{"product_id":"tar-kara-suru-bhag-2","title":"तर करा सुरु (भाग २)- Tar Kara Suru bhag-2","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eप्रिय मुलांनो,\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतुम्हाला तुमचे विज्ञानाचे प्रयोग इतरांना दाखवायचे आहेत? प्रयोगातून नवीन प्रयोग शोधायचे आहेत ?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपण एक गोष्ट लक्षात ठेवा. प्रत्येकवेळी पहिल्याच प्रयत्नात तुमचा प्रयोग यशस्वी होईलच असे नाही. अशावेळी आपले काय चुकतं ? हे शोधण्याचा प्रयत्न करा. आणि मग तुम्ही यशस्वी होणारच !\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रयोग ही सुसंगत कृतींची मालिका असते आणि कृतींमागील कारणे समजून घेतली की प्रयोगातले विज्ञान समजते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहे पुस्तक यासाठीच तर आहे!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e‘तुमच्या हातून झालेली चूक तुम्हाला नव्याने शिकण्याची संधी देते’\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eही चिनी म्हण नेहमी लक्षात ठेवा.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमी तुमच्या ‘प्रयोग पत्रांची’ नेहमीच वाट पाहत असतो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतुमचा दोस्त,\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eराजीव तांबे\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e(tarkarasuru@gmail.com)\u003c\/p\u003e\n\u003chr\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eप्रिय पालक,\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया पुस्तकातील प्रयोग मुलांनीच करायचे आहेत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e* प्रयोग करताना काहीवेळा मुलांच्या चुका होतील, पण अशावेळी त्यांना चूक दाखवू नका. तर, त्यांना चूक शोधण्याची म्हणजेच चुकांतून शिकण्याची संधी द्या.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e* प्रयोग करताना काहीवेळा मुलांच्या हातून पाणी सांडतं किंवा काहीतरी फुटतं-तुटतं. अशावेळी मुलांना ओरडू नका आणि उपदेश तर अजिबात करू नका. त्याउलट मुलांशी प्रयोगाबाबत बोला.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहे प्रयोग बहुतांश ‘शून्य खर्चाचे’ आहेत. मुलांनी स्वतःहून प्रयोग करावेत यासाठी त्यांना प्रोत्साहित करा.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e‘शिकणाऱ्या मुलांना तुमच्या सहभागाची नव्हे तर सहवासाची गरज असते’ ही चिनी म्हण नेहमी लक्षात ठेवा.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eमुलांचा दोस्त,\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eराजीव तांबे\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":46768569843926,"sku":"","price":120.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-TarKaraSuruBhag2_Cover-1.jpg?v=1745320896","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/tar-kara-suru-bhag-2","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}