{"product_id":"shreeganesha-marathi-shankar-patil","title":"श्रीगणेशा (Shreeganesha)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eगंगीला पदर येऊन ती मकरात बसली तेव्हापासून या खडकलाटेचे डोळे तिच्याकडं लागून आहेत. तिच्या रूपाची पडलेली भूल अजून तशीच आहे; कारण गंगीचं अंग चांगलं उफाड्याचं आहे आणि थोरवड अंगाच्या ह्या गंगीचं कातडंही हळदीगत गोरंपान आहे. तिच्या नाकाचा शेंडा जरासा खुडल्यागत दिसतो; पण तेच नाक तिला शोभून दिसतं असं तिथल्या तरुण पोरांचं मत आहे. तिच्या गो-या गालावर डाव्या बाजूला एक हिरवा तीळ आहे, तो तिला पाहणा-याच्या मनावर ठसल्याशिवाय राहत नाही. तिच्यासारखा वाकडा भांग गावातल्या दुस-या कुठल्या पोरीनं अजून काढला नाही, अनेक कुभांडं त्या गावानं तिच्यावर रचली आहेत. तिच्यासारखे कानावर फुगे पाडणारी पोर त्या गावात निपजायला अजून किमान दहा वर्षं तरी जावी लागतील !\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":47025646797014,"sku":null,"price":190.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-shree_02e9d4cd-f6c6-4724-ac02-b5ee887a911b.jpg?v=1751611242","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/shreeganesha-marathi-shankar-patil","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}