{"product_id":"ganga-aaye-kanha-se-vijay-padalkar","title":"गंगा आयें कहा से (Ganga Aaye Kanha Se)","description":"\u003cp\u003e\u003cmeta charset=\"utf-8\"\u003e\u003cspan\u003eहिंदी चित्रपट सृष्टीतील अमराठी कलावंतांपैकी महाराष्ट्राच्या रसिकांनी ज्यांच्यावर सर्वाधिक प्रेम केले ते गुलजार हे कवी आणि दिग्दर्शक आहेत. गुलजार यांच्या ‘रावीपार’ या कथा संग्रहाचे मराठीत भाषांतर विजय पाडळकर यांनी केले व येथून एका दीर्घ मैत्रीचा प्रवास सुरु झाला. या प्रवासातच एका वळणावर पाडळकरांनी गुलाजारांच्या सर्व चित्रपटांवर दीर्घ समीक्षा ग्रंथ लिहिण्याचा मनोदय गुलजारांना बोलून दाखविला. यासाठी त्यांना गुलजार यांची तशीच दीर्घ मुलाखत हवी होती. गुलाजारांनी ती द्यावयाचे कबूल केले आणि या ग्रंथाच्या ‘विणकामास’ सुरुवात झाली.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e  ग्रंथाच्या पहिल्या प्रकरणात दिग्दर्शनाची पहिली संधी मिळण्याच्या काळापर्यंतचा गुलजारांचा प्रवास पाडळकर चित्रित करतात. त्यानंतर ‘मेरे अपने’ [१९७१] या पहिल्या चित्रपटापासून ते ‘हुतूतू’ [१९९९] या शेवटच्या चित्रपटापर्यंत गुलजारांचे दिग्दर्शक म्हणून होत गेलेले विविधांगी दर्शन त्यांनी रेखाटले आहे. एका मान्यवर दिग्दर्शकाचा असा अभ्यास मराठीत प्रथमच शब्दबद्ध झाला आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e‘या ग्रंथास २००९ सालचा महाराष्ट्र सरकारचा ‘पु. ल. देशपांडे पुरस्कार प्राप्त झाला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45568852164822,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-51nTssnFErL._SL1000.jpg?v=1744865480","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/ganga-aaye-kanha-se-vijay-padalkar","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}