#पावसातलासह्याद्री शरद पवार (#Pavsatala Sahyadri Sharad Pawar)

By: Channavir Bhadreshwarmath (Author) | Publisher: Satish Dattatray Pawar

Rs. 425.00
Order in the next [totalHours] hours %M minutes to get it between and

Guarantee safe & secure checkout

mastervisaupirupaynetbanking
Description

राजकीय व सामाजिक स्थित्यंतरांचा अभ्यास करणारे, पत्रकार, विद्यार्थी,राजकीय पक्षांचे कार्यकर्ते या सर्वांसाठी ‘#पावसातीलसह्याद्री’ हे पुस्तक महत्वाचे आहे. हे पुस्तक महाराष्ट्र विधानसभेच्या २०१९ साली झालेल्या निवडणूकीतील एका अनपेक्षित घडामोडीचा दस्तावेज आहे.साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केल्यामुळे याच काळात सातारा लोकसभेसाठीही पोटनिवडणूक झाली.या निवडणूकीने महाराष्ट्राचे लक्ष वेधले.कारण ही लढाई बलाढ्य नेत्यांनी एकामागून एक साथ सोडल्याने गलितगात्र झालेला पक्ष विरुद्ध सर्वार्थाने बलाढ्य पक्ष अशी होती.या काळात शरद पवार यांनी महाराष्ट्राचे जनमाणस ढवळून काढले.त्यांच्या सभांना तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.सातारा येथे जिल्हा परिषद मैदानावर राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारासाठी त्यांनी घेतलेली ‘पावसातील सभा’ प्रचंड गाजली.या सभेने महाराष्ट्रातील राजकारणाचा नूर पालटविला.शरद पवारांची जी एक विशिष्ट प्रतिमा आजवर रंगविण्यात आली होती,तिलाही या सभेने छेद दिला.सोशल माध्यमांत या सभेचे जबरदस्त प्रतिबिंब उमटले शिवाय पवारांचे व्यक्तिमत्त्व झळाळून पुढे आले. ‘पावसात भिजणारे पवार’ हे छायाचित्र यानंतर शरद पवारांच्या व्यक्तीचित्रणाचा अविभाज्य घटक झाले.सोलापूर येथील प्रख्यात पत्रकार चन्नवीर भद्रेश्वरमठ यांनी हे पुस्तक संपादित केले असून व ज्येष्ठ राजकीय पत्रकार गिरीश लता पंढरीनाथ अवघडे यांनी सहसंपादन केले आहे.त्यांच्या अनुभवी व चिकित्सक नजरेतून या सभेबाबत सोशल मिडियातील सर्वंकष चर्चेचे तटस्थ,वस्तुनिष्ठ ‘दस्तावेजीकरण’ हा मराठी भाषेत क्वचितच आढळणारा विषय या पुस्तकात मांडण्यात आला आहे.

Details

Author: Channavir Bhadreshwarmath | Publisher: Satish Dattatray Pawar | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 200