अगदी जन्माला आल्यापासून आपल्याला एक गोष्ट करायला सांगितली जाते.
आणि तीही लवकरात लवकर, सेटल व्हा! कॉलेज पूर्ण करा. सेटल व्हा. नोकरी शोधा. सेटल व्हा. लग्न करा. सेटल व्हा. मुलं होऊ द्या. सेटल व्हा. घर खरेदी करा. सेटल व्हा.
पण, मला माहिती आहे की तुम्ही सेटल व्हायला घाबरता. तुम्हाला ते नकोय म्हणून नाही तर तुम्ही ज्या गोष्टीसाठी सेटल होणार आहात ती योग्य आहे की नाही हे तुम्हाला माहीत नाही, म्हणून तुम्हाला भीती वाटते.
मी हे पुस्तक तुम्हाला मदत करण्यासाठी लिहिलं आहे. तुम्हाला सेटल होण्यास मदत करण्यासाठी नाही. तुम्हाला शोध घेण्यास मदत करण्यासाठी. तुमच्या करिअरसाठी योग्य मानसिकता घडवण्यासाठी. तुम्हाला एक असामान्य करिअर घडवण्यास मदत करण्यासाठी.
Author: Ankur Warikoo | Publisher: Madhushree Publication | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 235