Description
कोर्टाच्या आत एक वेगळंच जग नांदत असतं. पक्षकारांचे, साक्षीदारांचे, आरोपींचे, त्यांच्या नातेवाईकांचे किती तरी नमुने आणि त्यांच्या मानसिक आंदोलनांचे कित्येक आविष्कार तिथे बघायला मिळतात. आपल्या समाजातल्या, तसंच मानवी स्वभावातल्याही काळ्या-पांढऱ्या छटांचं, त्यातल्या खाचाखोचांचं दर्शन होतं. अकरा वर्षांची वकिली आणि सव्वीस वर्षं न्यायदानाचा दीर्घ अनुभव असणाऱ्या निवृत्त न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांच्याकडे असं मोठं संचित जमा होणं साहजिकच. या पुस्तकातून त्यांनी हे संचित वाचकांसमोर ठेवलं आहे. या आहेत न्याय व्यवस्थेतल्या संवेदनशील ‘माणसा'ने लिहिलेल्या प्रांजळ नोंदी !
Details
Author: Mrudula Bhatkar | Publisher: | Language: | Binding: | No of Pages: