{"product_id":"domel-te-kargil-marathi","title":"डोमेल ते कारगिल (Domel Te Kargil)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eरणरंगात न्हालेल्या धगधगत्या नंदनवनाची क्षात्रधर्मी कथा \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e१९४७ साली भारतात जसे स्वातंत्र्याचे वरदान लाभले, तसाच विभाजनाचा \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eशापही मिळाला. त्या शापाची बोच कमी होती म्हणून की काय, नवोदित \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपाकिस्तानने जम्मू काश्मीर बळकावण्याचा खुनशी डाव भारताला सशस्त्र \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसंघर्षात खेचले. त्या सीमावर्ती संस्थानाने अगतिक होऊन स्वसंरक्षणार्थ भारताकडे \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eधाव घेतली. विलीनीकरणाची संवैधानिक प्रक्रिया पूर्ण झाल्यावर भारताने \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआक्रमकांना मागे रेटण्यासाठी लष्करी मोहीम आरंभली. ती अंशतः यशस्वी \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eझालेली असतानाच युध्बंदी करार झाला. ते युध्द थांबले, पण संघर्ष शमला नाही. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतो जीवघेणा संघर्ष आजतागायत चालूच आहे, त्याचे स्वरूप बदलले आहे, \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eविस्तारले आहे. दोन्ही देशांच्या अस्तित्वाचा तात्त्विक मूलाधार ठरलेल्या जम्मू-\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकाश्मीरच्या भूमीवर चार युध्दे खेळली जाऊनही खरीखुरी शांतता दृष्टिपथातही येऊ \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eशकलेली नाही. पाकिस्तानने पुकारलेल्या परभारी युध्दाचा रंगही बदलत, अधिक \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eगडदगहिरा होत चालला आहे. दिवसेंदिवस बिकट होत चाललेल्या या समस्येचा \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअत्यंत मूलगामी वेध घेणारा ग्रंथ म्हणजेच ‘डोमेल ते कारगिल’ ! \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपाकिस्तानने फंदफितूरीने डोमेल ही पहिली सीमावर्ती चौकी बळकावली, \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतेव्हापासून सुरू झालेल्या आणि भारतीय सेनादलांनी अतुलनीय पराक्रम गाजवून \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपाक घुसखोरांपासून कारगिलचा टापू मुक्त केला, तोपर्यंत(किंबहुना त्यानंतरही) \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eचालूच राहिलेल्या एका रौद्रभीषण संघर्षाची ही रोमांचक कथा आहे. इतिहास \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eघडवणा-या भूगोलाचे, रणांगणावरच्या लहानमोठ्या मोहिमांचे, उभय पक्षांच्या \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eव्यूहरचनेतल्या डाव-प्रतिडावांचे, प्रतिकूल निसर्गावर मात करणा-या जिद्दी \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसैनिकांच्या बलिदानी पराक्रमाचे तपशीलवार विवेचन हे तर या ग्रंथाचे ठळक \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eवैशिष्टय आहेच; पण प्रतिशोधाच्या भावनेने पेटून उठलेल्या पाकिस्तानने गेली \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eदहा-बारा वर्षे जे परभारी युध्द पुकारले आहे, त्याचे मर्मभेदी विश्लेषण हेसुध्दा या \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eग्रंथाचे तितकेच महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. नंदनवनातील राजकीय-सामाजिक \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपरिस्थितीचे, तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजनैतिक हालचालींचे बदलते रंगही \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eनेमकेपणाने टिपणारा हा ग्रंथ काश्मीर समस्येबद्दलचे सर्व वाचकांचे आकलन समृध्द \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकरील, यात शंकाच नाही. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसूर्यकुलाचा दिव्य वारसा सांगणा-या लढवय्या लेखकाचा हा पहिलाच ग्रंथ \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eयुध्दविषयक मराठी साहित्याचे दालन समृध्द करणारा ठरावा, अशाच तोलामोलाचा \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआहे. \u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":47082995187926,"sku":null,"price":385.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-car.jpg?v=1753432833","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/domel-te-kargil-marathi","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}