{"product_id":"madhyamantale-divas-by-dr-keshav-sathaye","title":"माध्यमांतले दिवस (Madhyamantale Divas)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eमाध्यमांतील दिवस' हे डॉ केशव साठये यांचे पुस्तक म्हणजे टीव्ही , रेडिओ ,जाहिरात क्षेत्रातील प्रवासाचा एक अनोखा जागर आहे . \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसामाजिक माध्यमांच्या गदारोळात , कृत्रिम बुद्धिमत्तेचे आगमन होत असताना डॉ साठये यांनी रंगवलेली ही मैफिल स्मरणरंजना बरोबर माध्यमांच्या भविष्याचा वेधही वस्तुनिष्ठपणे घेताना दिसते. \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eदूरचित्रवाणी कार्यक्रम निर्मितीचे विविध पैलू  समजून घेण्यासाठी हे पुस्तक  वाचायलाच हवे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमुंबई दूरदर्शन , पुणे आकाशवाणी ,फिल्म इंस्टिट्यूट यांची सैर घडवत सवाई गंधर्व , मॅजेस्टिक गप्पा , पुणे नगर वाचन मंदिर , ब्रिटिश लायब्ररी यांचे व्यक्तिमत्व आपल्या डोळ्या समोर उभे करण्याची किमया या पुस्तकात साधली आहे . लेखकाला माध्यम प्रवासात भेटलेली माणसे ,हे लेखन वाचता वाचता आपली होऊन जातात हा या पुस्तकाचा परमोच्च बिंदू म्हणावा लागेल.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eज्येष्ठ लेखिका डॉ करुणा गोखले यांची अभ्यासपूर्ण  प्रस्तावना या पुस्तकाचे मोल अधोरेखित करणारी आहे .\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":46967642357974,"sku":"","price":300.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-md.jpg?v=1749896512","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/madhyamantale-divas-by-dr-keshav-sathaye","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}