{"product_id":"shivrayanche-eknishta-mavle-shiva-kashid-v-bajiprabhu-deshpande-by-prashant-kulkarni","title":"शिवरायांचे एकनिष्ठ मावळे शिवा काशीद बाजीप्रभू देशपांडे (Shivrayanche Eknishta Mavle - Shiva Kashid Bajiprabhu Deshpande)","description":"\u003cp\u003eस्वराज्याच्या यज्ञात आहुती देण्यासाठी अनेक नरवीर हसत हसत पुढे आले. त्यामधील शिवा काशीद  व बाजीप्रभू देशपांडे यांच्या सारख्या नरवीरांच्या बलिदानामुळे हिंदवी स्वराज्य राखले गेले. यांच्या जीवनचरित्राचा थोडक्यात आढावा या पुस्तकात घेतला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसहा फूटांपेक्षा जास्त उंची असलेले, भक्कम शरीराचे, पहाडासारखे बाजीप्रभू देशपांडे हे एक असाधारण व्यक्तीमत्व होते. बाजीप्रभू देशपांडे हे पराक्रमी लढवय्ये होते, तसेच ते प्रशासनाच्या कामातही पारंगत होते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eशिवरायांसारखे दिसणारे,  मध्यम उंचीचे, रंगाने गोरे, मजबूत शरीर असलेले शिवा काशीद यांचे व्यक्तीमत्व फारच प्रभावी होते. एका सामान्य कुटुंबात जन्माला आलेले शिवा काशीद यांनी शिवरायांसाठी व स्वराज्यासाठी आपली आहुती दिली. इतिहासातील अनेक वीर कसे जगले ते सांगितले जाते मात्र 'शिवा काशीद'  यांनी कसे बलिदान दिले हे पुढील हजारों वर्षे सांगितले जाईल;  हीच तर शिवा काशीद यांची थोरवी आहे.\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":46968856510678,"sku":"","price":120.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-sk.jpg?v=1749975657","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/shivrayanche-eknishta-mavle-shiva-kashid-v-bajiprabhu-deshpande-by-prashant-kulkarni","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}