महाराष्ट्र, सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या बहुरंगी आणि बहुआयामी राज्य , वैभवशाली इतिहास आणि विविधांगी वारसा लाभलेलं. मराठीसह अनेक बोलीभाषा ,धर्म ,पंथ , संप्रदाय आणि त्यांच्या प्रथा -परंपरा यांना सामावून घेत समृद्ध होत गेलेला हा प्रांत. शूरवीरांची -संतांची -सुधारकांची -लोकनेत्यांची ही भूमी.
मात्र या मराठी संस्कृतीचे गोडवे गात 'जय महाराष्ट्र ' म्हणताना आपल्या मनात महाराष्ट्राची प्रतिमा कशी असते ? बहुतेकदा अपुरी , बखरची आणि एकसाची. कारण ही प्रतिमा आपल्या मर्यादित भवतालावर आधारित असते. त्यामुळे महाराष्ट्रातल्या विविध भागांतल्या लोकांचं जगणं, बोलणं -चालणं, राहणं - वागणं , खाणं-पिणं, रीती -भीती वगैरेंबद्दलची आपली माहिती फारच जुजबी असते. परिणामी , महाराष्ट्रीय संस्कृतीच्या इंद्रधनुष्यातील लोभस रंग आपल्याला दिसूच शकत नाहीत.
या पार्श्वभूमीवर हा बृहद् ग्रंथ महत्वाचा ठरतो. महाराष्ट्राला लाभलेला समृद्ध वारसा आणि आजचं जगणं याचं समग्र दर्शन घडवणारं हे पुस्तक आहे . महाराष्ट्राच्या जिल्ह्याजिल्ह्यातील अभ्यासक -पत्रकार -लेखकांच्या सहभागातून आकाराला आलेला हा अशा स्वरूपाचा पहिलाच पुस्तक प्रकल्प आहे . महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नांदणाऱ्या बहुरंगी लोकजीवनाचा पट वाचकांसमोर आणणारा.
Author: Suhas Kulkarni | Publisher: Samakaleen Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 338