{"product_id":"shodh-maharashtracha-vijay-apte","title":"शोध महाराष्ट्राचा (Shodh Maharashtracha)","description":"\u003cp\u003e'मराठी लोकांना आपल्या इतिहासाचा खूप अभिमान वाटतो. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमहाराष्ट्राला इतिहास आहे, इतर प्रांतांना फक्त भूगोल आहे, \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअसे अभिनिवेशाने म्हणण्यापर्यंत कधीकधी आपली मजल जाते. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतथापि आपले इतिहासाबद्दलचे ज्ञान मात्र मध्ययुगापर्यंत - \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eशिवपूर्वकालापर्यंत - जाऊन थबकते. त्यापूर्वीचा समृध्द इतिहास, \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसुमारे दोन हजार वर्षांपूर्वीपर्यंत विस्तारता येणारी त्याची मर्यादा, \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eत्या प्रदीर्घ कालखंडातील विविध स्थित्यंतरे आणि चढउतार \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eयाबाबत मात्र आपल्याला पुरेशी माहिती नसते. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहा ग्रंथ ती तशी माहिती करून देणारा वैशिष्टयपूर्ण ग्रंथ आहे. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसातवाहन, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार, यादव इ. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eराज्यकर्त्या घराण्यांच्या इतिहासाची दखल घेत पुढे जाणारा \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहा ग्रंथ शिवशाहीला आणि पेशवाईलाही आपल्या कवेत घेतो \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआणि इतिहासाचा तो धागा संयुक्त महाराष्ट्राच्या यशस्वी \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआंदोलनापर्यंत - अगदी आजच्या महाराष्ट्रापर्यंत - आणून सोडतो. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजवळजवळ दोन हजार वर्षांच्या इतिहासातील \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअनेक स्थित्यंतरांचा साकल्याने वेध घेणारा हा ग्रंथ \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमहाराष्ट्राच्या वर्तमानाकडे व भविष्याकडेही \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eवेगळया नजरेने पाहण्याची दृष्टी आपल्याला देतो... \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eइतिहासाची गती चक्राकार असते, \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअसे डॉ. राम मनोहर लोहिया यांचे मत होते. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eउत्पत्ती, स्थिती आणि विनाश \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया अवस्थांच्या फेऱ्यांतून वरखाली होणारे इतिहासचक्र नीट न्याहाळले, \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतर आपल्याला अनेक बोचऱ्या प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसर्व महाराष्ट्रप्रेमींनी आवर्जून वाचावा व संग्रही बाळगावा, \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअसा साधार, साक्षेपी इतिहासग्रंथ... '\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":47083125571798,"sku":null,"price":540.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-sm_ea094077-e5fc-4ccc-82e6-c90f986f71a3.jpg?v=1753439153","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/shodh-maharashtracha-vijay-apte","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}