{"product_id":"company-sarkar-r-kulkarni","title":"कंपनी सरकार (Company Sarkar)","description":"\u003cp\u003e‘कंपनी सरकार’ म्हणजे इंग्लंडमधील ईस्ट इंडिया कंपनीच्या \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमहाराष्ट्रातील प्रवेशाचा, राजकीय सत्ता काबीज करण्याचा आणि \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमहाराष्ट्राच्या अस्मितेला हादरे देण्याच्या कारवायांचा इतिहास \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eइंग्रजांनी कंपनीच्या रूपाने, महाराष्ट्राच्या पश्चिम किना-यावर \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआपले प्रथम पाय टेकले, पण शिवशाहीत त्यांना किना-यावरच \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eरोखले गेले. नंतरच्या काळात, प्रथम आपले त्यांनी स्थान \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eउत्तर भारतात बळकट करून महाराष्ट्रात हातपाय पसरण्यास \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रारंभ केला. मराठ्यांचे शत्रू हेरून त्यांना आपले मित्र बनविले. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपानिपताच्या दारूण पराभवानंतर, मराठी मुलखात सुरू झालेले \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eगृहकलह, सरदारांच्या प्रभावामुळे दुभंगत चाललेली मराठी \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसत्ता, विकलांग झालेली दिल्लीचा पातशाही, या सर्व राजकीय \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअस्थिरतेचा फायदा उठवून, कंपनीने हिंदुस्थानच्या राजकारणाची \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसूत्रे, हातात घेतली. १८१८ ते १८५७ या सुमारे चाळीस \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eवर्षांच्या काळात महाराष्ट्रात कंपनीचा अंमल होता. १८५७ \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eच्या उठावानंतर सारा देशच इंग्रजांनी बळकावला आणि या \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eउपखंडात वसाहतीचे राज्य निर्माण झाले. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e‘अशी होती शिवशाही’ आणि ‘पुण्याचे पेशवे’ या ‘महाराष्ट्राचा \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपूर्वरंग’ या मालेतील ‘कंपनी सरकार’ म्हणजे महाराष्ट्राला \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमिळालेला ‘शाप की वरदान’ याचा अल्पसा विचार करून हा \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eशेवटचा भाग सादर करून या मालेला पूर्णविराम दिला आहे. \u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":47082972119254,"sku":null,"price":155.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-raj_c896f0b4-5f72-4699-9f2b-0da549742fb1.jpg?v=1753431992","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/company-sarkar-r-kulkarni","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}