{"product_id":"parenting-garbhasanskar-pregnancy-ayurvedik-garbhasanskaraayurvedik","title":"अडगुलं मडगुलं (Adagula Madagula)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e‘अडगुलं मडगुलं, सोन्याचं कडगुलं रुप्याचा वाळा, तान्ह्या बाळा, तीऽऽऽट लावू.’\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eनातवाशी असं लाडे लाडे बोलणारी आजी तुमच्या आठवणीत असेल कदाचित. त्या काळी घर मोठं आणि त्यात उतरंडीसारखी एका खालोखाल एक अशी मुलं असायची.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमुलांचं शिक्षण आणि संगोपन परस्पर पार पडायचं. मुलांवर संस्कार आपोआप घडायचे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआज चित्र बदललेलं आहे. कित्येक घरी आपण दोघं व आपलं घरकुल असा आईबाबांचा सुटसुटीत आटोपशीर आजी-आजोबाविरहित संसार.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eछकुल्याच्या संगोपनाची आणि जडणघडणीची सर्वस्वी जबाबदारी फक्त आईबाबांची!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eकाही घरी आईबाबा दोघंही जाणार नोकरीवर आणि बालक राहणार पाळणाघरात!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eपरवडच परवड! बालकाची व त्याच्या आईबाबांची!!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eधार नाही, आधार नाही! काही पालकांना सतत अपराधीपणाची भावना!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eभावना कमी करायला आधाराचा हात म्हणजे अडगुलं मडगुलं!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eभ्रूणावस्था, जन्म, नवजात बालकांचं पोषण, त्यांचं शारीरिक स्वास्थ्य, त्यांचं बालसुलभ आचरण, त्यांच्या मनाचं व भावनांचं संगोपन, त्यांच्या तनाचा अन् मनाचा विकास, त्यांच्या संवेदना आणि आईबाबांकडून त्यांच्या अपेक्षा यांची 20 वर्षे वय होईपर्यंत अत्यंत सुसंगत नोंद म्हणजेच अडगुलं मडगुलं!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअडगुलं - मडगुलं म्हणजे बालसंगोपनाचं दैनिक पंचांगच!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45944525258966,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-adgula.jpg?v=1744863349","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/parenting-garbhasanskar-pregnancy-ayurvedik-garbhasanskaraayurvedik","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}