ज्येष्ठ संशोधक, अभ्यासक रा. ची. ढेरे यांचे हे संप्रदायीसंबंधीचे संशोधन. महाराष्ट्राच्या इतिहासात नाथसंप्रदायाला अनन्यसाधारण महत्व आहे.
या सांप्रदायाचा त्यांनी मध्ययुगीन काळापासून मागोवा घेतला आहे.'नाथ संप्रदाय ही मध्ययुगीन भारतीय साधनेची गंगोत्री आहे'
असे ते सांगतात. महाराष्ट्रातील नाथ सांप्रदयाचा त्यांनी स्वतंत्रपणे विचार केला आहे. या संप्रदायाचा प्रभावही त्यांनी विशद केला आहे.
पुस्तकाच्या दुसऱ्या विभागात नाथ वाड्मय आणि महाराष्ट्र, नाथलीलामृत : तत्वगर्भ सिद्धकथा, नाथलीलाविलास : गोपाळनाथांची चरित्रगाथा,
गोपाळनाथ -श्यामराजनाना आणि गंगानाथ यांच्या स्फुट रचनांचा सविस्तर अभ्यास केला आहे. एकूण संग्रहात ठेवावा, असा हा संदर्भग्रंथ.
Author: Dr.R.C.Dhere | Publisher: Padmagandha Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 279