{"product_id":"ramnagari-marathi-ram-nagarkar","title":"रामनगरी (Ramnagari)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eराम नगरकर हे नाव आपल्यापुढं प्रथम आलं, ते एक नट म्हणून – तेही एक विनोदी नट म्हणून.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e‘विच्छा माझी पुरी करा’ मधील ‘मावशी’ आणि ‘हल्या’ या दोन भूमिकांमुळे ते एकदम प्रसिद्धीच्या झोतात आले.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eत्यानंतरच्या ‘कथा अकलेच्या कांद्याची’, ‘मी लाडाची मैना तुमची’, इत्यादी लोकनाट्यांतील त्यांच्या अन्य भूमिकाही तेवढ्याच गाजल्या. चित्रपटांमधूनही त्यांनी काही भूमिका केल्या. हे झालं त्यांचं बहुरुपी रुप.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआज ते आपल्यापुढं येताहेत एका एकपात्री प्रयोगात. सोबत आहेत त्यांच्या नागर आणि जानपद जीवनातले अनगड अनुभव. समृद्ध आणि विनोदानं रसरसलेले जिवंत अनुभव.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअसे अनुभव आपल्या गावरान भाषेत शब्दबद्ध करताना स्वत:च्याच अंधश्रद्धा, मूर्ख समजुती, बेगंडी प्रतिष्ठा, खोटा लौकिक, दंभ, अहंकार यांची प्रच्छन्न, परंतु रांगडी टवाळी उडवून वाचकांना हास्यरसात डुंबत ठेवण्याचे त्यांचे कौशल्य विरळेच मानावे लागेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45574953173206,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-ram.jpg?v=1748953915","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/ramnagari-marathi-ram-nagarkar","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}