{"product_id":"ghalmel-shankar-patil","title":"घालमेल (Ghalmel)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eशंकर पाटील यांच्या लेखनातून कथारूपाने आपल्या डोळ्यांपुढे येणारे अनुभव खेड्यांतील स्त्रीपुरुषांचे आहेत व त्या दृष्टीने त्यांना त्यांचे असे खास धर्म प्राप्त झालेले आहेत. हे त्यांचे विशेष धर्म नेमके लक्षात घेऊन त्यांना शब्दरूप देण्याची शक्ती लेखकाच्या ठिकाणी आहे. एखाद्या अनुभवाची नेमकी प्रकृती लक्षात घेणे व ती प्रगट होईल असे शब्दरूप त्याला देणे ही गोष्ट सोपी नव्हे. पाटील यांच्या कथांमधून खेड्यांतील स्त्रीपुरुषांचे हे अर्थपूर्ण अनुभव त्यांच्या विशेष धर्मासह विलक्षण प्रत्ययकारकपणे व्यक्त होतात व त्या अनुभवांना त्यांचे असे अनन्यसाधारणत्व लाभते. खेड्यातील सुखदु:खात्मक अनुभवसृष्टीला या कथांमध्ये एक आगळाच रूपगंध येतो. –वा. ल. कुलकर्णी\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":47025178804438,"sku":null,"price":133.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-gm.jpg?v=1751605617","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/ghalmel-shankar-patil","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}