{"product_id":"shubhra-kahi-jivghene-ambrish-mishra","title":"शुभ्र काही जीवघेणे (Shubhra Kahi Jivghene)","description":"\u003cp\u003eकलेचा प्रवास धुंद करणारा असतो. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eयश, कीर्ती, मान-सन्मान ही या प्रवासातली \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eरमणीय विश्रामस्थळं असतील. परंतु प्रतिभेचा \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eधूप  जाळणारे मनस्वी कलावंत जीवनार्थाचं \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमंथन करण्यातच मग्न असतात. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e'शुभ्र काही जीवघेणे' शोधत असतात. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआपल्या प्रासादिक कलागुणांनी साहित्य, \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eनाटय, संगीत अन् सिनेमाचा परिसर उजळून \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकाढणारी सात कलंदर व्यक्तिमत्त्वं या \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपुस्तकाला रेलून उभी आहेत. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रत्येकाचं जगणं भिन्न.  प्रत्येकाच्या \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआयुष्यातल्या हालचाली अगदी वेगळयाच. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eईर्ष्या, वासना अन् \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रेरणांची गुंतागुंत अनोखी. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रत्येकजण म्हणजे एक स्वायत्त कलाकृतीच. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपरंतु प्रतिभेच्या वरदानाने आणि नितांत \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअस्वास्थ्याने सगळेच भारून गेलेले. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e'लस्ट फॉर लाईफ'ने निथळत राहिले. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e'जीवातळी आंथरितू आपुला जीवू' या \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआंतरिक प्रेरणेने सळसळत राहिले. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eयापैकी काहींना यशाने वरलं. काहींना नशीबाने \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहुलकावण्या दिल्या. तर काही मानभंग होऊन \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआडवळणाच्या शेवटाला विव्हळत राहिले. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपरंतु आयुष्यातल्या या चढ-उतारांमुळे यापैकी \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकुणाचीच प्रतिभा म्लान झाली नाही, \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजगण्याची रग ओसरली नाही. \u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":47092779319510,"sku":null,"price":175.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-shubhr.jpg?v=1753779896","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/shubhra-kahi-jivghene-ambrish-mishra","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}