{"product_id":"bharatatil-baudha-dhamma-gail-omvedt","title":"भारतातील बौद्ध धम्म (Bharatatil Baudha Dhamma )","description":"\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eप्रस्तुत पुस्तकात भारतातील बौद्ध धम्म, ब्राह्मणी धर्म आणि जात यांच्या\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e२,५०० वर्षांच्या प्रदीर्घ वाटचालीचा विशेष अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eकेला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बौद्ध धम्माचे आकलन या\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eप्रयत्नाचा आरंभबिंदू आहे, बौद्ध धम्माचे ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआणि तात्त्विक पैलू पुढे आणण्यासाठी गेल ऑम्व्हेट यांनी बौद्ध साहित्याचे\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमूळ स्रोत आणि उपलब्ध नवीन साहित्य या दोन्हींचे केलेले संशोधन आहे. या\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eप्रक्रियेत त्यांनी वर्तमानदृष्ट्या आस्थेच्या अशा महत्त्वाच्या अनेक विषयांची\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eचर्चा केली आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eगेल ऑम्व्हेट यांचे असे प्रतिपादन आहे की, डॉ. आंबेडकरांसारख्या\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eदलित नेत्यांनी बौद्ध परंपरेच्या पायाला धक्का देणारी मीमांसा केली असली,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eतरी त्यांचे क्रांतिकारक धैर्य मूळ बौद्ध धम्मातील विचारप्रणालीशी सुसंगतच\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआहे. शोषणाविरुद्धचा मार्क्सवादी पद्धतीचा ‘चिलखती’ प्रतिसाद आणि\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eहिंदुत्वाच्या चौकटीतील निष्प्रम सुधारकी प्रयत्न हे दोन्हीही टाळून\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआंबेडकरांनी मध्यम-मार्ग स्वीकारला आहे. त्यांच्या आधीही काहींनी असे\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eप्रयत्न केले आहेत, पण आंबेडकरांचे वैशिष्ट्य हे की, त्यांनी बुद्धाच्या\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eशांतिसंदेशाला दलितांच्या सामाजिक व राजकीय क्रांतीच्या हत्याराचे स्वरूप\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eदिले. दुसरे म्हणजे, दोन धार्मिक प्रवाहांमध्ये प्रभुत्वाची स्पर्धा सतत सुरू\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअसल्याने लेखिकेचे असे मत आहे की, ख्रिस्तपूर्व चौथे शतक ते ख्रिस्तपूर्व\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसहावे शतक या काळातील बौद्ध धम्माचे अग्रस्थान लक्षात घेता, प्राचीन\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eभारताला ‘हिंदू भारता’ ऐवजी ‘बौद्ध भारत’ म्हणायला हवे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eजातिव्यवस्थेचा उगम व विकास यांची संपूर्ण ‘नवीन’ मीमांसा या\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eपुस्तकात सापडेल. ही मीमांसा इतिहासाच्या हिंदुत्ववादी अर्थांकनाला\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eधीटपणे प्रश्न विचारते. भारताच्या सांप्रत राजकीय व सामाजिक स्थितींबाबत\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआस्था असणाऱ्या सर्वांना हे पुस्तक बोधप्रद ठरेल. त्याचप्रमाणे,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसमाजशास्त्रज्ञ, राजकीय अभ्यासक, इतिहास-संशोधक, धर्म व तत्त्वज्ञान या\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eविषयाचे विद्यार्थी आणि दलित चळवळी यांनाही हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45617869488342,"sku":null,"price":360.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-boudha.jpg?v=1744865236","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/bharatatil-baudha-dhamma-gail-omvedt","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}