असे घडवा तुमचे भविष्य (Ase Ghadava Tumache Bhavishya)

By: Dr. A.P.J. Abdul Kalam (Author) | Publisher: MyMirror Publishing House

Rs. 275.00
Order in the next [totalHours] hours %M minutes to get it between and

Guarantee safe & secure checkout

mastervisaupirupaynetbanking
Description

माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम हे युवकांमध्ये अतिशय लोकप्रिय होते. तेही मुलांमध्ये रमत. मुले दिसले की प्रोटोकॉल सोडून ते त्यांच्याजवळ संवाद साधायला जात असत. सोशल मिडीयामुळे युवकांशी रोज संवाद साधण्याची संधी त्यांना मिळाली.

तेथे हजारो युवक त्यांना विविध प्रश्न विचारीत. त्या सर्वांना ते उत्तर देत. तरुण भारतीयांच्या मनातील चिंता, समस्यांवर डॉ. कलाम यांनी दिलेली समर्पक उत्तरे आपल्याला 'असे घडवा तुमचे भविष्य 'मधून वाचायला मिळतात.

स्वत:वर विश्वास ठेवल्यास आयुष्यात कसा कायापालट होतो, मोठी स्वप्न बघण्याचा फायदा, वेळेचा सदुपयोग, अपयशावर मात, धैर्य, साहस, प्रामाणिकपणा याचे महत्त्व, भ्रष्टाचाराची कीड, तो निपटण्याची गरज, त्याचे मार्ग, एकत्र कुटुंबाचे फायदे, जीवनात कलेचे, पर्यावरणाचे महत्त्व विषद केले आहे.

समाजाच्या प्रगतीचे मूळ महिला सशक्तीकरणात असल्याचे डॉ. कलाम यांनी मेरी क्यूरी, सिस्टर अँटोनिया यांची उदाहरणे देत सांगितले आहे. मजबूत, सशक्त भारत, जागतिक स्पर्धा या विषयांवरही त्यांनी मार्गदर्शन केले.

वैयक्तिक विकास, सामाजिक, राष्ट्रीय प्रश्न, समस्यांवर ते बोलले आहेत. त्यांनी पुस्तकात दिलेला संदेश युवकांना प्रत्येक क्षेत्रात उपयोगी पडेल.

Details

Author: Dr. A.P.J. Abdul Kalam | Publisher: MyMirror Publishing House | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 216