गोष्टी सांगताना आपल्याकडे नेहमी दाद अपेक्षित असते. पण या गोष्टी वेगळ्या आहेत. सगळ्याच गोष्टी दाद अपेक्षित ठेवून सांगितल्या जात नसतात. काही गोष्टी आपल्या मनावर डोंगराएवढं ओझं वाटत असतात. कुणाला तरी सांगायला पाहिजे असं वाटतं. एकदा शूटिंगच्या निमित्ताने एका गावात ड्रोन हवेत उडवला होता. गावकरी कुतूहल म्हणून जमा झाले होते. त्यातला एक माणूस म्हणाला, 'किती दिवस झाले राव वर बघून ! आभाळाकड बघणंच सुटलं होतं'. ऐकून धक्का बसला. माणसं वर बघायचेच विसरून गेलेत. आग ओकणारा सूर्य असतो खूपदा वर. तेंडुलकर जेवढा कौतुकाने वर आकाशाकडे बघत मैदानात उतरायचा ना तेवढ्या कौतुकाने बळीराजा वर बघत शेतात जायला हवा. ऐकायला साधी वाटते ही अपेक्षा, पण खूप अवघड आहे. गावोगावी अशाच गोष्टी आहेत. प्रत्येक शेतकऱ्याची गोष्ट छोटी वाटते पण असते डोंगराएवढी !
Author: Arvind Jagtap | Publisher: | Language: | Binding: | No of Pages: