{"product_id":"manavjatichi-kahani-dr-henry-thomas","title":"मानवजातीची कथा (Manavjatichi Katha)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eमाकडातून उत्क्रांत होत-होत प्राणी जन्माला यायला जवळजवळ चार\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eकोटी वर्षे लागली. त्याला ताठ उभे राहता यायला व दगडधोंड्यांनी\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआपले भक्ष्य मारून खाता यायला आणखी तीन लक्ष वर्षे लागली. पुढे\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआणखी पन्नास हजार वर्षे गेली आणि त्याला तांब्याचा शोध लागला.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमारण्याची, संहाराची अधिक प्रभावी हत्यारे तो बनवू लागला. त्यानंतर\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eदोन हजार वर्षांनी त्याला लोखंड सापडले. हिंसेची साधने अधिकच प्रखर\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअशी तयार झाली. मारण्याच्या पद्धतीत अधिक कौशल्य आले.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eलोखंडाच्या शोधानंतर पाच हजार वर्षांनी डायनामाइटचा शोध लागला.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eत्यानंतर कित्येक शतकांनी त्याने पाणबुड्या बांधल्या व विमाने बांधली,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआणि दुसऱ्या प्राण्यांचा संहार करण्याची त्याची संशोधक बुद्धी पूर्णतेस\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eपोहचली. मानवाच्या मत्थड मेंदूला ‘हिंसा म्हणजे मूर्खपणा आहे’. ही\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eगोष्ट कळायला आणखी पन्नास हजार वर्षे लागतील. संहार करण्यापेक्षा\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eहितकर व उपयोगी अशा दुसऱ्या उद्योगात वेळ दवडणे अधिक चांगले, ही\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eगोष्ट तेव्हा त्याच्या लक्षात येईल.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमनुष्य अगदी मत्थड प्राणी आहे. फारच हळूहळू त्याची प्रगती होत आली\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआहे; आणि जी काही थोडीफार प्रगती झाली, तीही सारखी अखंड होत\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआली असेही नाही. कधी प्रगती तर कधी अधोगती, असे सारखे चालले\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआहे. उंचावरून कितीदातरी हा प्राणी खाली घसरला आहे; वर चढून\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eपुन्हा कितीदा तो खाली पडला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45670265684182,"sku":null,"price":405.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-ManavJatichiKatha.jpg?v=1744864951","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/manavjatichi-kahani-dr-henry-thomas","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}