प्लेझर बॉक्स'च्या निर्मितीत एक गोष्ट कटाक्षाने टाळायचा प्रयत्न केला आहे. निव्वळ खुषामत करणारी पत्रं किंवा संपूर्ण पत्रातला खुषामत वा बेदम कौतुक करणारा मजकूर प्रकाशित होऊ द्यायचा नाही. ही खुषीपत्रांची पोतडी नाही. एक संवाद आहे. आनंदाची देवाणघेवाण आहे. संवादाच्या, गप्पागोष्टींच्या ओघात आपण एकमेकांबद्दल जेवढं चांगलं बोलतो तेवढं स्तुतिपर बोलणं येणं अपरिहार्य आहे. हा पत्रव्यवहार मुळातच आवडनिवड कळण्यासाठीच निर्माण झाला आहे. तरीसुद्धा वाचकांची पत्रं काटछाट करूनच प्रकाशित केली आहेत. वाचकांच्या संकोचून टाकणार्या स्तुतीने त्यांचा भाव कळतो पण संवाद पुढे सरकत नाही. ज्या पत्रांनी आणखीन बोलायला लावलं त्याच पत्रांना अग्रक्रम मिळणं अपरिहार्य होतं
Author: V.P. Kale | Publisher: Mehta Publishing House | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 230