प्रकाश नारायण संत यांचा ‘पंखा’ हा तिसरा कथासंग्रह. लंपन या निसर्गात रमलेल्या, चराचराविषयी कुतूहल असलेल्या, संगीत, चित्रकला, खेळ आदी गोष्टींची विलक्षण ओढ असलेल्या मित्र-मैत्रिणींत हरवूनही स्वत:च्या वेगळेपणाची जाणीव करून देणार्या, कल्पक, शोधक वृत्तीच्या संवेदनाशील मुलाच्या भावजीवनाच्या चित्रणाला ‘वनवास’मध्ये सुरूवात होते आणि ‘शारदा संगीत’ आणि ‘पंखा’ या संग्रहांतून ते विकसित होत राहते.
अशा चार संग्रहांतून उघडत जाणार्या लंपनच्या विशिष्ट पर्वातील भावविश्र्वासमवेत, कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्या सीमेवर वसलेल्या एका सुंदर लहानशा गावाचे - तिथल्या निसर्गाचे, माणसांचे, प्राण्यांचे व्यापक दर्शन घडते. तिथल्या प्रादेशिक वातावरणाला वेढून राहिलेल्या ‘कानडीची चाल लागलेल्या मराठीचा गोडवा’ मनात भरून राहतो.
Author: Prakash Narayan Sant | Publisher: Mouj Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 191