Description
पत्रांची पेटी जवळपास सगळीकडेच असते, वपुंकडे मात्र शब्दांचाच परंतु केवळ शाब्दिक नव्हे 'प्लेझर बॉक्स' असतो. वपुंना तर तो 'प्लेझर' देतोच पण ह्या पुस्तकामुळे तो वपुंसह वाचकांनाही मिळतो. वपु लिहीतच होते वाचकांच्या मनाचे झंकार न उमटले तरच नवल ! वपुंनी हे झंकार हवेत विरून जाऊ न देता तत्परतेने पत्रोत्तर देऊन त्या तारा अधिक छेडल्या आहेत. त्याचे हे पुस्तक करतांनाही वपुंनी त्याल नुसते पत्रोपत्री असे स्वरूप येऊ न देता त्याभोवती आपल्या आठवणीही गुंफल्या आहेत. ह्या पत्रातही त्यांनी स्तुतीसुमनेच देणेही कटाक्षाने टाळले आहे. मुळातच आवडनिवडीचा हा पत्रव्यवहार हर्ष, हुंदके आणि हुंकार ह्यांचा एक नजराणाच आहे.
Details
Author: V.P. Kale | Publisher: Mehta Publishing House | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 192