{"product_id":"ek-hoti-ritu-satya-saran","title":"एक होती रितू… (Ek Hoti Ritu)","description":"\u003cp\u003eरितू नंदा…..\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eराज कपूरची लाडकी लेक आणि उद्योजक राजन नंदा यांची प्रिय पत्नी…. पण एवढीच होती का रितूची ओळख ? तर नाही…\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहे पुस्तक वाचल्यावर जाणीव होते की, रितूची ओळख कित्येक कोस या पलीकडची आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसुप्रसिद्ध संपादिका व लेखिका सत्या सरन यांनी रितूच्या आयुष्याचा धांडोळा रसाळ भाषेत सखोलतेने घेतला आहे. शिवाय त्यांनी रितूचे कुटुंब सदस्य, जवळचे नातेवाईक, मित्र-मैत्रिणी, व्यवसायातले सहकारी, इलाज करणारे डॉक्टर्स आणि अनेक सुहृद यांना बोलतं करत तिचं असामान्य कर्तृत्व,\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eव्यक्तिमत्त्वातले अनेक पैलू, स्वभावातल्या बारीक छटा यांचा उलगडा केला आहे…. यातूनच समजतं….\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमृदु मनाची रितू एक उत्तम गृहकर्तव्यदक्ष गृहिणी तर होतीच; पण त्याचबरोबर ती स्वतः एक कल्पक व मेहनती उद्योजिका होती आणि कठीण प्रसंगांना धैर्याने भिडणारी, आयुष्याला सामोरी जाणारी कणखर स्त्री होती.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतिचीच ही प्रेरणादायी कहाणी एक होती रितू…\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":46985901146326,"sku":"","price":300.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-rit.jpg?v=1750508796","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/ek-hoti-ritu-satya-saran","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}