{"product_id":"ghartyabaher-marathi","title":"घरट्याबाहेर (Ghartyabaher)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eपंख न फुटलेल्या चिमुकल्या पाखरांचे घरटे रक्षण करते; पण पंख फुटलेल्या पाखरांना तेच घरटे पिंजर्यासारखे होते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eकुटुंब, घर, देव, धर्म, प्रेम, शिक्षण, शेती, उद्योगधंदे, इत्यादिकांविषयीच्या आपल्या आजच्या कल्पनांची हुबेहुब हीच स्थिती आहे. मानवजातीच्या बाल्यात या सर्व कल्पना सुंदर होत्या; इतकेच नव्हे, तर समाजाचे संरक्षण करण्याचे आणि सामर्थ्य वाढविण्याचेच काम त्यांनी केले आहे. पण आजच्या यंत्रप्रधान संस्कृतीत या जुन्या कल्पनांचा काडीमात्र तरी उपयोग आहे का ? मध्यम वर्गातल्या बुद्धिवान व कर्तृत्ववान तरूणत्तरुणींची बुद्धी पिंजर्यात अडकून पडली आहे. त्यांचे कर्तृत्व कुटुंबाच्या तुरुंगापलीकडे सहसा जाऊच शकत नाही. मध्यम वर्गाचे हे प्रतिनिधी राजकीय व सामाजिक सुधारणेच्या गोष्टी तोंडाने बोलत असले, तरी वस्तुस्थितीकडे ते डोळेझाक करीत आहेत.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eशिक्षण, कुटुंबव्यवस्था, संपत्तीची वाटणी, स्त्रीपुरुषांचे संबंध, इ. बाबतींतल्या जुना मार्ग खाचखळग्यांनी भरलेला असून, समाजाच्या गाड्याला त्यामुळे पदोपदी भयंकर धक्के बसत आहेत, हे जाणूनही नव्या पाउलवाटेकडे त्यांचे पाय वळत नाहीत.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eयाचे मुख्य कारण आहे : घरट्याबाहेर न पडण्याची वृत्ती ! वैयक्तिक जीवनाची आसक्ती आणि सामाजिक जीवनाविषयीची उदासीनता.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":47052735545558,"sku":null,"price":125.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-baher.jpg?v=1752402406","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/ghartyabaher-marathi","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}