिसत नसताना,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eशोधूनदेखील कोणी सापडत नसताना, इतरांना ऐकू न येणारे\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eकुणाच्या बोलण्याचे-खिदळण्याचे आवाज ऐकू येत असतील तर…?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअसे आणि अशा तऱ्हेचे अनाकलनीय अनुभव कोणाला येत असतील तर…?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eतर, ते ना काळी जादू आहेत, ना जादूटोणा, ना भुताटकी!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eही आपल्या मेंदूच्या कार्यपद्धतीत बिघाड झाल्याची लक्षणं आहेत.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअशाच चमत्कारिक वाटणाऱ्या लक्षणांची-अनुभवांची चर्चा\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eएका संवेदनशील मनोविकारतज्ज्ञाच्या नजरेतून करण्याचा प्रयत्न\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eम्हणजे हे पुस्तक!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eAatle Dole | Dr. Rupesh Patkar\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआतले डोळे । डॉ. रुपेश पाटकर\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":47211267653846,"sku":null,"price":280.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/WhatsAppImage2024-11-27at3.10.05PM-800x800.jpg?v=1756386109","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/aatle-dole-%e0%a4%86%e0%a4%a4%e0%a4%b2%e0%a5%87-%e0%a4%a1%e0%a5%8b%e0%a4%b3%e0%a5%87-marathi","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}