{"product_id":"aawara-thriller-shirvalkar","title":"आवारा (Aawara)","description":"\u003ch4\u003e\u003cspan\u003eरस्त्यावरच्या पाण्यात चरचरत कारचा स्पीड कमी झाला. हेड-लाइट्स डाउन झाले.किंग्ज-वे कस्टमचं आलिशान मॉडेल होतं. तो आत बसलेला हँडसम तरुण संशयानं तिच्याकडे पाहत होता. समोर उभ्या असलेल्या तरुणीचे कपडे पावसामुळे पारदर्शक झालेले असले, तरी ती पारदर्शक नाही, हे लक्षात येताच त्याने खिडकीची काच भराभर खाली केली आणि बेधडक पावसात डोकं खुपसलं. तोपर्यंत ती त्याच्या बाजूला आली होती. \"बेस मॅम, व्हॉट् स द मॅटर? कार बंद पडलीय का तुमची ?\" \"अं?... नो कार. मला बॉम्बेला जायचंय.\" या क्षणी तिने आपलं मोहक हास्य पणाला लावलं होतं. त्याने 'हो' म्हणायला हवं होतं. हँडसम होता तो. थोडा-फार चालूपणा केलाच, तर निदान खपवून घेता येणार होता. बॉम्बेपर्यंत इतकी चांगली सोबत परत मिळणं कठीण होतं. \"लगेज?\" \"नो लगेज.\" त्याने एकदा आश्चर्यानं तिच्याकडे पाहिलं. ओठ मुडपून तो हसला. \"गेट इन, प्लीज.\" लांब हात करून त्याने डाव्या हाताचा दरवाजा उघडला. तिने पळत पळत कारला वळसा घातला जणू त्याने विचार बदलून नकार देण्याच्या आत तिला आत शिरायचं होतं. \"थैंक यू!\" फ्रंटला बसून दार खट्कन् ओढून घेत ती आनंदानं म्हणाली. खटक्याचा आवाज ऐकताच त्याने कारला स्पीड दिला. कारनं एक मैलाचं अंतर पार केलं; पण त्याने तिला काही विचारलं नाही, का तिच्याकडे साधं पाहिलंसुद्धा नाही. स्वतःच्या विचारात गर्क असल्यासारखा तो रस्त्यावर नजर ठेवून कार चालवत राहिला.\u003c\/span\u003e\u003c\/h4\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":47096007950550,"sku":null,"price":195.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-awara.jpg?v=1753865511","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/aawara-thriller-shirvalkar","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}