‘शारदा संगीत’ हा प्रकाश नारायण संत यांचा दुसरा कथासंग्रह. पाच दीर्घकथांचा. लंपन या निसर्गात रमलेल्या, चराचराविषयी कुतूहल असलेल्या, संगीत, चित्रकला, खेळ आदी गोष्टींची विलक्षण ओढ असलेल्या मित्र-मैत्रिणींत हरवूनही स्वत:च्या वेगळेपणाची जाणीव करून देणार्या, कल्पक, शोधक वृत्तीच्या संवेदनाशील मुलाच्या भावजीवनाच्या चित्रणाला ‘वनवास’मध्ये सुरूवात होते आणि ‘शारदा संगीत’ आणि ‘पंखा’ या संग्रहांतून ते विकसित होत राहते. या संग्रहातल्या ‘शारदा संगीत’ या कथेला दिल्लीच्या ‘कथा’ या संस्थेचे राष्ट्रीय पातळीवरले पारितोषिक मिळाले. याच संग्रहातल्या ‘आगगाडीच्या रुळांवर’ या कथेला ‘श्री. दा. पानवलकर पुरस्कार’ मिळाला. आणि वैशिष्ट्यपूर्ण कथालेखनासाठी असलेला, नाशिकचा, १९९६ चा ‘डॉ. अ. वा. वर्टी कथालेखक पुरस्कार’ त्यांना लाभला.
Author: Prakash Narayan Sant | Publisher: Mouj Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 161