{"product_id":"mukhavata-lok-aavruti-arun-sadhu","title":"मुखवटा (Mukhavata)","description":"\u003cp\u003eरक्ताच्या नात्याचा संबंध देखील उरला नाही, अशा \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eघराच्या रगाड्याला जुंपलेली ती आहे सत्तर वर्षांची \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eनिपुत्रिक बालविधवा. तिला कादंबरीची नायिका तरी कसे \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eम्हणायचे ! आहे खरी कथाभागाच्या केंद्रस्थानी. उसन्या \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eनातेवाईकांच्या मुला-बाळांना मायेच्या घट्ट धाग्यांनी \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजखडून ठेवणारी. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eशेतीला जखडलेल्या मध्यमवर्गीय कुटुंबाची ससेहोलपट, \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eत्यामुळे नव्या-जुन्या पिढ्यांमध्ये होणारी घुसमट, \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eवंशसातत्याची सनातन आस, पुरुषी संस्कृतीने स्त्रियांच्या \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eव्यापक सर्जनशीलतेकडे फिरविलेली पाठ आणि \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eउच्चकुलीनतेचा टेंभा मिरविणा-या घराण्याच्या अंधा-या \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतळघरातील अज्ञात रहस्ये अशा विविध स्तरांवर \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eवावरणा-या व-हाडच्या पाश्र्वभूमीवरील या बहुपदरी व \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eगुंतागुंतीच्या कादंबरीत तसे अनेक नायक व नायिका \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसापडतील. मग या वृद्धेलाच नायिका का करू नये ? \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतिनेच आपल्या कर्तृत्वाने व निष्ठेने या घराण्याच्या परंपरा \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजपून त्यांना नवी वळणे दिली आहेत. अखेर प्रत्येक \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eघरातील वैशिष्ट्यपूर्ण कुलसंस्कृती, आचार-विचार व \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eस्वयंपाक-संस्कृती देखील डोळ्यात तेल घालून जतन \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकरतात व त्यात भर घालतात त्या परक्या घरातून \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआलेल्या स्त्रियाच ना ! \u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":47083582685398,"sku":null,"price":360.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-Mukhawata.jpg?v=1753454895","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/mukhavata-lok-aavruti-arun-sadhu","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}