Description
पडद्यावर दिसणारा दीड-दोन तासांचा सिनेमा आपण पाहतो, बरी वाईट टिप्पणी करतो. चांगल्यामध्ये गुंततो. न आवडलेला विसरून जातो. मात्र, त्यामागे काय विचार असतो, त्यासाठी किती कष्ट घेतलेले असतात याचा आपण फारसा विचार करत नाही, पण गणेश मतकरी यांचे हे पुस्तक आपल्याला तसा विचार करायला भाग पाडते. आल्फ्रेड हीचकॉक रहस्यपट, एक्झॉर्सीस्ट आणि भयाचा सिनेमाम युद्धप, सुपरमॅन स्पायडरमॅनसारखे सुपरहिरो, स्लमडॉग मिलेनिअर, समांतर चित्रपट, पहिल्या दशकाचा मराठी सिनेमा, हॉलीवूडपट आदी विषयांवर मतकरी त्यात यांनी विस्ताराने भाष्य केले आहे. सिनेमा या कलेतील बारकावे, सूक्ष्मता त्यांनी टिपल्या आहेत. भाषेचा डौल कायम ठेवून केलेली ही सिनेमाची मुशाफिरी आहे.
Details
Author: Ganesh Matkari | Publisher: | Language: | Binding: | No of Pages: