Description
मागच्या महिन्यात मी स्टोरीटेल या appचं सशुल्क सदस्यत्व घेतलं.या appवर खूप मराठी कथा, कादंबऱ्या, पुस्तके ध्वनिमुद्रित केलेली आहेत. ज्यांना साहित्य वाचायची इच्छा आहे पण प्रत्यक्ष वाचन करणं काही कारणामुळे जमत नाहीये त्यांना हा पर्याय चांगला आहे. पुस्तकांनाचं वाचन, ध्वनिमुद्रण, पार्श्वसंगीत हे सगळं यथायोग्य आणि आकर्षक आहे. मी या अँपवर काही कथा ऐकल्या. काही पुस्तकं वाचायला सुरुवात केली पण अजून पूर्ण झाली नाहीत.
सगळयात पाहिलं पुस्तक जे उत्सुकतेने ऐकून पूर्ण केलं ते मंगला गोडबोले यांचं "जिथली वस्तू तिथे". मंगला ताईंच्या नेहमीच्या खुसखुशीत विनोदी शैलीतल्या कथा आहेत. मध्यमवर्गीय घरात घडणाऱ्या प्रसंगांची खुमासदार वर्णनं ऐकताना "अरेच्च्या, सगळ्या घरी असंच घडतं; फक्त आपल्याकडेच घडतं असं नाही" असं वाटून गंमत येते.
Details
Author: Mangala Godbole | Publisher: Menaka Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 126