{"product_id":"gaokusabaherchi-manase","title":"गावकुसाबाहेरची माणसे (Gaokusabaherchi Manase)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eएका पारधी मुलाचे आई-वडील नैसर्गिक आपत्तीत मृत्युमुखी पडले. त्यानंतर त्या मुलाला सरकारी भरपाईही मंजूर झाली… पण हे पारधी कुटुंब त्या ‘गावचे रहिवासी’ नसल्यानं ती भरपाई त्याला मिळू शकली नाही. त्यावर तो म्हणाला, ‘आम्ही पारधी लोक काही आभाळातून पडलेलो नाही की पाकिस्तानातून आलेलो नाही, आम्ही याच देशात जन्माला आलो आहोत. आम्हा पारध्यांना गावात घर नाही, रानात शेत नाही. मग आम्ही एखाद्या ‘गावचे रहिवासी’ आहोत, असा पुरावा आम्ही कुठून आणणार..?’ त्या मुलानं विचारलेल्या या प्रश्नाचं उत्तर कुणाकडेच नाही.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eएकीकडे आधुनिक व प्रगत देशातील उच्चभ्रू समाज चकचकीत, घरात राहतो, त्यांचे फर्निचर, बाथरूमही उच्च दर्जाचे असते. तर दुसरीकडे या समाजाला ना घर… ना गाव.. पोटाची खळगी भरण्यासाठी अजूनही यांचा प्रवास चालू आहे. स्वातंत्र्याच्या 70 वर्षांनंतरही कुठपर्यंत असे दारिद्य्राचे जीवन त्यांनी जगायचे, एक माणूस म्हणून त्यांना त्यांचे हक्क, अधिकार कधी मिळणार..?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअशा भटक्या-विमुक्त जाती-जमातींना माणूस म्हणून जगण्याच्या हक्कासाठी लेखक गेली चार दशकांपासून लढतोय आणि आजही हा संघर्ष सुरूच आहे.\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eAbout Author:\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e• श्री. लक्ष्मण मारुती गायकवाड यांचा जन्म २३ – ७ – ५२ रोजी धनेगाव, लातूर येथे झाला.\u003cbr\u003e• शोषित, पीडित समाजघटकांमध्ये सामाजिक परिवर्तन करणारे आणि विमुक्त, भटक्या जमातीच्या लोकांना न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी १९७८ पासून कार्यरत असलेले गायकवाड महाराष्ट्र पातळीवरील विमुक्त भटके संघर्ष महासंघाचे संस्थापक अध्यक्ष म्हणून काम करतात.\u003cbr\u003e• कामगार, शेतमजूर, हॉटेल बॉईज्, स्त्री मुक्ती इत्यादी चळवळीत ते सक्रीय\u003cbr\u003eसहभागी असतात.\u003cbr\u003e• १९८४ साली निघालेल्या विमुक्त भटक्यांच्या लातूर ते मुंबई या शोधयात्रेचे\u003cbr\u003eते संयोजक होते.\u003cbr\u003e• समाजकार्य व लेखनाची आवड असलेल्या गायकवाड यांनी मुंबई येथे भरलेल्या\u003cbr\u003eपहिल्या जागतिक मराठी परिषदेमध्ये दलित समाजाबद्दल विचार मांडले.\u003cbr\u003e• भटक्या विमुक्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी भारताच्या राजीव गांधी, व्ही.पी.\u003cbr\u003eसिंग, पी.व्ही. नरसिंह राव या तीन पंतप्रधानांबरोबर चर्चा केली.\u003cbr\u003e• भारताच्या महत्त्वपूर्ण साहित्यिकांच्या सहा लोकांच्या शिष्ट मंडळामध्ये\u003cbr\u003eअभ्यासासाठी १९९४ मध्ये त्यांनी चीनचा महत्त्वपूर्ण दौरा केला.\u003cbr\u003e• श्री. गायकवाड हे विविध पुरस्कारांनी सन्मानित आहेत. या पुरस्कारांमध्ये राष्ट्रीय साहित्य अकादमी, नवी दिल्ली यांचा पुरस्कार, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हस्ते एक लाख रुपयांचा महाराष्ट्र गौरव पुरस्कार, पानघंटी पुणे समता पुरस्कार, संजीवनी पुरस्कार यांचा विशेष उल्लेख करावा लागेल.\u003cbr\u003e• 'उचल्या' या त्यांच्या अत्यंत गाजलेल्या आत्मचरित्राचे हिंदी, इंग्रजी, कन्नड, तेलुगू, उर्दू फ्रेंच, बंगाली इत्यादी भाषांमध्ये भाषांतर झालेले आहे.\u003cbr\u003e• याशिवाय ते राष्ट्रीय साहित्य अकादमीचे माजी ज्युरी मेंबर, सोसायटी फॉर कम्युनल हार्मोनीचे माजी ज्युरी मेंबर (दिल्ली) आणि राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे सदस्य होते.\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45702532792534,"sku":null,"price":175.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-GAAV-KUSABAHERCHI-MANAS-Mockup.jpg?v=1757583847","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/gaokusabaherchi-manase","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}