{"product_id":"rajmata-jijau-sakal-janvaadee-krantichya-shilpakara","title":"राजमाता जिजाऊ  (Rajmata Jijau)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eराजमाता जिजाऊ : सकलजनवादी क्रांतीच्या शिल्पकार\u003c\/strong\u003e हे लौकिकार्थाने जिजाऊंचे चरित्र नाही. हे पुस्तक जिजाऊंच्या जीवनातील परिचित घटनांची जंत्री देत नाही, तर...\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजिजाऊंची जडणघडण कशी झाली? \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eत्यांनी शिवरायांना कसे घडवले?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजिजाऊंचा मूल्यविचार नेमका काय होता?  \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजिजाऊंनी केलेले संस्कार स्वराज्यनिर्मितीसाठी कसे पायाभूत ठरले? \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहे सांगते आणि जिजाऊंनी केलेली स्वराज्याची पायाभरणी उलगडून दाखवते. \u003c\/p\u003e\n\u003cul\u003e\n\u003cli\u003eरयतेची काळजी घेणाऱ्या एक उत्तम प्रशासक जिजाऊ \u003c\/li\u003e\n\u003cli\u003eशहाजीराजांची सखी आणि शिवरायांच्या सल्लागार असणाऱ्या जिजाऊ \u003c\/li\u003e\n\u003cli\u003eपेचप्रसंगांतून तलवारीपेक्षा बुद्धिमत्तेच्या जोरावर वाट काढणाऱ्या जिजाऊ\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eशिवरायांवरच नाही तर त्यांच्या सोबत असणाऱ्या मावळ्यांवर पुत्रवत प्रेम करणाऱ्या जिजाऊ \u003c\/li\u003e\n\u003cli\u003eलोकभाषा, लोककला, लोकसंस्कृती, ग्रंथ-काव्यनिर्मिती यांना प्रोत्साहन देणाऱ्या जिजाऊ  \u003c\/li\u003e\n\u003cli\u003eजात-धर्म-लिंग-वंश-भाषा या सर्वांपलीकडे जात समतावादी मूल्यांची रुजवण करून लोककल्याणकारी स्वराज्याचा पाया घालणाऱ्या जिजाऊ    \u003c\/li\u003e\n\u003cli\u003eशिवराय, संभाजीमहाराज, येसूबाई, ताराराणी यांचीच नाही तर महाराष्ट्रातील आधुनिक विचारवंतांची प्रेरणा ठरलेल्या जिजाऊ \u003c\/li\u003e\n\u003cli\u003eसर्जनशील मानवी चेतनेचा सर्वोत्कृष्ट आविष्कार जिजाऊ\u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e\n\u003cp\u003eअसे जिजाऊंच्या जीवनाचे वेगवेगळे पैलू उलगडून दाखवणारे अभिनव पुस्तक \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजिजाऊंच्या जगण्यावर प्रभाव टाकणारे पूर्वसुरी वणंगपाळ निंबाळकर, लखुजीराव जाधवराव, उमाबाई अशी सर्वसामान्यांना अपरिचित पण महत्त्वाची व्यक्तिमत्त्वे या निमित्ताने वाचकांच्या समोर येतात.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eइतिहास, राज्यशास्त्र, तत्त्वज्ञान, धर्म, भाषा, साहित्य, भूगोल, लोकसंस्कृती अशा विविध अभ्यासशाखांची मर्मदृष्टी घेऊन जिजाऊंच्या जीवनकाळातील घटनांचा घेतलेला आढावा वाचणे ही एक पर्वणीच ठरते.\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45451049664726,"sku":null,"price":499.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-81AIyt4KzQL._SL1500.jpg?v=1744865801","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/rajmata-jijau-sakal-janvaadee-krantichya-shilpakara","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}