{"product_id":"tissue-paper-rawalkar-ramesh","title":"टिश्यू पेपर (Tissue Paper)","description":"\u003cp\u003eपरमीट रूम, बार, हॉटेल ही छंदीफंदी लोकांची भुरळ घालणारी दुनिया. हे एक \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eस्वतंत्र जग असते. तिथे झगमगाट, उच्चभ्रूंचा वावर आणि अय्याशी फेर धरत \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअसते; तर दुसऱ्या बाजूला रोजीरोटीला महाग झालेले गोरगरीब, शोषित, \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपीडित लोक या दुनियेत स्वत:ला हरप्रकारे जाळून नेस्तनाबूत करत असतात. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eभारतासारख्या देशातील दोन वर्गांतील दरी पाहायची असेल, तर आपल्या \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजवळपासचे परमीट रूम, बार, हॉटेल हे एक उत्तम अनुभवक्षेत्र असते. अशा \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eठिकाणी काम करणाऱ्या कामगाराच्या आयुष्याचा पट रमेश रावळकर यांनी \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e‘टिश्यू पेपर' या कादंबरीत चित्रित केलेला आहे. शोषितांच्या जगण्याचे भयावह \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eरूप आपल्याला या कादंबरीत वाचावयास मिळते. मराठी साहित्यात अपवादानेच \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eचित्रित होणारे अर्थशास्त्रीय वास्तव प्रकर्षाने वाचकास टोचण्या देऊ लागते. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eश्रीमंत, गर्भश्रीमंत, उच्चमध्यमवर्ग, मध्यमवर्ग, सामान्य माणूस आणि \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअतिसामान्यांचे गूढ विश्व हा लेखक ‘टिश्यू पेपर' या कादंबरीत आपल्यासमोर \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eठेवतो. नाचणारी-गाणारी, पिणारी-पाजणारी, बेहोश होणारी, सांभाळणारी, \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eस्वत:ला गाडून घेऊन पुन्हा उगवणारी आणि दुसऱ्यांना जगवणारी एक \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजीवनेच्छा इथे प्रवाहित होताना दिसते. भाषेची परिपूर्ण जाण, व्यक्तीच्या \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअंतर्मनाचा तळ शोधण्याची प्रचंड आकांक्षा यातून या कादंबरीचे अनुभवविश्व \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eवाचकाला श्रीमंत करून जाते. माणूस होण्यासाठी ज्यांना ज्यांना डागण्या देणे \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eगरजेचे आहे; त्या सर्वांना डागण्या देत कधी खोलवर जखम करत ही कादंबरी \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआपल्याला अस्सल साहित्यकृती वाचल्याचा अनुभव देते. प्रत्यक्ष जगलेले \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजीवनानुभव साहित्यात जसेच्या तसे ओतून एक जिवंत कलाकृती निर्माण \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकरण्याचा प्रयत्न रमेश रावळकर यांनी ‘टिश्यू पेपर' या कादंबरीत केलेला आहे. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eवाचक या कलाकृतीचे निश्चितच स्वागत करतील, याची मला खात्री वाटते ! \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eराजन गवस\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":47085326172374,"sku":null,"price":360.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-tiisue.jpg?v=1753540304","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/tissue-paper-rawalkar-ramesh","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}