सिद्धहस्त लेखक विजय तेंडुलकर यांच्या ललित लेखनाचा हा संग्रह आहे. राज कपूर, सारंग, माझा ज्योतिषी, माझी बहिण आणि जन्मदाता असे एकाहून एक पाच सकस लेख पुस्तकात वाचयला मिळतात. हे नेमके काय आहे, हे सांगायचे तर ते तेंडूलकरच सांगतात, केंव्हा केंव्हा आपले आयुष्य हाच एक रंगमंच वाटतो. माणसे येतात आणि न परतण्यासाठी जातात. परततात ती भूतकाल होऊन. वर्तमान खोटा वाटावा असा भूतकाल अशी ही काही माणसे काही हे सारे कोठून येते या संग्रहात आहेत. तर अशी ही व्यक्तिचित्रे आहेत. या व्यक्तीही वेगळ्या आहेत. राज कपूर कमलाकर सारंग हे चित्रपट, नाटकातील. दिवाडकर हे ज्योतिषी आहेत. 'जन्मदाता' हे त्यांनी त्यांच्या वडिलांविषयी लिहिलेले लेखन पत्राच्या फॉर्ममध्ये येते.
Author: Vijay Tendulkar | Publisher: Rajhans Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 129